DNA मराठी

ahmednagar news

Archana Patil

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.  महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे.  या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात सौ. अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.  राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे.  शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.  शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.  या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी Read More »

Marriage

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक

Married Tips : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यातच जर तुमच्या बहीणीचे अथवा एखाद्या बेस्ट फ्रेंडचं लग्न ठरलं असेल तर या काळात तुम्हाला लग्नाची मौजमजा लुटण्याती संधी नक्कीच मिळेल.  अशा वेळी एखाद्या खास लग्नासाठी तयार होताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नाहीतर तुमचा पूर्ण लुकच खराब होऊ शकतो. कारण बऱ्याचदा लग्नकार्यात फॅशनबाबत केलेल्या या चुका महागात पडतात. यासाठी जाणून घ्या लग्नकार्यासाठी तयार होताना आमंत्रितांनी कोणत्या चुका करू नयेत. पांढरे अथवा काळे कपडे घालणे  बऱ्याच लोकांना पांढरा आणि काळा रंग खूप आवडत असतो. त्यामुळे कुठेही जाताना ते याच रंगाचे कपडे निवडतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाणार असता तेव्हा पांढरा अथवा काळा रंगाचे कपडे मुळीच परिधान करू नये. कारण लग्नकार्यात पांढरा आणि काळा रंग शोभून दिसत नाही.  काळा रंग शुभ कार्यासाठी वर्ज्य असल्यामुळे तो वापरू नये आणि पांढरा रंग हा खूपच फिकट असतो त्यामध्ये तुमचे फोटो चांगले येत नाहीत. यासाठी लग्नकार्यात जाताना लाल, पिवळा, हिरवा असे पारंपरिक आणि गडद रंग निवडा. एकाच रंगाचा पूर्ण आऊटफिट वापरणे  जर तुम्हाला लग्नात उठून दिसायचं असेल तर एकाच रंगसंगतीचा आऊटफिट वापरू नका. तुमच्या ड्रेस अथवा साडीमध्ये कॉम्बिनेशन असायला हवं. कारण  त्यामुळे तुमचा आऊटफिट उठावदार दिसतो. रंगसंगती ही कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या आऊटफिटचे रंग जाणिवपूर्वक निवडा. एकाच रंगाचा पूर्ण सूट वापरल्यामुळे तुमच्या उंची आणि व्यक्तिमत्वामध्ये उठावदारपणा दिसत नाही. यासाठीच वेडिंग आऊटफिट निरनिराळ्या रंगाच्या रंगसंगतीत तयार केले जातात.  डेनिमचे आऊटफिट घालणे  काही  लोकांचे डेनिमवर विशेष प्रेम असतं. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात त्यांना डेनिम लुक करणं आवडू शकतं. मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला जीन्स अथवा डेनिम आऊटफिट्स कितीही आरामदायक वाटत असले तरी ते लग्नकार्यात वापरू नयेत. कारण वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही गडद रंगाचे, एथनिक लुक असलेले कपडे घातले तर ते नक्कीच शोभून दिसतं. त्यामुळे लग्नकार्यात कपडे आरामदायक असण्यासोबत शोभून दिसतील असेच निवडावे. हेव्ही गोल्ड ज्वैलरी वापरणे  लग्नकार्य म्हटलं की दागदागिन्यांची हौस ही आलीच. मैत्रीण अथवा बहीणीच्या लग्नात तुम्ही साडी, लेंगा वापरणार असाल तर दागदागिने त्यावर सूट होतील असेच निवडा. सोन्याची ज्वैलरी कितीही मौल्यवान असली तरी ती प्रत्येक आऊटफिटवर चांगली दिसेल असं नाही. त्यामुळे तुमचे आऊटफिट कसे आहेत त्यानुसार तुमची ज्वैलरी निवडा. शिवाय जर गळ्यात हेव्ही नेकलेस असेल तर इतर ज्वैलरी कमी घाला ज्यामुळे तो नेकपीस उठून दिसू शकेल.  अती सैल अथवा अती घट्ट कपडे  कोणत्याही लग्नासाठी तयार होताना आधी तुम्ही कपडे तुमच्या फिटिंगचे आहेत का याची ट्रायल घ्यायला हवी. कारण तुमचे वजन नेहमी कमी जास्त होत असते. अशा वेळी त्यानुसार साडीवरचे ब्लाऊज अथवा लेंग्याचं फिटिंग कमी जास्त करणं गरजेचं आहे. लग्नात अती ढगळ अथवा अती घट्ट कपडे घातल्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो.

