Dnamarathi.com

Congress News:  मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राज्यातील पक्षांना आणि जनतेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचा बडा नेता काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

शुक्रवारी छिंदवाडा येथील जनतेसमोर भाषण करताना कमलनाथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचे समर्थन करा. सत्याला साथ द्या.” कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांचे वक्तव्यही समोर आले असून त्यांनी आजवर संघटनेत ज्या पद्धतीने काम केले आहे, ज्या प्रकारे त्यांचे काँग्रेसशी दीर्घ संबंध आहेत, ते पाहता ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जातील, असे मला वाटत नाही.

महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव आणि कमलनाथ दोन महिन्यांत तीन वेळा बंद दाराआड भेटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री मोहन यादव रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दोघांची भेट सुमारे तासभर चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. 

तर दुसरीकडे, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांचेही मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणाल्या की, “कमलनाथांनी रामाचा आशीर्वाद घेऊन यावे. विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भाजपमध्ये जावे,” असा सल्ला यांनी दिला आहे. 

कमलनाथ काँग्रेसवर नाराज आहेत?

काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याने कमलनाथ संतापले होते. खासदार संघटनेतील बदलांवर कमलनाथ खुश नव्हते. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसने हजर राहण्यास नकार दिला असताना कमलनाथ यांना ते आवडले नाही.त्यांनी छिंदवाड्यात प्रभू रामाच्या नावाने पत्रके वाटली आणि काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमांपासूनही अंतर ठेवले होते. कमलनाथ यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अशोक सिंह यांच्या उमेदवारीपासूनही स्वतःला दूर केले होते.

नकुल नाथ यांनी घेतला ‘हा’ निर्णय 

कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नकुलनाथ हे छिंदवाड्याचे खासदार असून मागील अनेक दिवसांपासून ते त्यांच्या परिसरात जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *