DNA मराठी

DNA Marathi News

Kamalnath In BJP

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?

Kamalnath In BJP : गेल्या काही दिवसांपासून देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के लागत आहे. अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहे. यातच आता आणखीन एक मोठा नेता पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी करत असल्याची माहिती समजली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यानंतर पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेस खासदार मनीष तिवारी भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार ? अफवा सुरू असून तिवारी काँग्रेससोबतचे नाते संपवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे कमलनाथ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असून, हा काँग्रेसला मोठा धक्का असेल. तथापि, मनीष तिवारी यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या भाजपशी संबंध असल्याबद्दलची अटकळ “मूर्खपणा” आहे कारण ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.  काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी काम करत आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अंदाज खोटा आणि निराधार आहे. कमलनाथही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या आवडत्या लोकसभा मतदारसंघ छिंदवाडाला भेट देऊन दिल्ली विमानतळावर पोहोचले. यापूर्वी, काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्याचे राज्य भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांच्या एका पोस्टने कमलनाथ भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवांना आणखी खतपाणी घातले होते. सलुजाने शनिवारी कमलनाथ यांचा मुलगा नकुलसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “जय श्री राम.” नकुलनाथ यांच्या बायोमधून काँग्रेस हा शब्द काढला याव्यतिरिक्त, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या बायोमधून ‘काँग्रेस’ हा शब्द काढून टाकला आहे. तथापि, असे असेल याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसला धक्का दिला  लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी काँग्रेस सोडल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल. त्याच वेळी, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, मिलन देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी पक्ष सोडला.

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश? Read More »

Kamalnath

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ

Congress News:  मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राज्यातील पक्षांना आणि जनतेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचा बडा नेता काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  शुक्रवारी छिंदवाडा येथील जनतेसमोर भाषण करताना कमलनाथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचे समर्थन करा. सत्याला साथ द्या.” कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांचे वक्तव्यही समोर आले असून त्यांनी आजवर संघटनेत ज्या पद्धतीने काम केले आहे, ज्या प्रकारे त्यांचे काँग्रेसशी दीर्घ संबंध आहेत, ते पाहता ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जातील, असे मला वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव आणि कमलनाथ दोन महिन्यांत तीन वेळा बंद दाराआड भेटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री मोहन यादव रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दोघांची भेट सुमारे तासभर चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  तर दुसरीकडे, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांचेही मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणाल्या की, “कमलनाथांनी रामाचा आशीर्वाद घेऊन यावे. विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भाजपमध्ये जावे,” असा सल्ला यांनी दिला आहे.  कमलनाथ काँग्रेसवर नाराज आहेत? काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याने कमलनाथ संतापले होते. खासदार संघटनेतील बदलांवर कमलनाथ खुश नव्हते. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसने हजर राहण्यास नकार दिला असताना कमलनाथ यांना ते आवडले नाही.त्यांनी छिंदवाड्यात प्रभू रामाच्या नावाने पत्रके वाटली आणि काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमांपासूनही अंतर ठेवले होते. कमलनाथ यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अशोक सिंह यांच्या उमेदवारीपासूनही स्वतःला दूर केले होते. नकुल नाथ यांनी घेतला ‘हा’ निर्णय  कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नकुलनाथ हे छिंदवाड्याचे खासदार असून मागील अनेक दिवसांपासून ते त्यांच्या परिसरात जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत.

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ Read More »

Sharad Pawar

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …”

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात आगामी निवडणुकीबाबत एक मोठं विधान केले.   यावर आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट बारामतीतून हल्ला केला आहे. “देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत. “चिन्हाची काळजी करायची गरज नसते. कारण मी १४ निवडणूक लढलो आहे. यात ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवीन येतात. माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावला आहे. “एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतल्यास त्या संघटनेचं अस्तित्व संपल असं होत नाही. कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत, विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवून देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा,” असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …” Read More »

Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय?

Pankaja Munde : दिवसेंदिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. नेमकं कारण काय? या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 61 लाख 47 हजार रुपये रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरली नसल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.  कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. “तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील खात्यात जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय? Read More »

IMG 20240216 WA0009

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा

Sujay Vikhe News : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान, अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  “नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. महसूल मंत्री श्री.विखे पाटील पुढे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन, विविध औद्योगिक संस्था, नाशिक विभागातील सर्व विद्यापीठे यांचा देखील समावेश करण्यात यावा. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तयार करावे. रोजगार मेळाव्याबाबत विविध माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी करावी व नोंदणीसाठी डिजीटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करणे व सदर लिंक जिल्हा परिषद, महानगरपालिका समाज कल्याण विभाग व इतर विभागाच्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी व आपल्या पोर्टलवरील नोंदणीकृत असलेले उमेदवार व उद्योजक/आस्थापना यांना मेळाव्यास सहभागी होणेसाठी प्रोत्साहित करावे असे, असेही श्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील रोजगार मेळव्याच्या तयारीबाबतची माहिती महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना सादर केली. यावेळी श्री.गमे यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्यात एकूण 200 पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून 30 हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच प्राथमिक निवड मध्ये 15 हजार उमेदवारांची निवड होऊन 10 हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क साधून मेळव्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे, श्री. गमे यांनी सांगितले. महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली.

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा Read More »

IMG 20240216 WA0003

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »

IMG 20240216 WA0006

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra News: दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरुपी कायापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा Read More »

IMG 20240215 WA0010

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड

Maharashtra News : अहमदनगरमध्ये  स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी  जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.   दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत  राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” येथे पार पडल्या असून या  राज्यस्तरीय स्पर्धेत ०४ सुवर्ण, ०५ रोप्य व २ रजत असे एकून ११ पदकांची कमाई केली.  त्यामध्ये वयोगट २२ ते २९  चि. बाबू यांनी ५० मी. व २५  मी फ्रीस्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात, प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदकांची कमाई केली.  चि.जयसिंग यादव यांनी वयोगट २२ ते २९ मध्ये २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. चि. दिपक पावरा याने १९  ते २१ या वयोगटात १००  मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविले. तसेच त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. चि. वैभव जाधव यांनी २२ ते २९ या वयोगटात २०० मी. धावणे या  क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाची कमाई केली.  चि. कृष्णा याने १६ ते १८ या वयोगटात १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकांची कमाई केली. चि. दिपेंद्र ढमाले याने २२ ते २९ या वयोगटातील २५ मी. फ्रीस्टाईल जलतरण या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. कुमारी मादुरे महंडुळे हिने २२ ते २९ या वयोगटातील १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची मानकरी ठरली.  चि. अजय काकडे याने २२ ते २९ या वयोगटातील २०० मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. चि. रज्जाक गोच्चू याने १६ ते २१ या वयोगटात २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकाचा मान मिळवला. कुमारी प्रेरणा भाटिया हिने १०० मी. धावणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून सहभाग नोंदवला.  या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धा होत्या. या स्पर्धेत एकूण ३६ जिल्ह्यांतील एकूण ६००   विद्यार्थ्यांनी व १५० प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.  या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे बक्षीस वितरण करण्यासाठी  डॉ. सौ. मेधा सोमय्या (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र), मा. श्री. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर), मा. श्री. भगवान तलवारे (क्षेत्र संचालक महाराष्ट्र), मा. श्री. जितेंद्र ढोले (क्रीडा संचालक SOB), मा. श्री. उदय गोजमगुंडे (संचालक) आदि मान्यवर उपस्थित होते.     अहमदनगर येथील सर्व विजेत्या खेळाडूंचे दक्षिण अहमदनगरचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील, तसेच मा. श्री. राधाकिसन देवढे  (समाज कल्याण अधिकारी अहमदनगर)     सौ. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर) व मा. श्री. डॉ. अभिजीत दिवटे (उपाध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर), यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.   मार्गदर्शन करणारे मा. श्री. डॉ. दिपक अनाप, मा. श्री. डॉ. अभिजीत मेरेकर, व मा. श्री. डॉ. किरण आहेर यांनीदेखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  तसेच या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या स्पर्धक खेळाडूंना त्यांचे  क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री संदीप राहणे सर, श्री हर्षल वाणी, श्री. अमोल चौधरी,  श्री शिरसाट सर, श्री. दत्तात्रेय कोलते सर, सौ. सुशीला जाधव मॅडम इ. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खेळाडूंचे  अभिनंदन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड Read More »

IMG 20240214 WA0004

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर..

Ahmednagar News: केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी १७ कोटी व नगर तालुक्यासाठी २३ कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केले की, हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि माझ्या प्रयत्नांतून ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून काष्टी – खरातवाडी – पेडगावर रस्ता प्रजिमा – ६४ (गौते वस्ती-पेडगाव) आणि चिंबळा – वांगदरी – काष्टी – शिपळकरवाडी कौठा प्रजिमा – ०३ ते अजनुज खरातवाडी रस्ता प्रजिमा – २३७ (वांगदरी-काष्टी) या रस्त्यांचे काम होणार आहे.  तसेच नगर तालुक्यातील रस्ते विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि माझ्या प्रयत्नांतून २३ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीपैकी निंबळक – चास – खंडाळा – वाळुंज – नारायणडोह – पिंपळगाव उज्जैनी – पोखर्डी रस्ता प्रजिमा – १ (कापूरवाडी-पोखर्डी) साठी १५ कोटी रुपये तर टाकळी काझी – भातोडी ते बीड रस्ता प्ररामा – १६ (टाकळी काझी -भातोडी -मदडगाव हद्द) करिता ०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या कामांना देखील झळाळी मिळाली आहे.  यासोबतच पारनेर तालुक्यातील रस्ते विकासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माझ्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीतून रामा ६९ ते वडनेर हवेली – राळेगण सिद्धी रोड प्रजिमा – २१८ रस्ता (वडनेर हवेली ते गटेवाडी) करिता १० कोटी रुपये तर राहाता – लोहारे – मांडवे – पारनेर – श्रीगोंदा रस्ता रामा – ६७ (कुंभारवाडी -सोबळेवाडी, पारनेर, पानोली -राळेगण सिद्धी) साठी ०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांचे काम देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. या रस्त्यांना गती मिळाल्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जनतेच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू असे मत देखील यावेळी खासदार विखेंनी व्यक्त केले.

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर.. Read More »

IMG 20240213 WA0007

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरुडगाव ( भिमवाडी ) येथे सोमवार दि. १२ रोजी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत तालुक्यातील श्रद्धावान उपासक, उपासिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य यांच्या सहकार्याने महिला उपासिका शिबिर आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावताळे कुरुडगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष सुधाकर निळ होते.  बैठकीमध्ये शिबिराच्या आयोजन संबंधी सविस्तर चर्चा झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरुण भोंगळे यांनी शिबिरासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महासचिव बाळासाहेब गजभिव, बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक विजय हुसळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी बाळासाहेब नीळ, सिद्धार्थ सोनवणे, रवींद्र निळ, माजी श्रामनेर विनोद घाडगे, माजी श्रामनेर निवृत्ती नीळ, आजिनाथ निळ, रोहिदास निळ, प्रतीक नीळ, अलका निळ, आकांक्षा नीळ, वंदना नीळ इत्यादी श्रद्धावान उपासक-उपासिका या बैठकीसाठी उपस्थित होते.  तसेच येणाऱ्या दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी परवानगी व केंद्रीय शिक्षिकेच्या मागणीचे पत्र जिल्हा शाखेकडे पाठविण्यात आले तसेच या शिबिराचा शेवगाव तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे यांनी केले आहे.

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे Read More »