Dnamarathi.com

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. 

मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत ओबीसींना की मराठ्यांना फसवले? असं प्रश्न उपस्थित केला आहे. याचं बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी का? गेले नाही असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

 काय म्हणाले नाना पटोले?

“आरक्षण देताना ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण नेमके कसे दिले याचा खुलासा राज्य सरकारने करावा, त्याचबरोबर सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते का दिले नाही असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा,” अशी मागणी सरकारकडे केली आहे.

“जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले? याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

“मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *