Dnamarathi.com

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे. 

 या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे.

या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे.

यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. 

याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *