DNA मराठी

latest update

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत

Rohini Khadse : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे अशा बातम्या कालपरवा पासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. पण आपल्या भारतात ते घडले आहे तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, प्रत्येकांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे ही शोकांतिका आहे असं त्या म्हणाल्या.

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी

Neelam Gorhe On Vaishnavi Hagavane Case : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असता, त्यावेळी एका नव्या घटनेबाबत माहिती समोर आली. हगवणे कुटुंबाने लग्नावेळी एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या रुखवतातून रुखवत विकत घेण्यासाठी दीड लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार संबंधित मुलीच्या कुटुंबाने केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी तपशीलवार चर्चा केल्याचेही सांगितले. मयुरी जगताप या हगवणे कुटुंबाच्या दुसऱ्या सुनेशीही त्यांनी सविस्तर संवाद साधला असून, त्या प्रकरणातील तपशील देखील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छळाच्या या दोन्ही घटनांमध्ये क्रूरतेची पद्धत स्पष्टपणे दिसते. मयुरी जगतापने दाखल केलेल्या 354 कलमाखालील तक्रारीचे प्रकरण सध्या पौड पोलीस स्टेशनवरून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची चार्जशीट अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती सादर होणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तीला संरक्षण दिले जाणार नाही. साक्षीपुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणात ॲड. राजेश कावेडिया आणि ॲड. उज्वला पवार यांची नावे पुढील कायदेशीर प्रक्रियेत असून, सरकारी वकिलांचीही नेमणूक आवश्यक ठरणार आहे. त्यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व माहिती सोपविणार असल्याचे सांगितले. राज्य महिला आयोगाच्या संदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याला जर राजकीय हेतू म्हणायचं असेल, तर तो दृष्टीकोन चुकीचा आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढावे, महिलांना न्याय मिळावा आणि पुनर्वसनाचे काम अधिक प्रभावी व्हावे, यासाठी आयोगाला अधिक निधी, कर्मचारी आणि कार्यक्षमता देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणें, नाशिक, आणि नव्या मुंबईतील अलीकडील महिलांच्या आत्महत्या तसेच राजगुरूनगर येथील बालिका अत्याचार घटनांचा दाखला देत, त्या म्हणाल्या की अशा घटना टाळण्यासाठी वेळेत न्याय देणं गरजेचं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपींना फरार होण्यासाठी वेळ मिळू नये, यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी Read More »

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला

Maharashtra Rain Alert: राज्याच्या हवामान इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे: १९५६: २९ मे १९६१: २९ मे १९७1: २९ मे २०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान २०२५: २६ मे (सर्वात लवकर!) ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला. पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय २६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद: कुलाबा: १०५.२ मिमी सांताक्रूज: ५५ मिमी मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.” नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अनावश्यक प्रवास टाळावा पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी २०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला Read More »

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना

Devendra Fadanvis: रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण 31 फिरती पथके सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांची टीम असणार असून बसमध्ये GPS ट्रॅकिंग व CCTV कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल. मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीत, शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे. या योजनेंतर्गत दरमहा किमान 20% मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरीत केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना Read More »

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार

DGMO Rajiv Ghaiv : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा वाढत असून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान सैन्याचे 35 – 40 सैनिक मारले असून तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, म्हणाले की या काळात भारताने 5 शूर सैनिकही गमावले, परंतु या मोहिमेचे यश धोरणात्मक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला डीजीएमओ म्हणाले की, पाकिस्तानकडून काही एअरफील्ड आणि गोदामांवर वारंवार हवाई हल्ले होत होते, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. 7 ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा अंत ठरला लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 आणि 8 मार्चच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. या अचूक आणि गुप्त कारवाईत, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात अनेक उच्च दर्जाच्या लक्ष्यांचा समावेश होता. डीजीएमओ म्हणाले की, आम्ही युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जे आयसी-814 अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोट यासारख्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते.

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार Read More »

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार

Pratap Sarnaik : गेली अनेक वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीच्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्या बद्दल एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सातारी कंदी पेढ्याचा हार व शिवनेरीची प्रतिकृती भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज “महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या”वतीने सत्कार करण्यात आला. एसटी आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून दहा हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व सात हजार कोटी रुपयांची देणी थकली असून त्यातून निश्चित मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागणीला यश मिळाले असून एसटीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत चांगला असून गोर गरिबांची व सामान्यांची एसटी सक्षम करायची असेल तर त्यावर मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचा निर्णय हा महत्वपूर्ण असून यातून अपेक्षित यश मिळून एसटीचे प्रवासी व कर्मचारी या दोघांचे प्रश्न सुटतील असा विश्वास एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला असून एसटीत सर्वात यशस्वी ठरलेल्या “शिवनेरीची” प्रतिकृती व एसटीच्या दृष्टींने पुढे सर्व काही गोड व्हावे यासाठी सातारी कंदी पेढ्याचा हार देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मंत्री सरनाईक यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला सात टक्के महागाई भत्ता तत्काळ देण्यात येणार असून त्या साठी अपेक्षित उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाला देण्यात येणार आहे .येत्या पाच वर्षात 25 हजार नव्या स्व मालकीच्या बसेस खरेदी करण्यात येतील. या शिवाय या पुढे भाडे तत्वावरील एकही बस घेतली जाणार नसून पाच वर्षात एसटीला चांगले दिवस येतील असा विश्वासही त्यांनी या वेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. या वेळी भारतीय कर्मचारी कामगार महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, कार्याध्यक्ष विजय बोरगमवार, कोशाध्यक्ष संतोष गायकवाड,उपाध्यक्ष वसंत बोराडे, संजीव चिकुर्डेकर, दीपक जगदाळे, प्रादेशिक सचिव बालाजी ढेपे,राजेश गोपनवार, समीर डांगे, मनीष बत्तुलवार, पदाधिकारी सर्वश्री सचिन जगताप,राजेश सोलापान,मनीषा कालेशवार, संतोष भराड, संतोष भिसाडे, राजेंद्र वहाटूळे, बालाजी जाधव, अनिता वळवी, अरविंद निकम, सुधाकर कांबळे, संदीप गोसावी, सुमन ढेंबरे, धनंजय पाटील, सुगंधा हिले, विनोद दातार, जहीर खान, किशोर पाटील, सुनील घोरपडे, नवनाथ गुंड, हरीश बन्नगरे, जयंत मुळे, प्रवीण चरपे, संदीप मुळे,विष्णू म्हस्के, कमलाकर जोशी, जयश्री कंचकटले, विधी पवार, सोमनाथ पांढरे, किशोर सावंत, गजानन पूकळे,तुकाराम पुंगळे, प्रताप शेळके,आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार Read More »

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले

Nitesh Rane: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचा संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान मोदी आहेत आणि यावी ठोस उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पुण्यात हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला असून जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. असेही यावेळी ते म्हणाले. मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना असून यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असून सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी कबुली देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले Read More »

भाडेवाढ करणाऱ्या एअरलाइन्सवर कारवाई करा, तृतीयपंथ समाजाची मागणी

Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने त्यांना पुन्हा एकदा घरी पाठवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील काही लोक देखील या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना स्पेशल विमानाने सरकारने पुन्हा एकदा घरी पाठवल आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एक संतापाची लाट पसरली असून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. आज नगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे की, तृतीयपंथ समुदायाच्या वतीने आम्ही जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या दहशत वादी कृत्याने देशाच्या शांततेला व एकात्मतेला आव्हान दिले आहे. अशा हिंसक घटनांचा कोणत्याही प्रकारे पाठिंबा देता येणार नाही. भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे आण सर्व नागरिकांना सुरक्षितेचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही तृतीयपंथी समुदायाच्या वतीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच या घटनेतील पीडित कुटूंबीयांप्रती आमची सहवेदना व्यक्त करतो. आपण या निषेध निवेदनाच्या योग्य ती दखल घेऊन शासनस्तरावर आमची संदेश पोहोचवावा अशी विनंती निवेदनामार्फत सरकारला करण्यात आली आहे. तसेच देशातील विविध एअरलाइन्सने हल्ल्यानंतर भाडेवाढ केल्याने अनेक नागरिकांचे हाल झाल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील काजल गुरु, अध्यक्ष तृतीयपंथी समाज, अहिल्यानगर यांनी केली आहे.

भाडेवाढ करणाऱ्या एअरलाइन्सवर कारवाई करा, तृतीयपंथ समाजाची मागणी Read More »