DNA मराठी

Maharashtra

kopargaon election

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

Kopargaon Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान कोपरगावमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे नेमकं काय घडलं? माहितीनुसार, नगर परिषदेच्या निवडणुकीचे साठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर ती दबाव आणतायेत की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे काळे कोल्हे संघर्ष कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाला यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयते तर विवेक कोल्हेगाटाकडून परागसंधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी काळे कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणारे यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

Money

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही

Post Office MIS Scheme: जर तुम्ही देखील भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एका भन्नाट आणि फायदेशीर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा नाव आहे एमआयएस. या योजनेत तुम्हाला वारंवार गुंतवणूक करावी लागत नाही. एकदा तुम्ही गुंतवणूक केली की तुमचे मासिक उत्पन्न सुरू होते. पोस्ट ऑफिस या योजनेअंतर्गत 7.4 टक्के वार्षिक व्याज देते, जे थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यात ठेवू शकता किंवा गरज पडल्यास ते काढू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत फक्त 1000 मध्ये खाते उघडू शकता. एका खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाखांपर्यंत आहे, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाखांपर्यंत आहे. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 लोक सामील होऊ शकतात. जर तुम्ही एकाच खात्यात 9 लाखांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 5550 चे निश्चित व्याज मिळेल. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते आणि मासिक उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्रोत बनते. MIS योजना 5 वर्षांत परिपक्व होते. मुदतपूर्तीनंतर, तुमच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला दरमहा व्याज मिळतेच, परंतु तुमची मुख्य गुंतवणूक देखील सुरक्षित असते. एमआयएस योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. निश्चित मासिक उत्पन्न उघडल्यानंतर लगेचच सुरू होते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार निधी वापरू शकता. ही योजना सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवे असलेल्यांसाठी आदर्श आहे.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही Read More »

uddhav thackeray and eknath shinde

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

Eknath Shinde on Uddhav Thackeray: नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही असे सांगितले. काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ.. असे वागत आहेत..फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात, ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही, एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली, मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला असे सांगितले. माझ्याविषयी असलेल्या मळमळ आणि जळजळ यातूनच हे आरोप होत असल्याचे आवर्जून नमूद केले. मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले, मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा दिला, मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यातून 13 हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील 25 हजार कर्मचाऱ्यांना 5 किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून 10 टक्क्यांनी या किंमती कमी केल्या, 50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 17 प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 40 लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगितले. या निर्णयाद्वारे 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या योजना सुरू करून आम्ही त्यांच्या चरणी ही योजनापुष्पे वाहिली आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले..? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले. मिठी असो वा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. तिजोरीला वेटोळे घालून प्रत्येक कामात घोटाळे करण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे..? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुतीच असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: केंद्र शासनाने देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अति दुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात. सर्व पोलीस चौकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात. नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावा. येथील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत समितीची आढावा बैठक विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.  जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढे आलेल्या गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. मंत्रालय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यातील कुठलाही विषय आल्यास नियमानुसार त्याला प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे. गडचिरोली येथे नवीन पोलीस अधीक्षक इमारतीचे काम सुरू करावे. या इमारतीसाठी निधी उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच पोलीस दलात 33 नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अप्पर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष) शीरिंग दोरजे, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अतिरिक्त महासंचालक अजय शर्मा आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल यांनी बैठकीत सादरीकरण केले. नक्षलवाद्यांनी आनंद साजरा केलेल्या ठिकाणीच पोलीस चौकीची निर्मिती 8 ऑक्टोंबर 2009 मध्ये भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 पोलीस जवान शहीद झाले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी आनंद उत्सव साजरा केला, नक्षल्यांनी आनंद उत्सव साजरा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी नवीन पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यामुळे या भागात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

sahyadri hospital

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल

Sahyadri Hospital Case : पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची 10 डिसेंबर रोजी तोडफोड केल्याची धक्कादाय घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. तर आता या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल Read More »

shrirang barge on msrtc

Shrirang Barge on MSRTC : शासनाची मंजूरी मिळत नसल्याने एसटी मधील 500 चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर; श्रीरंग बरगे आक्रमक

Shrirang Barge on MSRTC : राज्य परिवहन महामंडळात चालक तथा वाहक हे पद काही वर्षापूर्वी निर्माण करण्यात असून व या पदातील कर्मचाऱ्यांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असल्याने चालक व वाहक या दोन्ही पदातील ५००० कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून शासनाची मंजुरी नसल्याने अनेक चालक व वाहनांना वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीत काम करावे लागत आहे.व त्यांची आर्थिक पिळवणूक होत असून या तीनही पदांना शासनाने एकत्रित मंजुरी देऊन वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या या पदातील कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. या संदर्भातील एक निवेदन आज नागपूर येथील विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून देण्यात आले असून चालक, चालक तथा वाहक व वाहक या तीनही पदातील कर्मचाऱ्यांची पदे वेगवेगळी न दाखवता या पदांचे एकत्रीकरण करण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नवीन पदांना मंजुरी देण्याचा अधिकार शासनाचा एसटी हा राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम असल्याने व राज्य शासनाच्या कुठल्याही उपक्रमांमध्ये नवीन पदांना मंजुरी देणे किंवा पद एकत्रीकरण करणे हा अधिकार शासनाचा असल्याने तांत्रिक अडचणी मुळे हा प्रश्न सुटला नसून या पदाना एकत्रित मंजुरी दिल्यास हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकेल असे ही बरगे यांचे म्हणणे आहे. एसटीच्या स्थापने पासून चालक व वाहक या पदासाठी वेगवेगळी भरती केली जात असून सन २०१६ मध्ये “वाहक” हे पद गोठविण्यात आले असून चालक तथा वाहक हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. नवीन पद निर्माण करण्यात आल्या नंतर ते चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका ५००० चालक व वाहक कर्मचाऱ्यांना बसला आहे. चालकाच्या मंजुरीत चालक तथा वाहक समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असून त्यामुळे चालक व वाहक या दोन्ही पदातील कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे. बढती मिळण्यात अन्याय हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे नाव ज्येष्ठता सुचित सुद्धा खाली टाकले जाते , व नोकरी मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावरच बढती परीक्षेस पात्र ठरविण्यात येते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा नवीन भरती झालेले कनिष्ठ कर्मचारी बढती परीक्षेस पात्र ठरतात.व हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती उशिरा मिळाल्याने सुद्धा त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Shrirang Barge on MSRTC : शासनाची मंजूरी मिळत नसल्याने एसटी मधील 500 चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर; श्रीरंग बरगे आक्रमक Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी

Vijay Wadettiwar : राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पण सध्या ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृहाच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की या वसतिगृहात प्रवेश मिळण्याच्या अटी आणि नियम हे अडचणीचे आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही.त्यामुळे या अटी शिथिल कराव्या आणि सरसकट विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. तसेच राज्यात 72 वसतिगृह शासनाने बांधावी आणि त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करावी अशी भूमिका मांडली. यावर उत्तर देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाड्याच्या इमारतीत वसतीगृह सुरू ठेवायची नसून ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागा ठरल्या की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन विभागाला जागा हस्तांतरीत करण्यात येईल,अस स्पष्ट केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जागा घेण्यात आल्या आहेत. महसूल विभागाने जागा घेतल्या ते जिल्हे सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया हे आहेत. काही जिल्ह्यात जागा निश्चित झाली आहे तिथे जागा हस्तांतरण बाकी आहे,ते जिल्हे नागपूर ,कोल्हापूर , सातारा , नाशिक जळगाव, नंदुरबार लातूर, नांदेड हिंगोली, बीड परभणी सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर असे आहेत. राज्यातील फक्त चार जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह साठी जागा मिळालेल्या नाही. रायगड, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात जागा मिळवून देण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल असं ही मुख्यमंत्री म्हणाले.

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी Read More »

nashik accident

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू

Nashik Accident : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात रस्ते अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अपघातात अनेक जण जखमी होत आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात झाला घटना बसवंत पिंपळगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसवंत पिंपळगाव येथून इनोव्हा. एम एच 15 बी एन झिरो 0555 या क्रमांकाचे चार चाकी वाहन वनी येथील नांदुरी गडावर दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा तोल गेल्याने कार 400 फूट दरीत कोसळून कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक हा गंभीर जखमी असून त्यास स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी वणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी येऊन रेस्क्यू ऑपरेशन करून वाहन चालकाला उपचारासाठी दाखल केले. घटनेचा अधिक तपास घटनेचा अधिक तपास वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदुरी गाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहे.

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू Read More »

Crime 1

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Crime: पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच चांगल्या मारामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांसह एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर परिस्थिती ताणली गेली. रविवारी सकाळी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये तुफान बाचाबाची झाली आणि पुढे हाणामारीला सुरुवात झाली.भांडणात धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर व संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू Read More »