DNA मराठी

Pune police

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिला परिसरात राहणाऱ्या धनाजी टोणे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भलिंग तपासणी करून पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, १९ मे २०१९ रोजी जतमध्ये धनाजी टोणे आणि संबंधित महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. २०२० मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तिच्या अंगावर बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी टोणे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे आलेला रागही आणि पत्नीवर काढला. धनाजी यांनी पत्नीचे डोके फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर धनाजी टोणे यांची पुण्यात बदली झाली. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. मात्र, यावेळीही तिचा छळ सुरू राहिला. १३ मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने महिलेला एका गावातील शेतातील घरात नेले. तेथे तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली. १९ मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवरही यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेच्या वडिलांनी गर्भपातास विरोध केल्यानंतर धनाजी टोणे यांनी पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवत धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर २३ मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर ती कशीतरी माहेरी पोहोचली. पतीकडून होणारा छळ थांबत नसल्याने महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत. दरम्यान, आपल्याविरोधात पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर धनाजी टोणे यांनी तातडीने सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »

siya goyal

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, कारण काय?

Siya Goyal : व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 3 जुलै 2026 पर्यंत वाढ केली आहे. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणात पुढील तपासासाठी आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाकडे कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागण्यासाठी न्यायालयासमोर खालील प्रमुख कारणे सादर केली होती: केतनचा फाडलेला पासपोर्ट शोधणे तपासात समोर आले आहे की, सिया गोयलने केतन अग्रवालचा पासपोर्ट त्याच्या बॅगेतून चोरला आणि मुंबईला जात असताना खोपोलीजवळील एका फूड मॉलमध्ये तो फाडून फ्लश करून टाकला. सियाला केतनसोबत प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जायचे नव्हते, म्हणूनच तिने हे कृत्य केले. या पासपोर्टचे अवशेष आणि पुरावे गोळा करणे पोलिसांना आवश्यक आहे. डिलीट केलेला डिजिटल डेटा आणि चॅट्स रिकव्हर करणे गुन्ह्याचा कट रचण्यासाठी सिया आणि चेतनने एकमेकांशी संवाद साधला होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत, परंतु गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया डेटा डिलीट करण्यात आला आहे. हा फॉरेन्सिक डेटा परत मिळवून (Data Recovery) त्याआधारे आरोपींची चौकशी करायची आहे. ‘क्राइम सीन री-क्रेएशन’ पोलिसांनी यापूर्वी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘क्राइम सीन री-क्रिएट’ केला होता. मात्र, तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत ही प्रक्रिया करणे अद्याप बाकी आहे. चेतनने गुन्ह्यापूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली होती आणि हत्येची तालीम (Rehearsal) केली होती. तो कोणत्या ठिकाणी थांबला होता, हे शोधायचे आहे. चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ चाचणी या गुन्ह्यात एक अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा म्हणून पोलीस चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ (चालण्याची पद्धत विश्लेषित करण्याची फॉरेन्सिक चाचणी) करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती चेतनच आहे हे सिद्ध करण्यासाठी एआय (AI) टूल्सच्या मदतीने त्याच्या चालण्याच्या पद्धतीची पडताळणी केली जाणार आहे. दोघांची समोरासमोर चौकशी आणि इतर संशयितांचा शोध सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच हा संपूर्ण कट रचला की यामागे आणखी कोणाचे डोके होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, नवीन साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि त्यांना आरोपींसमोर उभे करून चौकशी करणे यासाठी पोलिसांना वेळ हवा होता. प्रकरण काय? 18 जून रोजी पुणे येथील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, परंतु पोलिसांच्या तांत्रिक तपासात आणि सीसीटीव्हीच्या आधारे समोर आले की, मंगेतर सिया गोयल हिने तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. सियाला तिच्या कुटुंबाचा सामना करण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, असा धक्कादायक खुलासाही तपासात झाला आहे.

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, कारण काय? Read More »

ketan agarwal

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा

Ketan Agarwal : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पाय घसरल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा 18 जून रोजी मृत्यू झाला होता. तर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून होणाऱ्या पत्नीनेच (सिया गोयल) केतन अग्रवालची आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर टर्किंग करत असताना पाय घसरल्याने 350 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (B.N.S.S. 194) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सखोल चौकशी करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (B.N.S.) कलम 103 आणि 61(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमसंबंध अन् हत्या सिया गोयलचे प्रेमसंबंध चेतन चौधरीसोबत असल्याने तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. कटाचा भाग म्हणून सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे सिया आणि चेतनने केतनची हत्या केली. तर दुसऱ्याकडे या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. विशाल अग्रवाल यांनी सियाच्या प्रेमसंबंधाबाबत सर्वकाही माहिती असून देखील तिच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा Read More »

pune toxic liquor

Pune Toxic Liquor : विषारी दारूकांडानंतर हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित

Pune Toxic Liquor : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात कर्तव्यातील कथित हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. २१ मे २०२६ रोजी हडपसर परिसरात विषारी किंवा गावठी दारूच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित भागात अवैध दारू उत्पादन आणि विक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत देखरेखीतील त्रुटी, कर्तव्यपालनातील निष्काळजीपणा आणि आवश्यक नियंत्रण राखण्यात अपयश आढळल्याचे समोर आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये: * वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले * हडपसर चौकी प्रमुख हसीना शिकलगार * पोलीस उपनिरीक्षक हसम मुलाणी (गुन्हे शोध पथक) यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई असेल. विषारी दारूकांडात अनेकांचे जीव गेल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. अवैध दारूविक्रीविरोधात वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Pune Toxic Liquor : विषारी दारूकांडानंतर हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित Read More »

acb

Pune ACB : पुणे पोलीस महिला API ला 28 लाखांसह रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ

Pune ACB : पुणे पोलीस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार असे अटक करण्यात आलेल्या या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. पोलिस आयुक्तालयाच्या आवारातच लाच स्वीकारताना त्यांना जेरबंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तोटेवार यांनी 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली. मात्र ही लाच नेमकी कोणासाठी किंवा कोणत्या प्रकरणात घेतली जात होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ACB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती आणि त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. असे असताना त्यांनी लाच स्वीकारल्याने संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, ACB कडून आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune ACB : पुणे पोलीस महिला API ला 28 लाखांसह रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ Read More »

police

Pune Lodge Case: पुणे लॉज प्रकरणात मोठा खुलासा; ‘स्टिंग ऑपरेशन’चा दावा खोटा अन्…

Pune Lodge Case : पुणे शहरातील लॉज प्रकरणात पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फक्त एकच आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या विविध चर्चांना पूर्णविराम देत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आयुक्तांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात संबंधित व्यक्ती लॉजमध्ये एकटाच गेला होता आणि त्याने तेथे आपत्तिजनक कृत्य केले. यानंतर मिळालेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडताना त्याने “आमच्यासोबत इतर पत्रकार होते, आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो” असा दावा केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासात तो पूर्णपणे एकटाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. त्याला अटक झाल्यानंतर आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केल्याच्या चर्चांनाही आयुक्तांनी फेटाळून लावले. “या संदर्भात आम्हाला कोणताही फोन आलेला नाही. कारवाई ही केवळ फिर्याद आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रुपाली पाटील यांनी काही पत्रकारांची नावे घेत साजिश असल्याचा दावा करणारा अर्ज दिला आहे. मात्र, त्या अर्जासोबत कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. “आतापर्यंतच्या तपासात त्या आरोपांमध्ये तथ्य आढळलेले नाही, तरीही तपास सुरू आहे,” असे आयुक्तांनी नमूद केले. सोशल मीडियावर पसरलेल्या “घटनेवेळी अनेक जण उपस्थित होते, काहींना मारहाण झाली” या दाव्यांनाही पोलिसांनी खोटे ठरवले. “तो एकटाच होता. त्याला पकडल्यानंतर काहींनी त्याला मारहाण केली होती, त्यामुळे बचावासाठी त्याने वेगळी कहाणी सांगितली असावी,” असे स्पष्टीकरण देण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील आणि संबंधित लॉजचे सखोल सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटना घडण्याच्या दोन तासांपूर्वीपर्यंतचा संपूर्ण मागोवा घेतला गेला. तसेच मागील दीड-दोन वर्षांचे लॉजचे रेकॉर्ड तपासण्यात आले असता, आरोपी यापूर्वीही तीन वेळा तेथे आला असल्याचे उघड झाले. दरम्यान, त्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांबाबतही पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. “जर PITA कायद्यांतर्गत कोणतीही बेकायदेशीर कृती आढळली, तर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल,” असे आयुक्तांनी सांगितले. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. “तो अनट्रेसेबल आहे, मात्र लवकरच त्याला अटक करण्यासाठी आमची पथके प्रयत्न करत आहेत,” असे पोलिसांनी सांगितले.

Pune Lodge Case: पुणे लॉज प्रकरणात मोठा खुलासा; ‘स्टिंग ऑपरेशन’चा दावा खोटा अन्… Read More »

img 20260312 wa0003

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या

Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध घेत आहे. फैसल खान असं मयत तरुणाचं नाव आहे. तर बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज शेख आणि मयत फैसल खान दोघे मित्र होते. शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थटटा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शहबाज याने मयताचे कानाखाली चापट मारली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढला. यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारधार चाकुने मयत फैसल खान याच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवसे गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. हत्या, चोरी सारखे गुन्हे दररोज दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या Read More »

sahyadri hospital

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल

Sahyadri Hospital Case : पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची 10 डिसेंबर रोजी तोडफोड केल्याची धक्कादाय घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. तर आता या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल Read More »

Police

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट?

Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट? Read More »

Rajendra Hagavane 1 1024x473

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत…

Rajendra Hagavane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी (ता.23 शुक्रवार )अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या प्रकरणात वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे यांना तत्काळ पोलिसांनी पकडावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती.त्यामुळे पोलिसांवर याबाबत मोठा दबाव आला होता. दरम्यान, वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत… Read More »