DNA मराठी

mumbai police

sex racket

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Girgaon High Profile sex Racket : गिरगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात सिनेसृष्टीशी संबंधित एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मेकअप आर्टिस्टने चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ग्राहकांशी जोडण्याचे काम केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. तपासादरम्यान दोन महिलांसाठी एकूण दोन लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने या व्यवहारातून कमिशन घेऊन महिलांना संबंधित हॉटेलमध्ये आणल्याचा पोलिसांचा दावा आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांनी कोणत्याही महिलेची ओळख जाहीर केलेली नाही. तपासादरम्यान आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत महिलांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर दलाल किंवा संबंधित व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मुंबई रेल्वे पोलिसांनी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३१५.४६० ग्रॅम सोनं, रोकड अशा मिळून तब्बल २२ लाख २४ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनंतर युनिट -३ गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा पद्धतशीर अभ्यास करून दोन आरोपींना अटक केली. वकार आलम तौकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा या दोघांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईमुळे कल्याण, कर्जत, डोबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील १६ प्रकरणांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती विवेक कलासागर पोलीस आयुक्त GRP मुंबई यांनी दिली आहे.

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Mumbai Police : मोठी बातमी! मुंबईत 6 ठिकाणी होणार बॉम्बस्फोट? पोलिसांना धमकी, वाचा सविस्तर 

Mumbai Police : पुन्हा एकदा राज्याची राजधानी मुंबईमध्ये दहशत निर्माण करणारा मेसेज आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने मुंबई शहरात सहा बॉम्ब ठेवल्याचा दावा केला आहे.  या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला मुंबईतील स्फोटाशी संबंधित मेसेज प्राप्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज पाठवला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून मोठा स्फोट होणार असल्याचा दावा संशयिताने केला आहे. वाहतूक पोलिसांनी तत्काळ मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तर दुसरीकडे या धमकीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांशिवाय इतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनीही काही महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी केली, मात्र कुठेही काहीही आढळून आले नाही.  धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईत धमकीचे कॉल, मेसेज आणि ईमेल येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  बुधवारीही असाच धमकीचा मेसेज आला होता. पोलीस तपासात हा मेसेज बनावट असल्याचे सिद्ध झाले. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि शहरातील अनेक मोठ्या बँकांना बॉम्बने उडवण्याची आणि मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.  काही प्रकरणांमध्ये आरोपीला काही तासांतच अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

Mumbai Police : मोठी बातमी! मुंबईत 6 ठिकाणी होणार बॉम्बस्फोट? पोलिसांना धमकी, वाचा सविस्तर  Read More »

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही.. 

 Mumbai News: कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या रूममध्ये  महिलेचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानक संकुलात असलेल्या तृप्ती लॉजच्या एका रूममध्ये 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथील रहिवासी ज्योती तोडरमल असे महिलेचे नाव आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कल्याण शहरातील एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना रूममध्ये महिला संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडलेली आढळली. तर मृत महिलेचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. एमएफसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. शनिवारी दुपारी ज्योती या भूपेंद्र गिरी नावाच्या तरुणासोबत तृप्ती लॉजमध्ये आली होती. सकाळी बराच वेळ होऊनही रूमचा दरवाजा न उघडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर ज्योती मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तातडीने महात्मा फुले पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन  पोस्टमार्टमसाठी   पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी शनिवारी रात्री आठच्या सुमारास लॉजमधून बाहेर पडला होता. सामान घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी लॉज मालकाला सांगितले. मात्र तो परतला नाही. सध्या फरार असलेल्या भूपेंद्र गिरीवर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटले असताना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृप्ती लॉजच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती आहे. सध्या ही हत्या का आणि केव्हा झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही..  Read More »