DNA मराठी

DNA Marathi News

maharashtra election comission

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा

Maharashtra Election : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध  घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी सांगितले. काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा Read More »

ahilyanagar police

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद

Ahilyanagar Police : बसमधील महिलांचे पर्स चोरी प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रिलस्टार कोमल काळेला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका मुकुंद पालवे (वय – 39 वर्षे, रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) 19 नोव्हेंबर रोजी बसमधून पाथर्डी येथुन प्रवास करीत असताना अनोळखी महिलेने सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपी महिलास अटक केली. या प्रकरणात कोमल नागनाथ काळे (वय 19) असं अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. तपासात चोरी केलेल्या मुद्देमाल तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) याचेकडे दिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन  पथकाने आरोपी सुजित राजेंद्र चौधर याचा शोध घेत त्याला शेवगाव येथून अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे ही रिलस्टार असुन तिचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद Read More »

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती. दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या  पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   तर दुसरीकडे  मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल Read More »

yeola election

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप

Yeola Election : येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले यानंतर परिसरात तुफान राडा पहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या रुपेश दराडे यांचा कार्यकर्ता येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली असून आणखी रक्कम कुठे याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

abhijeet bichukale

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका

Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले. मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

virat kohli

Virat Kohli on Test Cricket: मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळणार; कोहलीने दिला अफवांना पूर्णविराम!

Virat Kohli on Test Cricket: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शानदार कामगिरी करत 52 वा एकदिवसीय शतक झळकावले आहे. विराटने 120 चेंडूत 135 धावा केल्या  ज्यामध्ये 11 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. त्याच्या शतकामुळे भारताला 8 बाद 349 धावांपर्यंत मजल मारता आली=तर दक्षिण आफ्रिका 332 धावांवर गारद झाली. भारत 17 धावांनी विजयी झाला आणि कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. फक्त एकाच फॉरमॅट खेळणार सामन्यानंतर कोहलीने स्पष्ट केले की तो फक्त एकाच स्वरूपात खेळत राहील.  भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला आणि यानंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता कोहलीने या अफवांना फेटाळून लावत म्हटले की तो नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. कोहलीने स्पष्ट केले की त्याचा खेळ नेहमीच मानसिक राहिला आहे.  सामन्यात उतरताना  तो फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आणि परिस्थितीनुसार आपला डाव जुळवून घेतो. कोहलीने अनुभव आणि मानसिक सतर्कता ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. खेळात तंदुरुस्ती आणि तयारीचे महत्त्व कोहली म्हणाला की त्याची तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी त्याच्या क्रिकेट जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो सामन्यांपूर्वी स्वतःचे दृश्यमान करून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करतो.   या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. विराट कोहलीच्या 135 धावांव्यतिरिक्त, रोहित शर्माने 57 आणि कर्णधार केएल राहुलने 60 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 32 धावा केल्या. मॅथ्यू ब्रिएट्झकेच्या 72 धावा, मार्को जॅन्सेन (39 चेंडू) च्या 70 धावा, तीन षटकार आणि आठ चौकारांसह आणि कॉर्बिन बॉश (51 चेंडू) च्या 67 धावा आणि पाच षटकारांसह, दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 332 धावांवर आटोपला आणि सामना 17 धावांनी गमावला.

Virat Kohli on Test Cricket: मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळणार; कोहलीने दिला अफवांना पूर्णविराम! Read More »

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »

rajesh agarwal

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार

Rajesh Agarwal : सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम विषयामध्ये बी.टेक केले आहे. राजेश अग्रवाल यांनी सेवाकाळात सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उप विशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयुक्त कार्यालयात संचालक, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कृषी आणि मत्स्यव्यवसाय विभागात सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सचिव (अतिरिक्त कार्यभार), वित्त विभागात सचिव, सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागात सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार, वित्त विभागात सचिव (लेखा व कोषागारे)(व्यय – अतिरिक्त कार्यभार), केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागात सचिव, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागात सचिव, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार Read More »