DNA मराठी

DNA Marathi News

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण

Vastu Tips:  तुम्हाला हे माहितीच असेल की वास्तुशास्त्रात दिशांना किती महत्व देण्यात आले आहे. यामुळेच त्याचे नियम देखील स्पष्ट करण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित दिशा असते, जर ती योग्य दिशेने ठेवली तर घरात समृद्धी येते. स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हीही स्वयंपाकघरात या चुका करत असाल तर काळजी घ्या कारण त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.  स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुटलेली भांडी ठेवू नका वास्तूनुसार तुटलेली किंवा रिकामी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच तुटलेल्या भांड्यांचा ग्रहांच्या स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे तुटलेली भांडी घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा घर असो किंवा स्वयंपाकघर, ते नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नका. स्वयंपाकघरातील कचरा दररोज फेकून द्या आणि स्वच्छ ठेवा. घरात किंवा स्वयंपाकघरात धुळीमुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मी कोपते. तुटलेले नळ दुरुस्त करा नळातून टपकणारे पाणी वास्तूमध्ये अशुभ मानले जाते. तुमच्या स्वयंपाकघरातील नळातून पाणी टपकत राहिल्यास ते त्वरित दुरुस्त करा. वास्तविक, नळातून टपकणारे पाणी हे पैशाच्या अपव्ययाचे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकटही येऊ शकते. अन्न कचरा अन्नाची नासाडी करणे हे अशुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे आणि अन्नाची विनाकारण वाया घालवू नये.

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण Read More »

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil News:  प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या  तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचकरा करीता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्‍त समजल्या नंतर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, मा.आ.वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिका-यांनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेबाईक आणि त्याच्या सहका-यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला. यासर्व जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्‍यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पाण्‍यामध्‍ये बुडालेल्‍या  अन्‍य दोन व्‍यक्तिंचा तपास करण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येत असून, धरणातून पाण्‍याचा प्रवाहही आता बंद करण्‍यात आला आहे. याच कारणासाठी युवकांनी केलेल्‍या रस्‍ता रोको आंदोलनासही मंत्री ना.विखे पाटील यांनी भेट दिली. घटना घडल्‍यानंतर पाण्‍याचा प्रवाह कमी करण्‍याच्‍या सुचना आपण यापुर्वीच दिल्‍या होत्‍या परंतू आंदोलकांच्‍या  भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्‍याच्‍या सुचना जलसंपदा विभागाला त्‍यांनी दिल्‍या.

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती Read More »

Mia Khalifa पुन्हा चर्चेत, ‘ते’ ट्विट झालं व्हायरल, म्हणाली, सरकार…

Mia Khalifa: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणारी माजी ॲडल्ट स्टार मिया खलिफा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  मिया खलिफा तिच्या फॅन साठी सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ फोटो शेअर करत असते याचबरोबर आपलं मत देखील बिंदास शेअर करते. तिचा असाच एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.   या ट्विटमध्ये सरकारी शब्द वापरून तिने आपले मनस्वी विचार मांडले आहेत. जो यावेळी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा ट्विट युजर्सलाही खूप विचित्र वाटत आहे.  मियाला काय म्हणायचे आहे हे तिचे चाहते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. 31 वर्षीय मिया खलिफाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक  ट्विट केले आहे ज्याला आतापर्यंत 4.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सरकारचा उल्लेख करत त्यांनी चाहत्यांना मेसेज देते की,  “तुम्ही लवकर उठल्यास, उर्वरित जग जागे होण्याआधी तुम्हाला अंथरुणावर चित्रपट पाहण्याची वेळ मिळेल, हे सरकारला तुम्हाला कळावे असे वाटत नाही,” असं तिने लिहिले. तिच्या अनेक चाहत्यांना हे ट्विट विचित्र वाटत आहे आणि अनेकजण या ट्विटवर आपले मत व्यक्त करत आहेत, अखेर मिया सरकारला काय सांगू इच्छिते हे कोणालाच समजत नाही. मिया खलिफाच्या या ट्विटवर एका यूजरने लिहिले की, ‘कोणते सरकार?’ अंथरुणावर मूव्ही पाहण्यासारख्या छोट्या वैयक्तिक मनोरंजनासाठी लवकर उठणे खरोखरच लक्झरीसारखे वाटू शकते. तेच साधे आनंद तुमचे जीवन चांगले बनवतात.”

