Dnamarathi.com

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात आगामी निवडणुकीबाबत एक मोठं विधान केले.  

यावर आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट बारामतीतून हल्ला केला आहे. “देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

“चिन्हाची काळजी करायची गरज नसते. कारण मी १४ निवडणूक लढलो आहे. यात ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवीन येतात. माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावला आहे.

“एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतल्यास त्या संघटनेचं अस्तित्व संपल असं होत नाही. कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत, विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवून देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा,” असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *