DNA मराठी

Maharashtra

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे?

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘पुकी’ सोबतचे फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Gues the Pookie’. तिचा पुकी कोण आहे, तिचा नवरा झहीर इक्बाल किंवा तिचा नवीन गोंडस पाळीव मित्र एक मजेदार कॅप्शनसह कोण आहे हे ठरवण्यासाठी अभिनेत्रीने हे तिच्या फॉलोवर्सवर सोडले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले – गर्भधारणेबद्दल अभिनंदन! मात्र, याला जोडप्याने दुजोरा दिलेला नाही.फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तर तिचा पती झहीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघे हसताना दिसत आहेत आणि सोनाक्षीने तिचे पिल्लू धरले आहे. सोनाक्षीच्या सुंदर फोटोंवर तिच्या पतीने किस आणि हार्ट इमोजी दिले आहेत. 7 वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये सलमान खान, संजय लीला भन्साळी, काजोल, तब्बू, यो यो हनी सिंगसह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. झहीर देखील एक अभिनेता आहे आणि त्याने 2019 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. झहीरचे वडील इक्बाल रतनसी दागिने आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आणि ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत. यामुळेच झहीरने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘नोटबुक’मधून सुरुवात केली. झहीरची बहीण सनम रतनसी ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलताना, अभिनेत्री तिच्या पतीसोबत ‘तू है मेरी किरण’ या आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करण्यास तयार आहे. याआधी सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे? Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ

Nitesh Rane :  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी  नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  काय म्हणाले होते नितेश राणे  रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते,  या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरण काय महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती. तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ Read More »

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News : राज्याची उपराजधानी नागपूर येते एक खळबळजनक घटना घडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार  मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. घरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्रीनिवास इलापुंगाटी (वय ५८), पद्मलता इलापुंगाटी (वय ५४) आणि मुलगा व्यंकट इलापुंगाटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, इल्पुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात अनेक वर्षांपासून इल्पुंगटी कुटुंब राहत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. नेहमी सकाळी लवकर उठणाऱ्या इल्पुंगटी कुटुंबातील एकही सदस्य गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी हाक मारून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता ते चक्रावून गेले. घरात पती-पत्नी आणि त्यांच्या २९ वर्षांच्या मुलाचे मृतदेह पडले होते. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आरोली पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे? पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ Read More »

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात.  पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते. मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना 40 कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य व कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, शेखर खरमरे, प्रतिभाताई, अर्चनाताई, शबनम इनामदार, प्रभा पाटील, शामल थोरात, नीता कचरे, विक्रम भोसले, संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कर्जत तालुक्यासाठी मागील जिल्हा नियोजन अंतर्गत 13 महिला बचत गटांना 65 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत 40 महिला बचत गटांना दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यासाठीच्या निधीची तरतूद केली आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे. यामध्ये मसाला कांडप, शेवया मशीन, पिठाची गिरणी, स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे. तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्या पिकासाठी आपण उमेद व महावीग यांना सांगून आपणास जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावे. लागेल ते साहित्य पुरवण्याचे काम खा. डॉ. विखे पाटील करेल असे देखील उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले. निस्वार्थ भावनेने तालुक्याच्या विकासासाठी वारंवार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. नगर करमाळा अंतर कापण्यासाठी पूर्वी चार तास लागत होते.  मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आणि नगर करमाळाचे काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला.  सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात. पण ती नंतर कसे श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही. एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो.  दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात. तालुक्याची विकासक गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत असे मत देखील खासदार विखेंनी यावेळी मांडले. भारतीय जनता महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत मंडल येथे आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाअंतर्गत विश्वनेते नरेंद्र मोदी साहेब यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रथमतः भारत माता की जय, जय मां काली, जय माँ दुर्गा अशा जयघोषाने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, देशातील लाखो भगिनीही या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. मी त्या सर्व महिलांना आणि उपस्थित महिला भगिनींना नमस्कार करतो. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व भगिनींचे मला अभिनंदन करायचे आहे. कारण मी पुरुषांच्या मॅरेथॉनबद्दल ऐकले होते, परंतु आमच्या महिला कार्यकर्त्या नारी शक्ती वंदनाच्या माध्यमातून गावोगावी जात आहेत. न थकता पायपीट करत आहेत. या माता, या बहिणी आणि मुली मोदींच्या रक्षणासाठी चिलखताप्रमाणे उभ्या आहेत. आज प्रत्येक देशवासी स्वत:ला मोदींचे कुटुंब म्हणवत आहे.  आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणत आहे मी मोदींचे कुटुंब आहे. या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्यासह संपूर्ण भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत असे उपस्थितांना त्यांनी सांगितले.

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप Read More »

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या माहितीनुसार कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान, काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ Read More »

Maruti Swift मिळत आहे 2 लाखांपेक्षा कमी किमतीत! पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर

Maruti Swift: अगदी कमी वेळेत सर्वात जास्त विक्री होऊन अनेक विक्रम मोडणारी मारुती सुझुकीची लोकप्रिय कार Maruti Swift तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता Maruti Swift 2 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. चला मग जाणून घेऊया या जबरदस्त ऑफरबद्दल सर्वकाही.  Maruti Swift इंजिन   मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे. कंपनीची ही कार 1197 cc इंजिनसह येते. जे 88.50 bhp ची कमाल पॉवर आणि 113 Nm चे पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह येणाऱ्या या कारमध्ये कंपनीने 22.56 किलोमीटर प्रति लिटर मायलेज दिले आहे. या कारमध्ये 268 लीटरची बूट स्पेस असून त्यात 37 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. Maruti Swift किंमत तसे, जर तुम्ही कंपनीची ही प्रीमियम हॅचबॅक बाजारातून खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 5.99 लाख ते 9.03 लाख रुपये खर्च करावे लागतील.  पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवर जाऊन कंपनीची ही कार खरेदी करु शकता.   Maruti Swift ऑफर   तुम्ही CarWale वेबसाइटवर मारुती स्विफ्टचे जुने मॉडेल तपासू शकता. या कारचे 2010 चे मॉडेल येथे विकले जात आहे. या कारने 79,100 किलोमीटर चालवले आहे आणि अतिशय चांगल्या स्थितीत ठेवले आहे.  सध्या या कारची किंमत 1.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 2011 मॉडेल मारुती स्विफ्ट CarWale वेबसाइटवरूनच खरेदी केली जाऊ शकते. ही कार उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यात आली असून ती 1,23,567 किलोमीटर चालवण्यात आली आहे. पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार तुम्ही  2.06 लाख रुपये किमतीत घेऊ शकता.

Maruti Swift मिळत आहे 2 लाखांपेक्षा कमी किमतीत! पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर Read More »

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान

Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे जाणुन घ्या, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या नव्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे नाव राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार झाले.  निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांची संख्या 81 आहे. त्यापैकी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थनार्थ 57 आमदारांची शपथपत्रे सादर केली, तर शरद पवार यांच्याकडे केवळ 28 प्रतिज्ञापत्रे होती. हे पाहता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला आमदारांचा बहुमताचा पाठिंबा आहे आणि तोच खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा करू शकतो, असा निष्कर्ष आयोगाने काढला. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक विभागातील बहुमत चाचणीसाठीचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने त्यामागचे कारण दिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, त्याचे सदस्य आणि त्यांच्या निवडणुकांचा तपशील कोणताही मूलभूत आधार नसलेला आहे. उल्लेखनीय आहे की, अजित पवार यांच्या बाजूने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अशी माहिती आहे.  त्यानंतर पाच वर्षांनंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी (MVA) च्या माध्यमातून राज्य सरकारचा भाग बनली. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील MVA सरकार जून 2022 मध्ये पडले. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडखोरी झाली आणि पक्ष दोन गटात विभागला गेला. यानंतर शिंदे भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या राजकीय गोंधळानंतर वर्षभरानंतर, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरीचा बिगुल वाजवला. त्यानंतर अजित पवार पक्षाच्या आठ आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले.  अजित पवार सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्या गटात आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान Read More »

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त

Nashik IT Raid: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयकर विभागाने मोठी कारवाई करत नाशिकमध्ये अनेक सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून हा छापा सुरू आहे. सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या छाप्यात सहभागी आहे. पैशांनी भरलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले आयकर विभागाला 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता आणि व्यवहार झाल्याचा संशय आहे. कंत्राटदारांच्या आठहून अधिक ठिकाणी आयटीचे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात विविध ठिकाणांहून आठ कोटी रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एकाच वेळी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. शहरातील बड्या सरकारी कंत्राटदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि इतर परिसरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याशी संबंधित बँक खाती, संगणक आणि व्यवहार यांची चौकशी सुरू आहे.  छाप्यादरम्यान आयकर विभागाने तपासासाठी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. छाप्यात अनेक ‘धनकुबेर’ पकडले नाशिकमध्ये आयकर विभागाने सरकारी कंत्राटदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महापालिकेच्या 8 कंत्राटदारांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. आयकर अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर काहींनी त्यांची रोकड त्यांच्या कारमध्ये आणि झुडपात लपवून ठेवली, तर काहींनी अधिकाऱ्यांपासून त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी छतावर आणि पंख्यांमध्ये व्यवहाराची कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह लपवून ठेवल्या. काही कंत्राटदारांनी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेची माहिती असलेली पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क लपवून ठेवली होती. त्यातील एकाने घरातील पंख्यामध्ये बेहिशेबी व्यवहारांची माहिती असलेला 2 जीबीचा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होता.  त्याचवेळी गाडीत रोकड ठेवून झुडपात लपवून ठेवली होती. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त Read More »

Maharashtra News : धक्कादायक! 32 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप

Maharashtra News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर  माजी आमदाराच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 32 वर्षीय पीडितेसोबत आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने तिच्या डोक्यात पिस्तुल रोखून धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय अभिनेत्रीने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.   32 वर्षीय पीडितेने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376 (2) (एन), 377, 323, 504 आणि 506 तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची आरोपीशी ओळख झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करणार असल्याचे अभिनेत्रीला सांगितले होते. लग्नाचे बोलून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तक्रारदार महिलेने सांगितले की, जेव्हाही ती लग्नाबद्दल बोलायची तेव्हा आरोपी हे प्रकरण टाळायचा. नंतर तो महिलेपासून अंतर राखू लागला. दरम्यान, तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने मे 2023 मध्ये सोशल मीडियावर आरोपीसोबत चॅटिंग सुरू केले. घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही आरोपीने तिला लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सांगितले की, तिचा 2016 मध्ये घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, तिने सुरुवातीला आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, मात्र तो गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पुण्यात आला होता. यावेळी आरोपीला भेटल्यानंतर त्याने आपला विचार बदलला.

Maharashtra News : धक्कादायक! 32 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप Read More »