Dnamarathi.com

Weight Loss Seed : आज अनेकजण वाढत्या वजनामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे. याच बरोबर वजन कमी करण्यासाठी पैसे खर्च करून अनेक उपाय देखील करत आहे. मात्र वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही एका बियाण्याच्या मदतीने तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. होय, तुम्ही जवसाचे बियाणे तुमचे वाढलेले वजन कमी करू शकतात.

जवसाचे बियाणे शरीराच्या विकासासाठी खुप महत्त्वाचे असतात. माहितीनुसार, जवसाच्या बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकद्रव्ये आढळतात. जवसाच्या बियाण्यांमध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटीऍसिड, हेल्दी प्रथिने, फिनोलिक कंपाऊंड आणि खनिजे आढतात.

अशाप्रकारे होईल वजन कमी
तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे बियाणे तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते. या बियाणेमुळे
चरबी कमी होते.

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळत ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी यात एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करावा. हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण रिकाम्या पोटी घ्या. यामुळे वजन झटपट कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *