DNA मराठी

Sangram Jagtap

img 20260901 wa0004

Vikhe Patil: पालकमंत्री डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; भुईकोट किल्ला विकासाला गती

Vikhe Patil: शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात सामंजस्य करार (MOU) संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात हा करार करण्यात आला. या करारामुळे किल्ल्याच्या संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विविध विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती. मात्र, भुईकोट किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्यासाठी लष्कराची अंतिम परवानगी आवश्यक होती. या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. आता महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार झाल्याने विकासकामांच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. भुईकोट किल्ल्याचा होणार कायापालट भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील पायाभूत सुविधांपर्यंत विविध विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांची सुविधा उभारण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीचे संवर्धन करून पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास आणि वास्तूचे महत्त्व समजावे यासाठी इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे आकर्षण ठरणाऱ्या कामांमध्ये बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा नेचर वॉकवे प्रस्तावित आहे. किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारण्यात येणार असून, परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी सोलर स्ट्रीट लाईटिंग करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा जपत पर्यटनाला नवी दिशा भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे या विकास प्रकल्पात किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप आणि वास्तूचे महत्त्व जपत पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबत पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध झाल्याने भविष्यात भुईकोट किल्ला अहिल्यानगरच्या पर्यटन विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची अपेक्षा आहे. सामंजस्य करार झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग येणार असून, संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक मान्यतांचाही त्यात समावेश आहे. घोषणेपासून मंजुरीपर्यंत आणि प्रशासकीय प्रक्रियेपासून आता सामंजस्य करारापर्यंत पोहोचलेल्या या महत्त्वाकांक्षी भुईकोट किल्ला विकास प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वैभवाला पर्यटन विकासाची जोड मिळणार असून, भुईकोट किल्ल्याचे रूपडे बदलण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी – राधाकृष्ण विखे पाटील “अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता.यासाठी त्यांचे सहकार्य मिळाले.पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असून, जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि अध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.”

Vikhe Patil: पालकमंत्री डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; भुईकोट किल्ला विकासाला गती Read More »

Sangram Jagtap

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज

Nilesh Lanke : जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे २५ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मितीही मंजूर केली आहे. जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी खासदार डॉ. निलेश लंके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. दिल्ली ते मुंबई विविध स्तरांवर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य शासनाने प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील २५ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेले मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे तात्पुरते कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालविण्यात येणार आहे. तसेच पुढील सात वर्षांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज Read More »

anil rathod

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष

Anil Rathod : नगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठा निकाल आला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. नेमकं प्रकरण काय? एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली, त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते. या कारवाईनंतर अनिल राठोड यांनी म्हटले होते केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पुढे २०२० मध्ये करोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात खटला सुरु होता. त्याचा निकाल आता आला असून सर्वांची सुटका झाली आहे.

