DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra News : धक्कादायक! 32 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप

Maharashtra News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर  माजी आमदाराच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 32 वर्षीय पीडितेसोबत आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने तिच्या डोक्यात पिस्तुल रोखून धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय अभिनेत्रीने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.   32 वर्षीय पीडितेने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376 (2) (एन), 377, 323, 504 आणि 506 तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची आरोपीशी ओळख झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करणार असल्याचे अभिनेत्रीला सांगितले होते. लग्नाचे बोलून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तक्रारदार महिलेने सांगितले की, जेव्हाही ती लग्नाबद्दल बोलायची तेव्हा आरोपी हे प्रकरण टाळायचा. नंतर तो महिलेपासून अंतर राखू लागला. दरम्यान, तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने मे 2023 मध्ये सोशल मीडियावर आरोपीसोबत चॅटिंग सुरू केले. घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही आरोपीने तिला लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सांगितले की, तिचा 2016 मध्ये घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, तिने सुरुवातीला आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, मात्र तो गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पुण्यात आला होता. यावेळी आरोपीला भेटल्यानंतर त्याने आपला विचार बदलला.

Maharashtra News : धक्कादायक! 32 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप Read More »

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.  मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत ओबीसींना की मराठ्यांना फसवले? असं प्रश्न उपस्थित केला आहे. याचं बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी का? गेले नाही असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.   काय म्हणाले नाना पटोले? “आरक्षण देताना ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण नेमके कसे दिले याचा खुलासा राज्य सरकारने करावा, त्याचबरोबर सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते का दिले नाही असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा,” अशी मागणी सरकारकडे केली आहे. “जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले? याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल Read More »

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी….

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात मराठा आरक्षणासाठी मागणी होत होती. आज या मागणीला पुर्ण करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी…. Read More »

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसने नोकरभरती परीक्षेचा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तलाठी नियुक्तीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सुमारे 20 ते 25 युवक काँग्रेस कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुपारी 3.15 वाजता बोरिवलीकडे जाणारी ट्रेन थांबवली.

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण! Read More »

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या….

Gondia News:- गोंदिया शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री येथिल शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामा जवळ एका अज्ञात 38 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटणा मंगळवार – बुधवार च्या मध्यरात्री दरम्यान समोर आली आहे.  या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी दोन संशयिताना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र हत्या कोणत्या वादावरून करण्यात आली आहे. हे अद्याप कळू शकले नसुन हत्या झालेल्या युवकाची ओळखही अद्यापपर्यंत पटू शकली नाही.  या घटनेचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे.

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या…. Read More »

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू

 Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. रात्री अडीचच्या सुमारास एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरसह तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एसटी बस आणि इको कार यांच्यात धडक झाली. रात्री अडीच वाजता धवलपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला, त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.  दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ जाम झाला होता. निलेश रावसाहेब भोर, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी, प्रकाश रावसाहेब थोरात, सचिन कांतीलाल मंडलीचा, अशोक चीमा केदार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात सुयोग अडसूळ नावाचा तरुण जखमी झाला आहे. अपघातातील उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगरमधील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू Read More »

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ एम.ए. बरालिया यांचे न्यायालयाने आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. याबाबत हकीकत अशी की, सन २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे डॉ. विनोद श्रीखंडे यांचे तक्रारीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे एमस् हॉस्पीटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे करुन त्यांचे बनावट कागदपत्रे, बनावट सह्या करुन सदरचे कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बैंक अधिकारी व संचालक यांचेशी संगनमत करुन आरोपी डॉ. निलेश शेळके यांनी प्रत्येकी रु. ५ कोटी ७५ लाख असे एकुण रु. १६ कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार केलेबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल झालेल्या होत्या.  त्या प्रकरणात तपासादरम्यान सर्व हिशोब व कागदपत्रे ही वैधानिक लेखापरिक्षणास पाठविण्यात आली होती, त्याचा अहवाल सन २०२१ मध्ये प्राप्त झाला होता. त्या अहवालानुसार व दाखल तक्रारीनुसार प्रकरणामध्ये आरोपी निलेश शेळके यांचे कायदेशीर सल्लागार व सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांचा सहभाग आढळून आलेला होता व प्रकरणात ते फिर्यादी पक्ष व आरोपी पक्ष यांचे वतीने त्यांनी सी.ए. म्हणून काम केलेले होते.  त्याद्वारे मुख्य आरोपी निलेश शेळके यांचेशी संधान बांधुन फिर्यादी यांना फसविण्याचे उद्देशाने विजय मर्दा यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात आढळून आल्याचा आरोप त्यांचेवर फिर्यादी पक्ष व पोलीसांनी केलेला होता. त्यानुसार त्यांना दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अंदाजे दीड महिना विजय मर्दा हे वरील तीनही स्वतंत्र प्रकरणामध्ये कारागृहामध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर करुन प्रकरणात आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग हा केवळ अनुमानावरुन काढलेला आहे व त्यास प्रथमदर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नाही, अपहाराची कोणतीही रक्कम हस्तेपर हस्ते आरोपी विजय मर्दा यांना आल्याचे आढळून येत नाही. त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्यामधील लावण्यात आलेली कलमे ही विजय मर्दा यांना लागू होत नाहीत. व त्यांनी त्यांचे कार्य हे कायदेशीर सल्लागार व सी.ए. या कार्यकक्षेत केलेले असल्याने त्यास प्रथमदर्शनी फसवणूक अपहार किंवा बनावट दस्त तयार करण्याचे व्याख्येमध्ये घेता येणार नाही अशा स्वरुपाचा युक्तीवाद ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयासमोर केला. सरकारपक्षाद्वारे त्यांची शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तीवाद करण्यात आलेला होता.  वरील कायदेशीर बाजु, उपलब्ध पुरावा व सादर करण्यात आलेला युक्तीवाद या सर्वांचे अवलोकन करुन जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना वरील तिनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. आरोपीतर्फे ॲड. सतिश गुगळे व ॲड. अरविंद काकाणी यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर… Read More »

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर शहरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार गामा भागानगरे खून प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी सागर प्रवीण गुडा याचा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला आहे. 19 जून 2023 रोजी ओंकार भागानगरे याचा खून झाला होता. यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   या प्रकरणात अटक आरोपी सागर प्रवीण गुडा याचा सेशन्स कोर्ट अहमदनगर येथे जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या   जामिनाची आज रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तीवर आरोपीस जामीन मंजूर केलेला आहे.  सदर आरोपीच्या वतीने अँड. निलेश घाणेकर अँड. सरिता साबळे व अँड सतीश गीते यांनी काम पाहिले.

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर… Read More »

Nova Agritech IPO : तयारीला लागा! येत आहे ‘या’ कंपनीचा IPO; जाणुन घ्या सविस्तर

Nova Agritech IPO : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता कमाईची जबरदस्त संधी मिळत आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो, नोव्हा ऍग्रीटेकचा IPO 23 जानेवारी 2024 पासून उघडणार आहे, ज्यातून कंपनी 143.81 कोटी रुपये उभारणार आहे. खरं तर, देशाचे कृषी क्षेत्र सतत वाढत आहे, ज्यामुळे तुम्हाला नोव्हा अॅग्रीटेकमध्ये पैसे गुंतवण्याची मोठी संधी मिळत आहे. कंपनीबद्दल बोलायचे तर, कंपनी एक कृषी-निविष्ट निर्माता आहे जी मातीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांचे व्यवहार करते. पोषण आणि पीक पोषण. संरक्षण प्रकल्पांसाठी ओळखले जाते. तुम्ही 365 इक्विटी शेअर्सवर बोली लावू शकता तुम्हाला या IPO मध्ये गुंतवणूक करायची असल्यास, तुम्ही किमान 365 इक्विटी शेअर्ससाठी आणि नंतर 365 च्या पटीत बोली लावू शकता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,235 रुपये गुंतवावे लागतील. तथापि, आपण यापेक्षा जास्त बोली लावू शकता. Nova Agritech IPO बाजारात कधी लिस्ट होणार? तुम्ही Nova Agritech IPO मध्ये बेट लावू शकता, त्यामुळे आम्ही त्याच्या अधिक तपशीलाबद्दल बोललो तर, शेअर्सचे वाटप 25 जानेवारीला होईल. हीच कंपनी 29 जानेवारीला परतावा सुरू करेल. ज्यांना या कंपनीचे शेअर्स मिळाले असतील, तर ते वाटप करणाऱ्यांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. आणि स्टॉक 31 जानेवारी रोजी NSE आणि BSE वर लिस्टिंग होईल. कंपनी या नवीन इश्यूमधून मिळालेल्या 14.20 कोटी रुपयांचा वापर कंपनीच्या उपकंपनी नोव्हा अॅग्री सायन्सेसमध्ये नवीन फॉर्म्युलेशन प्लांट उभारण्यासाठी करेल. त्याच कंपनीने आणखी एक योजना तयार केली आहे, ज्याद्वारे भांडवली खर्चासाठी आणि विद्यमान फॉर्म्युलेशन प्लांटच्या विस्तारासाठी 10.49 कोटी रुपये वापरले जातील.

Nova Agritech IPO : तयारीला लागा! येत आहे ‘या’ कंपनीचा IPO; जाणुन घ्या सविस्तर Read More »