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक Read More »

IMG 20240403 WA0003

Maharashtra News: उद्योजक अनिल जोशी यांची विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड

Maharashtra News: अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अनिल जोशी यांची काल नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथील विभाग बैठकीत केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांच्या उपस्थिती विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड करण्यात आली. या वेळी अनिरुद्ध (अण्णा) पंडित,सतीश अरगडे,सुनील खिस्ती, गजेंद्र सोनवणे,कुणाल भंडारी, श्रीकांत नंदापुरकर आदी उपस्थित होते . अनिल जोशी यांचे वडील सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण नगरमध्ये झाले. पहिली ते दुसरी पर्यंतचे शिक्षण नगर शहरातील मध्यवर्ती शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर नौदलात निवड झाली आणि पंधरा वर्षे नौदलात सेवा केली. 2000 मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यानंतर 2007 पर्यंत परदेशात काम केले. त्यानंतर भारतात परत येऊन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांनी प्रभावित होऊन संघाच्या संपर्कात आले आणि संघात काम करू लागले.  संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद चे ते सदस्य असल्याने त्यांची संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

Maharashtra News: उद्योजक अनिल जोशी यांची विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड Read More »

Vikhe And Lanke

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

Crime 1

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ

Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु  हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद  बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह  शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.  या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ Read More »

Kedgao Masjid

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई

Ramadan Eid 2024 – केडगाव नगर पुणे रोडवरील   शाही जामा मशिदीस रमजाननिमित्त सालाबाद प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारतासह जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात चंद्र दर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्त ठिकठिकाणी मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.  याही वर्षी चंद्र दर्शन झाल्यानंतर 11 एप्रिल किंवा 12 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी  होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील  शाही जामा मशीदवर आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली आहे.   मशिदीचे अध्यक्ष जनाब हाजी अकबर पठाण, हाजी उस्मान मणियार ,रफिक भाई शेख ,मुन्नवर सय्यद, नदीमरजा शेख ,साहिल पठाण, नजीर पिरजादे, या बांधवांनी सर्व धर्मीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रत्येक समाजात जात धर्म पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता ही असते ती जागृत करण्याचे काम आपण केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई Read More »

IMG 20240402 WA0006

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित

NCP News :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.   लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित Read More »

Ram Shinde And Sujay Vikhe

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे

Ahmednagar News: आज मंगळवारी खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत  जामखेड तालुका भाजप पदाधिकर्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आज झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिंदे म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कशी व्युव्ह रचना हवी याबद्दल सांगितले. गेल्या पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. या बद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली.  यावर उपस्थितीत पदाधिकारी यांचे पूर्ण समाधान झाले असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यपेक्षा अधिकचे मताधिक्य जामखेड तालुक्यातून दिले जाईल अशी ग्वाही सर्वांनी दिली.  पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे.  नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या बुधवारी कर्जत तालुका भाजप पदाधिकारी यांची प्रचार नियोजनाची बैठक होणार आहे. आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा.सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे.  आता एकजुटीने जेष्ठनेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली. यावेळी जामखेड तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे Read More »

April

1st April : कामाची बातमी! आजपासून देशात बदलणार ‘हे’ 5 नियम; वाचा सविस्तर

1st April New Rules: आजपासून देशात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 01 एप्रिलपासून देशात काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्याचे खिशावर होणार आहे.  माहितीसाठी जाणुन घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला, जो आजपासून लागू होईल. यामुळे काही नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, कर प्रणाली, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), विमा आणि म्युच्युअल फंड (MF) च्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. कर स्लॅब अंतरिम अर्थसंकल्पानुसार, नवीन आर्थिक वर्षासाठी (FY2024-25), आर्थिक वर्ष 2023-24 शी संबंधित, आयकर स्लॅब अपरिवर्तित राहिले. 0 ते 3,00,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करातून सूट दिली जाईल. 3,00,001 ते 6,00,000 रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के, 6,00,001 ते 9,00,000 रुपये 10 टक्के, 9,00,001 ते 12,00,000 रुपये 15 टक्के, 12,00,001 ते  15,00,000 साठी 20 टक्के आणि 15,00,000 आणि त्याहून अधिकसाठी 30 टक्के. नवीन कर प्रणालीचे फायदे प्रवासाच्या नोंदी आणि भाड्याच्या पावत्या ठेवण्याची गरज नाही  मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्यात आली आहे करपात्र मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख रुपये. अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आला आहे. हे कमी केलेले दर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना लागू आहेत. जीवन विमा पॉलिसी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 नुसार, नवीन कर प्रणाली अंतर्गत, जीवन विमा पॉलिसींमधून प्राप्त होणारी रक्कम वर्षभरात भरलेला वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास करपात्र असेल. ई-विमा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने यापूर्वी जाहीर केले होते की 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसींचे डिजिटलायझेशन अनिवार्य होईल. हा आदेश जीवन, आरोग्य आणि सामान्य विम्यासह सर्व विमा श्रेणींना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लागू होईल ज्यासाठी पॉलिसी जारी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने सुरक्षा सुधारण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण उपाय सुरू केले. CRA प्रणालीमध्ये सर्व पासवर्ड-आधारित लॉगिनसाठी दोन-घटक आधार-आधारित प्रमाणीकरण अनिवार्य असेल. EPFO  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आता नोकरी बदलल्यानंतर ग्राहकाची शिल्लक त्यांच्या नवीन संस्थेकडे स्वयंचलितपणे हस्तांतरित करेल. ईपीएफओ खातेधारकांना पीएफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही.

1st April : कामाची बातमी! आजपासून देशात बदलणार ‘हे’ 5 नियम; वाचा सविस्तर Read More »

Mumbai 1

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू….

Mumbai News : मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी  होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र, चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. सोमवारी 20 ते 21 वर्षे वयोगटातील पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.  काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही. बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (19) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू…. Read More »