Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा
Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे. सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे. या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.
Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »