Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे.
आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.
तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.