Mia Khalifa पुन्हा चर्चेत, ‘ते’ ट्विट झालं व्हायरल, म्हणाली, सरकार… Read More »

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा

Ahmednagar News: येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होणार आहे, मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये झालेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी केली आहे.   उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत बांधकाम व्यवसायिकांनी त्यावरती बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने अनेकांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून पाणी घुसण्याचे प्रकार समोर येत आहे. यामुळे यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच ठिकाणचे पथदिवे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्‌डे झाले आहे.  खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने खड्‌ड्यात जाऊन पाणी उडल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाह होतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या साचलेल्या पाण्यांमध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे डेंगु, मलेरिआ चिकन गुणिया सारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे.  तसेच शहरातील प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व मोबाईल नंबरची माहिती वृत्तपत्रातुन प्रसिध्द करावी आणि पावसाळ्यापुर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदना मार्फत देण्यात आला आहे.

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा Read More »

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या शांतीधाम मंदिर परिसरात घणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.  शांतीधाम मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीकडे महापालिकेकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि शांतीधाम मंदिरच्या ट्रस्टकडून अहमदनगर महापालिकेला वारंवार तक्रार देण्यात आली आहे मात्र तरी देखील अहमदनगर महापालिकेकडून कुठलेही कारवाई होताना दिसत नाही.  या परिसरात वाढत असणाऱ्या घाणीमुळे आजारांचा धोका वाढत चालला आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करीत परिसर स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर…

Coffee Side Effects : जर तुम्ही देखील जेवण करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर चहा किंवा कॉफी घेत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या चहा आणि कॉफीच्या सेवनात संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच, ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या सहकार्याने भारतभर निरोगी खाण्याच्या सवयींना चालना देण्याच्या उद्देशाने 17 नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे वैविध्यपूर्ण आहार आणि सक्रिय जीवनशैलीच्या महत्त्वावर विशेष भर देतात. चहा आणि कॉफीचे सांस्कृतिक महत्त्व मान्य करताना वैद्यकीय तज्ज्ञांनी अतिसेवनाच्या संभाव्य आरोग्य धोक्यांचा इशारा दिला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधकांनी नोंदवले की चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबनास कारणीभूत ठरते. म्हणून, ICMR ने त्यांच्या वापरामध्ये संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे लोकप्रिय पेयांमध्ये कॅफीन सामग्री देखील हायलाइट करतात. 150 मिली ब्रूड कॉफीमध्ये 80-120 मिलीग्राम, इन्स्टंट कॉफीमध्ये 50-65 मिलीग्राम आणि चहामध्ये 30-65 मिलीग्राम कॅफिन असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आरोग्यावर संभाव्य नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी दररोज कॅफिनचे सेवन 300 mg पर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करते. वैद्यकीय संस्था जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर चहा किंवा कॉफी टाळण्याची शिफारस करते, कारण त्यात टॅनिन असतात, ज्यामुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते. टॅनिन पोटात लोहाशी बांधतात आणि ते शोषून घेणे कठीण करतात, ज्यामुळे लोहाची कमतरता आणि ॲनिमिया सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती देखील होऊ शकतात.

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर… Read More »

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला

Ajit Pawar News : स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता असा टोला उपुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी निलेश लंके यांना लावला.   जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.  कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्‍यात आलेल्‍या जाहिर सभेत उपमुख्‍यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे, बाळासाहेब नाहटा, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले पाटील, मंगलदास बांगल, बाळासाहेब शिंदे याच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.  महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता  निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण  आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही.  यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्‍दात त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराचा समाचार घेतला.  राज्यात सुजय विखे यांच्या पंजोबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि अख्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला आहे. त्यांचा नातू तरूण, तडफदार नेता डॉ. सुजय विखे पाटील हे लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडतील यामुळे त्यांना येत्या १३ मे रोजी अनु. क्र. ३ चे कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहायता करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला Read More »

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Ahmednagar News: विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्याबाबत केलेले वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे यांना मान्‍य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब च्‍या कुटूंबाच्‍या पालन पोषणाची जबाबदारी वडेट्टीवारांनी घ्‍यावी असा टोलाही त्‍यांनी लगावला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून पुढील चार दिवस जागृकतेने काम करण्‍याचे आवाहन केले. तसेच मतदाना पर्यंतच्‍या नियोजनाच्‍या सुचनाही त्‍यांनी दिल्‍या. याप्रसंगी खा.संजय काका पाटील, मा.आ.आशिष देशमुख, मा.खा.विकास महात्‍मे, आ.मोनीका राजळे, जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्‍यक्ष अभय अगरकर यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.  आपल्‍या भाषण आ.बावनकुळे म्‍हणाले की, यंदाची लोकसभेची निवडणूक ही २०४७ पर्यंतच्‍या विकसीत भारतासाठीची निवडणूक आहे. आपले प्रत्‍येक मत हे देशामध्‍ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे. चार लोकांना घर देणार आहे, सुर्य घर निर्माण करणार आहे. आणि १३ तारखेची निवडणूक वन नेशन वन इलेक्‍शन आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्‍यासाठी सुध्‍दा खुप महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे या निवडाणूकीत देशातील पुर्ण जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नगर येथे येवून प्रधानमंत्र्यांनी आपल्‍याला नमस्‍कार केला असल्‍याने विकसीत भारताच्‍या मतदानाची अहुती शंभर टक्‍के मतदान घडवून आपण द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपाचे संकल्‍प पत्र प्रत्‍येक घरी जावून द्यावे असे सुचित करुन, प्रधानमंत्री समर्पित भावनेने देशासाठी काम करीत आहेत. मागील दहा वर्षे दिवाळीचा सण सुध्‍दा सैनिकांसोबत जावून ते साजरा करतात. कोव्‍हीड सं‍कटातही देशातील नागरीकांची त्‍यांनी सेवा केली. मात्र दुसरीकडे देशावर संकट आणि  आपत्ती आली की, राहुल गांधी परदेशात पळून जातात. अशी टिका करुन, कॉंग्रेसचे नेते आता अफजल कसाबची बाजू घेवून बोलू लागले आहेत. वडेट्टीवर यांनी केलेले वक्‍तव्‍य हा शहीद झालेल्‍या जवानांचा अपमान आहे.  एवढेच जर वडेट्टीवारांना पाकीस्‍तानचे  प्रेम असेल तर त्‍यांनी कसाबच्‍या  कुटूंबियांचे पालन पोषण करण्‍याची जबाबदारी घ्‍यावी असा टोला लगावून त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याबाबत शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे अद्यापही बोलायला तयार नाहीत उध्‍दव ठाकरे मुख्‍यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधीमंडळात आले. त्‍यांनी हातात कधी पेन घेतल्‍याचा आपण पाहीले नाही. कोव्‍हीड संकटातही फेसबुकवर दिसणारे उध्‍दव ठाकरे गरम पाणी पेऊन झोपून घ्‍या असा सल्‍ला जनतेला देत होते. दुसरीकडे मात्र मोदीजींनी केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून खा.सुजय विखे पाटील आणि आपल्‍या सारखे कार्यकर्ते लोकांसाठी सेवा करीत होते. परंतू त्‍याचे प्रदर्शन आम्‍ही कधी केले नाही.  डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे. देशाच्‍या  विकास प्रक्रीयेला साथ देण्‍यासाठीच अजीत पवारही आता या महायुतीत सहभागी झाले आहेत. विकसीत भारताच्‍या सं‍कल्‍पनेला प्रत्‍येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍याने पुढील चार दिवस मोदीजींचा पाठबळ देण्‍यासाठी द्यावे असे आवाहन तयांनी शेवटी केले. याप्रसंगी दिलीप भालसिंग, अभय आगरकर यांची भाषण झाली.

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल Read More »

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध

Ahmednagar News: न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्राथना केली.    नगर मधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी  असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.  तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास   खा. सुजय विखे  यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध Read More »

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप  दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आवाहन केले. त्‍यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला.  आपली भूमीका विषद करताना प्रा.मच्छिंद्र सक्‍टे म्‍हणाले की, राज्‍यातील महायुती सरकारने आमच्‍या मागणी प्रमाणे आण्‍णाभाऊ साठे यांचे स्‍मारक उभे करण्‍यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. तसेच घाटकोपर येथील त्‍यांचे निवास्‍थान राष्‍ट्रीय स्‍मारक करण्‍यासाठी सुध्‍दा ३०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचा शासन आदेश जारी केला  आहे. लहुजी वस्‍ताद साळवे यांच्‍या स्‍मारकाची तसेच समाजाच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी बार्टीच्‍या धर्तीवर आर्टीची स्‍थापना करण्‍याची मागणीही महायुती सरकारनेच पुर्ण केल्‍यामुळे लोकसभा निवडणूकीत महायुतीला पाठींबा देण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   विकासाच्‍या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्‍यासाठी महाविकास आघाडीने संविधान बदलाचा विषय खोडसाळपणे पुढे आणला आहे असा आरोप करुन, प्रा.सक्‍टे यांनी सांगितले की, संविधानात बदल करता येईल परंतू ते रद्द करता येणार नाही. घटनेचा गाभा कोणालाही बदलता येणार नाही ही भूमिका स्‍पष्‍ट असताना सुध्‍दा केवळ समाजाची दिशाभूल करण्‍याचे काम विरोधकांकडून होत आहे. यावर सामान्‍य जनता विश्‍वास ठेवणार नाही. कारण सर्व दलित नेते महायुती सोबत आहेत. पवार आणि ठाकरेंवर आता विश्‍वास राहीलेला नाही. त्‍यामुळेच दलित महासंघ आणि मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवारांच्‍या पाठीशी खंबरीपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी संजय चांदणे, अरुणा कांबळे यांच्‍यासह जिल्‍ह्यातील अन्‍य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल Read More »