DNA मराठी

DNA Marathi News

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार

Ahmednagar News:  अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय साहाय्यकाने लाच मागितल्या प्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळे शहर खळबळ उडाली आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते.  त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता या प्रकरणांमध्ये  19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे.  संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कारल्याने संयुक्त कारवाई केली आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.  आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशीर झाला आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.  तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचेही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार Read More »

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे

PNB Bank: जर तुमचे ही पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  माहितीनुसार, PNB त्यांच्या काही ग्राहकांना नोटीस पाठवत आहे ज्यांनी बर्याच काळापासून खाते वापरले नाही. अशा परिस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बचत खात्याची सुरक्षितता लक्षात घेऊन पंजाब नॅशनल बँकेने हा निर्णय घेतला आहे. पीएनबीने आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना अनेक वेळा माहिती दिली आहे. PNB ही खाती बंद करू शकते तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असल्यास प्रथम त्याची स्थिती तपासा. पंजाब नॅशनल बँक या महिन्याच्या अखेरीस 30 जून 2024 पर्यंत अशी खाती बंद करणार आहे. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच, ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये शिल्लक आहेत. तो बंद करणार आहे.  अशा ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस पाठवल्यानंतर एक महिन्याने ती खाती बंद केली जातील. तुम्हाला ती खाती ॲक्टिव्ह ठेवायची असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या. अन्यथा, ही बँक खाती 1 जुलै 2024 रोजी बंद केली जातील.  PNB ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अशा खात्यांचे KYC मिळावे असे कळवले होते. तथापि, बँकेने 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यानंतर 1 जुलैपासून ही खाती बंद करण्यात येणार आहेत. अनेक स्कॅमर अशा खात्यांचा गैरवापर करतात जे ग्राहक बर्याच काळापासून वापरत नाहीत. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 30 एप्रिल 2024 रोजी खात्याची गणना केली जाईल. अशा ग्राहकांना बँकेने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. या खात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही तथापि, बँकेने म्हटले आहे की 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांच्या खात्यांव्यतिरिक्त PMJJBY, PMSBY, SSY, APY, DBT सारख्या विशिष्ट योजनांसाठी उघडलेली अनेक प्रकारची खाती या अंतर्गत बंद केली जाणार नाहीत. केवायसीद्वारे बँक खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकतात बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतर त्यांचे खाते सक्रिय होईल. अधिक माहितीसाठी ग्राहक बँकेला भेट देऊ शकतात.

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे Read More »

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीम ने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणी मधून आणि निर्मिती मधून राज्याच्या पुढे येतोय अस देखील गोवर्धन दोलताडे बोलले , मला या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही , उलट मला आनंद होईल की ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय , सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी  या अनुषंगाने महाराष्ट्रा मधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा , त्याचबरोबर ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय , भरभरून शो वाढत आहेत , प्रेक्षकांन कडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे बोलले , संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल अस वाटते , त्यांच बरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत , या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल यांचं गोष्टी साठी बनवलेला आहे असं अभिनेता रोहन पाटील यांनी मत व्यक्त केलं , यावेळी पत्रकार परिषद ला सह निर्माते रामदास एकनाथ मेदगे , जान्हवी मनोज तांबे , विठ्ठल अर्जुन पचपिंड , नितीन लोहोकरे व सर्वच चित्रपटाची टीम उपस्थित होती , चित्रपटाचा संपूर्ण नफा समाजा साठी जाहीर केला जातोय हा खूप धडाडीचा  निर्णय वाटतो , त्यामुळे चित्रपटाची जास्तच चर्चा वाढत चालली आहे असं दिसत आहे.

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा Read More »

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Israel-Gaza War : गाझासाठी युद्धविराम प्रस्तावित मंजूर, इस्रायल म्हणाला…

Israel-Gaza War: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या इस्रायल हमास युद्धात एक मोठी बातमी समोर आली आहे.  बातमीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गाझामध्ये युद्धबंदीचा अमेरिकेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याअंतर्गत ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलसोबतचा संघर्ष संपवण्याची जबाबदारी हमासवर टाकण्यात आली आहे.   हमासने या प्रस्तावाचे स्वागत केल्याचे बोलले जात आहे. सोमवारी चीनसह 14 सदस्य देशांनी अमेरिकेने आणलेल्या प्रस्तावावर मतदान केले, तर रशियाने मतदानात भाग घेतला नाही. यासह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत गाझामधील शांतता प्रस्ताव तीन टप्प्यांत लागू केला जाईल, ज्यामध्ये कतार आणि इजिप्तचीही भूमिका असेल. अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मतदानानंतर सांगितले की, “आज या परिषदेने हमासला स्पष्ट संदेश दिला आहे. युद्धविराम करार स्वीकारा.” इस्रायलने आधीच सहमती दर्शवली आहे लिंडा थॉमा-ग्रीनफिल्ड म्हणाल्या, “इस्रायलने या करारासाठी आधीच सहमती दर्शविली आहे आणि जर हमासने तसे केले तर आज लढाई थांबू शकते.” ते म्हणाले, “इजिप्त आणि कतार यांनी यूएसला आश्वासन दिले आहे की ते हमासशी रचनात्मकपणे काम करत राहतील आणि इस्त्रायलने देखील आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी अमेरिका मदत करेल, जर हमास या कराराचे पालन करत असेल तर स्वीकार करा.” युद्ध संपेल इस्रायली मुत्सद्दी रीट शापीर बेन-नाफ्ताली यांनी कौन्सिलला सांगितले की, “हमासने ओलीस सोडले आणि आत्मसमर्पण केले तर युद्ध संपेल. एकही गोळी चालणार नाही.” अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या इस्रायल दौऱ्यावर येताच परिषदेचा हा प्रस्ताव आला आहे. बेनी गँट्झ यांनी नेतान्याहू यांच्यावर हा आरोप केला आहे रविवारी, इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले विरोधी पक्षनेते बेनी गँट्झ यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर ओलीसांना परत आणण्याऐवजी आणि युद्ध संपवण्याऐवजी त्यांच्या राजकीय हितांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला होता. यासह त्यांनी राजीनामा दिला. याआधी शनिवारी इस्रायली लष्कराने सांगितले होते की, गाझामधील हमासच्या ताब्यात असलेल्या भागातून त्यांनी   चार ओलीसांची सुटका केली आहे. बेन-नफ्ताली म्हणाले, “ओलिसांना सोडण्यास हमासने नकार दिल्याने हे सिद्ध होते की बंधकांना परत करण्याच्या प्रयत्नात लष्करी माध्यमांचा समावेश असणे आवश्यक आहे आणि हे कसे साध्य झाले ते या शनिवारी सिद्ध झाले.” रियाद मन्सूर यांनी हे वक्तव्य केले कौन्सिल चेंबर्सच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना पॅलेस्टाईनचे निरीक्षक रियाद मन्सूर म्हणाले, “आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना या ठरावाची अंमलबजावणी कशी होईल हे पाहायचे आहे.” याशिवाय ते म्हणाले की, “आम्ही मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमावताना पाहिले आहे.” खुनांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. 36000 पॅलेस्टिनी मारले गेले हमास-नियंत्रित गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 36,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. थॉमस-ग्रीनफिल्डच्या मते, सुरक्षा परिषदेने मंजूर केलेली योजना सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने सुरू होईल ज्यामध्ये इस्रायली कोठडीतून पॅलेस्टिनींच्या सुटकेच्या बदल्यात महिला, जखमी आणि वृद्धांसह इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल. यानंतर इस्रायलला गाझामधील लोकवस्तीच्या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे लागेल आणि नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली जाईल.

Israel-Gaza War : गाझासाठी युद्धविराम प्रस्तावित मंजूर, इस्रायल म्हणाला… Read More »