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

sujay vikhe

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी ज्योती गाडे यांची सव्वा वर्षासाठी झालेली निवड केवळ महापालिकेपुरती मर्यादित राजकीय घटना मानणे भोळेपणाचे ठरेल. ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तावाटपापेक्षा अधिक, जिल्ह्यातील येऊ घातलेल्या राजकीय हालचालींचा पूर्वसंकेत आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिक अर्थवाही ठरते. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री असताना, भाजपचे जिल्ह्यातील राजकारण विखे कुटुंबाच्या अवतीभवती फिरत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या वाढत्या हालचाली, विशेषतः राहुरी मतदारसंघातील घाटाखालच्या गावांतील सततचे दौरे, गाठीभेटी आणि सामाजिक संपर्क, हे सगळे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही. राहुरी मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे पारंपरिक वर्चस्व आहे. ‘मारणारा-मानणारा’ असा मोठा वर्ग आजही या घराण्याशी जोडलेला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कोणतीही मोठी संस्थात्मक उभारणी न करता, केवळ जनसंपर्क, उपस्थिती आणि व्यक्तिगत नात्यांच्या जोरावर या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली होती. बाणेश्वर संस्थेपुरते मर्यादित कार्यक्षेत्र असतानाही, जनतेशी थेट संवाद ठेवत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय अवकाश तयार केला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. याच पोकळीतून भाजपकडून स्वर्गीय आमदारांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत आहे. सहानुभूतीचा घटक, कर्डिले घराण्याची ओळख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राजकारणात सहानुभूती ही कायमस्वरूपी भांडवल ठरत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. याचवेळी माजी खासदार सुजय विखे किंवा धनश्री विखे यांची नावे चर्चेत असणे, हे भाजपच्या अंतर्गत सत्तासंतुलनाचे सूचक आहे. ‘विखे की कर्डिले’ ही चर्चा केवळ व्यक्तींची नाही, तर जिल्ह्यात भाजपचा चेहरा कोण असावा, याविषयीची आहे. महापालिकेतील घडामोडी याच संदर्भात पाहाव्या लागतील. महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आले होते. महापौर निवडीपासून ते सत्ता-समीकरणांपर्यंत, अंतिम निर्णय त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहिला. अशा परिस्थितीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या आणि गाडे कुटुंबाची सून असलेल्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड, ही केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक समतोल साधणारी बाब नाही, तर कर्डिले गटाला दिलेला एक राजकीय ‘संकेत’ म्हणूनही पाहिली जात आहे. त्याचवेळी विखे पाटील घराण्याचे नाव या निवडीभोवती फिरणे, हे सत्तेतील अदृश्य हात स्पष्ट करते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री प्रसाद तनपुरे हेही या सगळ्या गणितात एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांनी जर “तीन वर्षांसाठी आमदार व्हायचे कशाला?” असा राजकीय निर्णय घेत माघार घेतली, तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अशा माघारीचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून, तो व्यापक राजकीय भाग असू शकतो. अहिल्यानगरच्या महापौरपदाची निवड त्यामुळे एका नगरसेविकेपुरती मर्यादित राहत नाही. ती राहुरीच्या आगामी पोटनिवडणुकीचा ट्रेलर ठरते. सत्तेची केंद्रे, घराणी, सहानुभूती आणि संधीसाधूपणा या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर आज जिल्ह्याचे राजकारण उभे आहे. प्रश्न एवढाच आहे की, या संघर्षात जनतेचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की पुन्हा एकदा सत्ताकारणाचाच खेळ वरचढ ठरतो? अहिल्यानगरच्या राजकारणाचे उत्तर लवकरच राहुरीच्या रणांगणात मिळणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Election: मोठी बातमी; अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी प्रभाग क्रमांक १ (अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक २ ( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ३ ( ब) गौरी अजिक्य बोरकर राष्ट्रवादी ( क ) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ५ ( अ )काजल गोरख भोसले राष्ट्रवादी (क )हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी ( ड )मोहित प्रदीप पंजाबो राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ८ (अ )सुनिता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी ( क )कुमार बबनराव वाकळे राष्ट्रवादी (ड) बाबासाहेब संतराम नागरगोजे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ९ ( अ )किरण रमेश दाभाडे राष्ट्रवादी (क )सीमा युवराज शिंदे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ११ (अ) सागर किरण शिंदे राष्ट्रवादी ( क )आशा किशोर डागवाले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १२ ( अ) आरती संग्राम रासकर राष्ट्रवादी ( ब ) संध्या रमेश घोलप राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १३ (अ )सुरेश लक्ष्मण बनसोडे राष्ट्रवादी ( ब) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादो ( क )अनिता विपुल शेटीया राष्ट्रवादी ( ड )अविनाथ हरिभाऊ घुले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १४ ( अ )प्रकाश बाबुराव भागानगरे राष्ट्रवादी (ब )सुनिता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी ( क )माना संजय चोपडा राष्ट्रवादी ( ड )गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १५ ( अ )पोर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी (क )गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १६ (अ )सुनिता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी ( ब )वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी प्रभाग १७ (अ) मयूर कनैय्यालाल बांगरे राष्ट्रवादी ( ब )अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी

Ahilyanagar Municipal Corporation Election: मोठी बातमी; अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

ahilyanagar

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात काढण्यात आलेल्या एका रंगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत वाद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पुणे – छत्रपती संभाजीनगर हायवे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव Read More »

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »