DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20240226 WA0001

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे  संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली. तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation Photo

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी आंदोलन सूरू झाले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार आज नगर शहरातील विविध भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.  या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शहरातील एमआयडीसी परिसरातील बायपास चौकात मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला.   यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गोरख दळवी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.  एकदिवशीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा केसानी गळा कापला आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केले नाही. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची फसवणूक करत आहे, अशी प्रतिक्रिया गोरख दळवी यांनी DNA मराठीशी बोलताना दिली.

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात Read More »

IMG 20240224 WA0002

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News: नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.  अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.  सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240222 WA0005

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे.   या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे. यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी Read More »

Typhoid

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा

Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल. टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.  या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार. टायफाइडची लक्षणे  ताप येतो भूक लागत नाही डोकं दुखणं थंडी जाणवते जास्त अशक्तपणा जाणवणं अतिसाराची समस्यां छातीत जळजळ होणं बद्धकोष्ठता होणं टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार  तुळस  तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या. सफरचंदाचा रस सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल. लसूण लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं. लवंग लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार. मध मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा Read More »

IMG 20240221 WA0004

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील

DNA Marathi News : महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप सुरू आहे. पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे व अभय काका आव्हाड यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अजय रक्ताटे, सुभाष बेर्डे, काशिनाथ लवांडे, विष्णुपंत अकोलकर, अंकुश चितळे,  प्रतिक खेडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद व महाविंग यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आर्थिक व सक्षमीकरण केले जात आहे. मागील सरकारच्या काळात अशा पद्धतीचा उपक्रम का नाही घेता आला? यामध्ये टक्केवारी भेटणार नाही या आशेने विरोधक अशा पद्धतीचे उपक्रम राबवत नसतील.  याउलट फूड प्रोसेसिंग युनिटसाठी दहा टक्के रक्कम ही बचत गटांनी भरायची असते. पण ते त्यांना भरू देता आम्ही व्यक्तिगत खर्चातून प्रत्येक बचत गटाचे 40 हजार रुपये भरले आहेत, ही  दानत लागते असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले. महायुती सरकारच्या काळात महिला बचत गट सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी महिलांना वार्षिक नियोजन मधून 40 कोटी खर्च करून महिला बचत गटासाठी पैसे देण्यात येणार आहेत असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले.  यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की, आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यानुसार केंद्र सरकार स्वतः नाफेड आणि केंद्रीय सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट करणार आहे. याबाबत करार करून केंद्र सरकारने दुसऱ्या शेजारील देशाला कांदा निर्यात कण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो तसाच आहे, मात्र कांदा हा निर्यात होणार याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की, काही माध्यमांद्वारे पूर्णतः गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टला मंत्री समितीकडून मान्यता मिळाली आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी.  केंद्र सरकारद्वारे शेजारच्या देशांनी केलेल्या मागणीनुसार कांदा निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्या देशामध्येच उचित भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240220 WA0003

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

Sujay Vikhe News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.  या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.  या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने  कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.  या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे,  हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी  उपस्थित होते. यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.  यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र  विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही  कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.  माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी  मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे Read More »

IMG 20240220 WA0001

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा

Ahmednagar News:  यावर्षी देखील भिंगार येथे सकल मराठा समाजाचे वतीने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली.  या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा व तसेच उंट, घोडे,मावळे, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रॅली विजय लाईन चौक ते वृंदावन मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होणार आहे यावेळी विविध मान्यवरांच्या सत्कार देखील करण्यात आले.  यावेळी राजेश काळे,संजय सपकाळ,संपत बेरड, शामराव वागस्कर,पंकज चव्हाण,गणेश सातकर, श्रीकांत शिरसागर, भूषण थोरात, अंकुश शिंदे, गणेश शिंदे, हर्षद काळे, अरुण चव्हाण, अमोल वागस्कर, कांता बोटे, अभिजीत सपकाळ, गणेश शिंदे,पंकज चव्हाण भूषण थोरात, मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्यावतीने लेझीम, जानपदक, ढोल पथक, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मात्र सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा Read More »

Rain 1

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे. येथे हवामान कसे असेल? IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.   सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो. इथे मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली..

Sujay Vikhe :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.  यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती.   केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. Read More »