DNA मराठी

DNA Marathi News

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

israel iran war

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी

Israel-Iran War : मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक :आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत :​टोल फ्री क्रमांक : १०७०​ फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३​ई- मेल : controlroom@gov.in​ तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत, त्यांच्याबाबतची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक : ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०​टोल फ्री क्रमांक: १०७७​परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना :१. सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.२. भारतीय दूतावास / कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.३. आपले लोकेशन (ठिकाण) आणि सद्यस्थितीची माहिती कुटुंबाला सतत कळवावी.४. मोबाईलची बॅटरी चार्ज राहील याची काळजी घ्यावी आणि पासपोर्ट-व्हिसासह सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.५. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.६. भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध : तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सुचवण्यात आले आहे.

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी Read More »

israel iran war

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी

Israel-Iran War : इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धामध्ये काही भारतीयांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ओमानच्या मुसंदम किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर झालेल्या भयानक हल्ल्याने जगाचे लक्ष वेधले आहे. या संघर्षाचे थेट बळी ठरलेल्या जहाजावर पंधरा भारतीय क्रू मेंबर्स होते. पश्चिम आशियातील तणाव जागतिक व्यापार मार्गांसाठी कसा मोठा धोका बनला आहे हे या घटनेवरून दिसून येते. ओमानच्या किनाऱ्याजवळ भयानक हल्ला मुसंदम द्वीपकल्पाबाहेर झालेल्या या हल्ल्याने त्याच्या भौगोलिक स्थान आणि तीव्रतेमुळे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे. “स्कायलाईट” हा भव्य पलाऊ-ध्वजांकित तेल टँकर ओमानच्या खासाब बंदराच्या उत्तरेस फक्त पाच नॉटिकल मैल अंतरावर जात असताना अचानक हल्ला करण्यात आला. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने पुष्टी केली आहे की या तणावाच्या काळात ओमानच्या इतक्या जवळ व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जहाजावर एकूण 20 क्रू मेंबर्स हल्ल्यानंतर लगेचच, ओमानच्या सुरक्षा एजन्सींनी एक प्रचंड आणि अत्यंत सक्रिय बचाव मोहीम सुरू केली. वृत्तानुसार, जहाजावर 20 क्रू मेंबर्स होते, ज्यात 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिक होते. सर्व 20 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवण्यात आले ही दिलासादायक बाब आहे. या हल्ल्याच्या अचानकपणामुळे आणि स्फोटाच्या आवाजामुळे सर्व क्रू मेंबर्सना गंभीर दुखापत झाली. जखमी सदस्यांवर उपचार सुरुवातीच्या अहवालांनुसार, या हल्ल्यात चार क्रू मेंबर्सना वेगवेगळ्या प्रमाणात दुखापत झाली. काहींना गंभीर दुखापत झाली, तर काहींना किरकोळ. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे. जहाजावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता की नाही हे सुरक्षा यंत्रणांनी अद्याप निश्चित केलेले नाही. शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका ओमानच्या इतक्या जवळ झालेला हा हल्ला संपूर्ण आंतरराष्ट्रीय शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका आहे. मुसंदम द्वीपकल्प हा एक धोरणात्मक आणि संवेदनशील क्षेत्र आहे ज्यातून जगातील तेल व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग जातो. येथे हल्ला झाल्यास आता कोणताही समुद्री मार्ग सुरक्षित नाही. भारत सरकार या गंभीर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण हजारो भारतीय खलाशी या धोकादायक सागरी मार्गांवर तैनात आहेत.

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान  अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई आणि बारामती येथे त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. यानंतर आता रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे. तर आता रोहित पवार यांच्या  समर्थनात मनसे प्रमुख राज ठाकरे उतरले असून त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. अनेक संशयाची भूत फिरत आहे. अपघात हा धोक्याचे झाला का? हे समजत नाही. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी एफआयआर द्यायला गेले पण ती घेतली नाही इथे संशयाची सुई निर्माण झाली. मरीन ड्राइव्ह येथे एफआयआर टाईप करताना DCP येऊन  नाही म्हणतात. जर घरच्या संशय आहे तर मग का एफआयआर नाही? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  सुनेत्रा वहिनी यांचे पती होते. मग त्यांनी पण याबाबत पुढाकार घ्यायला हवे. काय काळ बेर आहे ? याबाबत संशय निर्माण होत आहे. जर काही संशय आहे तर चौकशी व्हायला हवी ब्लॅक बॉक्स बाबत पण कळले नाही. सरकार संशयाची भूत नाचवत आहे असे दिसून येत. एफआयआर का नोंदवून घेतले नाही. हा मुळात प्रश्न आहे. रोहित पवार यांचा एफआयआर नोंदवून गेला जात नसेल तर सामान्य माणसाचे काय? त्रुटी काही असतील ते मांडले जात नसेल तर काय उपयोग. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर यात संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असे वाटत आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

img 20260227 wa0010

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित

Radhakrishnan Vikhe Patil: अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून, आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च काढण्यात येत होता. या मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी, कामगार, पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस, वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवेळ परिचर आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेर येथून निघालेला लाँग मार्च काल सायंकाळी निझर्णेश्वर येथे पोहोचला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलकांशी सातत्याने संपर्क साधून मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आंदोलक व विविध विभागांचे मंत्री यांच्यात यशस्वी संवाद घडवून आणला होता. या बैठकीमध्ये आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. निझर्णेश्वर येथे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी अरुण उंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर उर्वरित मागण्याही सरकारने मान्य केल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची प्रशासनाची विनंती आंदोलकांनी मान्य केली. अर्धवेळ परिचारकांच्या मानधनात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, शालेय पोषण आहार मदतनिसांचे मानधनही वाढविण्यास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी आदिवासी भागाला मिळावे म्हणून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाला दिलेल्या आदेशाचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे. बांधकाम कामगारांना आता आरोग्य विमा योजनेतून सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे सुकर झाला आहे. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आंदोलकांना दिलासा दिला. या निर्णयाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तसेच आंदोलकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित Read More »

pratap sarnaik

महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर; मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन ‘ आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे . मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती आहे. महाराष्ट्राला मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला असून संपूर्ण राज्यातील मालवाहतुकीला वेग मिळाला आहे. PM गतिशक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ आणि परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय Messe Muenchen India आयोजित ‘Air Cargo India’ आणि ‘Transport Logistics India’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे उद्योग नेते, धोरणकर्ते, जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकाच व्यासपीठावर येत असून सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना मिळत आहे. “महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगत मंत्री सरनाईक यांनी राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर; मंत्री प्रताप सरनाईक Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange : काही दिवसांपूर्वी परभणीच्या सहजपूर जवळील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या विरोधामुळे शेतकऱ्यांवर पोलीस बळ वापरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर शेतकरी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची की नाही हे ठरवावे. आम्ही महसूल मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.” अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.” मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने जीआर काढला, पण अधिकारी- कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत, परंतु प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारने परिपत्रक काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजेत. तसेच सातारा व औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटवावा.” मनोज जरांगे पाटील यांनी इशाराही दिला की, “जून पर्यंत सरकारने काय केले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मराठा समाजाने भाजपला सत्तेत बसवले आहे, जर सन्मान दिला नाही तर 2029 मध्ये पायउतार करावा लागेल.”

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा Read More »

Nitesh Rane 1024x875

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

Nitesh Rane: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यापैकीच मुंबई आणि कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम आहे. त्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्चपासून पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला मार्ग रो रो सेवेचा असेल.येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे मार्ग यामध्ये वाढवणार आहोत असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीट चे दर काय आहेत. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रोरो सेवेला मिळत आहे. कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंग च्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत.कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो.आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार. रो रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतरच काही ट्रायल केल्यानंतर हि सेवा सुरू करत आहोत. १ मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील. आपण त्या बोटीवर काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून काही लोकांना समुद्र प्रवासाचा होणारा त्रास झाल्यास उपचार मिळेल.पर्यावरण पूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र

Prajakt Tanpure :  नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले आहे आता याच धर्तीवर ती राहुरी मध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला असून शेतकरी व नागरिकांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर हा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना बळी गेला आहे प्रशासनाकडून केवळ नुकसान भरपाई दिली जात असली मात्र नागरिकांचा बळी जात असल्याने आता असंतोषाची भावना तयार होत आहे. राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर शेतकरी हे एकवटले व केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा तातडीने बदल करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्या करण्यात आलेली पत्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे कुत्रंप्रमाणे बिबटेही रस्त्यावर फिरतील बिबट्यांची वाढती संख्या पाहता ज्याप्रमाणे रस्त्यावरती कुत्रे फिरत आहेत तर येणाऱ्या काळात बिबटे ही तसेच रस्त्यावर फिरतील सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व बिबट्यांबाबत ठोस कारवाई कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुरीचे माजी आमदार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला आहे. बिबट्याला घेऊन आंदोलन बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची जीवन अत्यंत धोक्यात आले असून या व्यथा मांडण्यासाठी राहुरी मध्ये आंदोलन पुकारण्यात आले यावेळी बिबट्याची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांना घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान हा केवळ प्रतीकात्मक बिबट्या आहे उद्या खराब बिबट्या घराशीला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित शेतकऱ्यांनी केला यामुळे केंद्राने यावरती तातडीने निर्णय घ्यावा यासाठी थेट मोदींना पत्र पाठवण्यात आलेली आहे यावर आता काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र Read More »

pathardi

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी

Pathardi Crime : शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय ३४, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) घरासमोर उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. शेख यांनी विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड, संदीप बडे,संदीप नागरगोजे ,भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत अनिकेत शामवेल शिंदे वय २२ रा. शितलानगर देहूरोड पुणे याचे सह आणखी दोघा अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी Read More »