DNA मराठी

DNA Marathi News

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेली नाही. अशी टीका माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न आण्याचा प्रयत्न केला.आज स्वतः शरद पवार त्यांना भेटायला जाणार आहे. आरोपीचा प्रत्यक्ष रित्या सबंध आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशी प्रतिक्रया खासदार लंके यांनी केली. तसेच याला राजकीय रंग ना देता ज्याचा प्रत्यक्ष सबंध आहे त्यांच्यावर करवाई झाली पाहिजे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे. अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी एक की दोन?आमचे नेते जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असेलसुप्रिया सुळे ज्यांच्या बाजूने असतील त्यांच्या बाजूने आम्ही असू. निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या तेव्हा सोडून द्यायच्या असतात. असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळतर राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळाला पाहिजे होता असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळ. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे होती. भुजबळ यांना चांगल खात मिळायला पाहिजे होत. ते एक ताकदीचे नेते आहेत. स्पष्ट वक्ता आहेत भुजबळ जे पोटात ते ओठात. असेही निलेश लंके म्हणाले. तसेच भुजबळ आमच्या पक्षात आलेच तर स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका Read More »

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन

Rey Misterio Sr Passes Away: WWE स्टार रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रे मिस्टेरियो सीनियर हे WWE स्टार रे मिस्टेरियो जूनियरचे काका होते. रे मिस्टेरियो सीनियरने वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि Lucha Libre AAA वर्ल्ड वाइड यासह अनेक संस्थांसोबत टायटल जिंकले होते. रे मिस्टेरियो सीनियर यांनी द ग्रेट खली आणि जॉन सीनासारख्या अनेक दिग्गजांना टक्कर दिली होती.रे मिस्टेरियो सीनियरला पराभूत करणे या मोठ्या दिग्गजांसाठीही सोपे नव्हते. Lucha Libre AAA ने रे मिस्टेरियो सीनियर यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “आम्ही मिगेल एंजल लोपेझ डायस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो, ज्यांना रे मिस्टेरियो सीनियर म्हणून ओळखले जाते. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. आम्ही तुम्हाला सांगूया की रे मिस्टेरियो सीनियरच्या कुटुंबीयांनी 20 डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. 2009 मध्ये WWE चा निरोप घेतलारे मिस्टेरियो सीनियरची WWE कुस्ती कारकीर्द प्रदीर्घ होती. तथापि, 2009 मध्ये, त्याने वयाच्या 51 व्या वर्षी WWE कुस्तीमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर, त्याचा भाचा रे मिस्टेरियो जूनियर WWE मध्ये त्याचा वारसा पुढे नेत आहे.

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन Read More »

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra IMD Alert : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे त्या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. गुरुवारपर्यंत  थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी शेकोटीच्या आधार घेतला आहे, थंडीमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनिया, हृदयाच्या आजारांचे विकार, हायपरटेंशन, हायपोथर्मिया आणि इतर श्वसन संक्रमण यांचा समावेश होतो.थंडीमुळे उद्भवू शकणार्‍या काही प्रमुख समस्या: श्वसन संक्रमण: थंडीमुळे श्वासनलिका आणि फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. हृदयाच्या आजारांचे विकार: थंडीमुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयाच्या आजारांच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हायपरटेंशन: थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये संकुचन होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हायपोथर्मिया: शरीर तापमानात खूप कमी झाल्यास हायपोथर्मिया होऊ शकतो. हे एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. इतर समस्या: थंडीमुळे त्वचेची समस्या, स्नायूंचे दुखणे, सांध्यांची दुखणे आणि मनोवैज्ञानिक समस्या देखील उद्भवू शकतात. थंडीपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी: उबदार कपडे घाला: थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी उबदार कपडे घाला. शरीर उबदार ठेवा: गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि उबदार खाद्यपदार्थ खा. घरात उबदार वातावरण ठेवा: घरात उबदार वातावरण ठेवा. बाहेर जाण्याचे टाळा: शक्यतो थंडीत बाहेर जाण्याचे टाळा. नियमित व्यायाम करा: व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. पर्याप्त झोप घ्या: झोप पुरेशी घेणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला थंडीमुळे कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या Read More »

Satyajeet Tambe : कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, सभागृहात आमदार सत्यजीत तांबेंची मागणी

Satyajeet Tambe : केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल ७ हजार ५२१ रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे कापूस उत्पादक त्याचा लाभ मिळत नाही. सीसीआय १२% पेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. त्यामुळे ही अट शिथील करून १८% करण्यात यावी आणि कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. यंदा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कापसाचे प्रती हेक्टरी उत्पन्न एक ते दोन क्विंटलच झाले असून त्याच कापूस खरेदी केंद्र देखील उशिरा सुरू झाले आहे. त्यातदेखील आर्हता पाहूनच कापसाला भाव देत असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याच्या भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात व्यक्त केल्या. यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, सीसीआयच्या केंद्रावर माल विक्रीसाठी आणताना हमीभावासाठी काही निकष निश्चित करुन देण्यात आले आहेत. आर्द्रतेचे प्रमाण जर ८ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना ७ हजार ५२१ रुपयांचा हमीभाव देण्यात येणार आहे, तर १२ टक्क्यांपर्यंतची आर्द्रता राहिल्यास त्या शेतकऱ्यांना ७ हजार १२१ रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्तीची आर्द्रता राहिल्यास त्यात अजून दर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खुल्या बाजारातील कापूस खरेदीला सुरुवात करून खासगी व्यापाऱ्यांची स्पर्धा सुरू केली होती. परंतु, शेतकऱ्यांनी सीसीआय कडेही पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीसीआयच्या खरेदीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांच्यापेक्षा अधिक दर मिळावा, अशी अपेक्षा आहे.

Satyajeet Tambe : कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, सभागृहात आमदार सत्यजीत तांबेंची मागणी Read More »

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज?

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे. 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज? Read More »

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले आहे. यात 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 16 राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुढील 1-2 दिवसात खाते वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर मागच्या सरकारमध्ये असणाऱ्या उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. या नेत्यांनी घेतली शपथशिवसेना मंत्री1 गुलाबराव पाटील2 दादा भुसे3 संजय राठोड4 उदय सामंत5 शंभुराजे देसाई6 संजय शिरसाट7 प्रताप सरनाईक8 भरतशेठ गोगावले9 प्रकाश अबिटकर राज्यमंत्री10 आशिष जैस्वाल11 योगेश कदम भाजप मंत्री 1 चंद्रशेखर बावनकुळे2 राधाकृष्ण विखे पाटील3 चंद्रकांत पाटील4 गिरीश महाजन5 गणेश नाईक6 मंगलप्रभात लोढा7 जयकुमार रावल8 पंकजा मुंडे9 अतुल सावे10 अशोक उईके11 आशिष शेलार12 शिवेंद्रराजे भोसले13 जयकुमार गोरे14 संजय सावकारे15 नितेश राणे16 आकाश फुंडकर राज्यमंत्री 317 माधुरी मिसाळ18 पंकज भोयर19 मेघना बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री 1 हसन मुश्रीफ2 धनंजय मुंडे3 दत्ता भरणे4 आदिती तटकरे5 माणिकराव कोकाटे6 नरहरी झिरवाळ7 मकरंद पाटील8 बाबासाहेब पाटील राज्यमंत्री9 इंद्रणिल नाईक

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ Read More »

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

Amrita Khanwilkar : 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली. बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. ” वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी ! Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे वाहन ऊसमाल वाहतूक ट्रक असून उड्डाण पुलाच्या तीव्र वळणावर ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रक पुलावर पलटी होऊन गाडीतील काही माल पुलावरून थेट खाली कोसळला. दरम्यान थंडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पूलाखालील वाहतूक कमी होती त्यामुळे पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली. गेल्या वर्षभरात याच बहुचर्चित उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले असेल तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी Read More »

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ग्राहकांच्या असलेल्या अडी-अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत नाही ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्राहकांच्या विद्यूत विषयक समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्‍हा पातळीवर ऊर्जामित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने या तारांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णहक्क सनद तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतचे फलक लावण्यात यावेत. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सालीमठ यांनी यावेळी केल्या. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, रणजित श्रीगोड, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर उपस्थित होते.

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून

Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय. सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून Read More »