DNA मराठी

Ahilyanagar news

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!”

Ahilyanagar News: नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाच्या मुरूम संबंधित कामात तलाठी व अप्पर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून अक्षरशः एक लाख रुपयांचा ‘हंटर’ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतका संगनमताने पार पडला की सर्कलला बायपास करून तलाठी आणि ‘कडक’ साहेबांनीच आपापसात वाटणी केली. सदर व्यावसायिकाने मुरूम वाहतुकीसाठी शासकीय पावती भरून अधिकृत मुरूम उचललेला असतानाही, नव्याने आलेल्या अप्पर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या दरम्यान, “35 ते 40 लाखांचा दंड होईल,” असा धाक दाखवून तलाठी साहेबांनी तो व्यावसायिक थेट गाऱ्हाणीच्या स्थितीत आणला. यानंतर प्रकरण एका लाखात मिटवण्यात आलं. यातील काही हिस्सा खिलाडी साहेबांचा तर काहीसा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्टपणे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. “साहेब फार कडक आहेत, मी तुमचं काम करून देतो… कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील!” अशा सज्जड दमासह ही रक्कम स्वीकारण्यात आली. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हे सर्व ‘पंचनामा’ करून अधिकृतपणे मांडल्याचा देखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात पैसे ‘खाल्ले’ गेले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं – “फर्स्ट पणे साहेबांसाठी एक लाख द्या… लवकर द्या…” कारवाई होणार का? हा प्रकार उघडकीस येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “निव्वळ दमदाटी करून भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल तयार केले आहे काय?” असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!” Read More »

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी 91 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा 2.700 किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 3 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने 5.50 मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »

भाडेवाढ करणाऱ्या एअरलाइन्सवर कारवाई करा, तृतीयपंथ समाजाची मागणी

Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने त्यांना पुन्हा एकदा घरी पाठवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील काही लोक देखील या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना स्पेशल विमानाने सरकारने पुन्हा एकदा घरी पाठवल आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एक संतापाची लाट पसरली असून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. आज नगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे की, तृतीयपंथ समुदायाच्या वतीने आम्ही जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या दहशत वादी कृत्याने देशाच्या शांततेला व एकात्मतेला आव्हान दिले आहे. अशा हिंसक घटनांचा कोणत्याही प्रकारे पाठिंबा देता येणार नाही. भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे आण सर्व नागरिकांना सुरक्षितेचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही तृतीयपंथी समुदायाच्या वतीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच या घटनेतील पीडित कुटूंबीयांप्रती आमची सहवेदना व्यक्त करतो. आपण या निषेध निवेदनाच्या योग्य ती दखल घेऊन शासनस्तरावर आमची संदेश पोहोचवावा अशी विनंती निवेदनामार्फत सरकारला करण्यात आली आहे. तसेच देशातील विविध एअरलाइन्सने हल्ल्यानंतर भाडेवाढ केल्याने अनेक नागरिकांचे हाल झाल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील काजल गुरु, अध्यक्ष तृतीयपंथी समाज, अहिल्यानगर यांनी केली आहे.

भाडेवाढ करणाऱ्या एअरलाइन्सवर कारवाई करा, तृतीयपंथ समाजाची मागणी Read More »

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी  मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका,   किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही

Vikhe Patil: येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनचे काम करतांना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाइप खराब होऊ नयेत यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांची, अनियमितेची चौकशी करण्यात यावी. त्रुटींची दुरूस्ती करून पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. ज्या गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले. महावितरण कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसुम’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप वितरित करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 40 कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे विज दिली जाणार आहे . श्रीरामपूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही Read More »

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप

Maharashtra News: अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मृत भिक्षेकांना ना वेळेवर औषधं मिळाली, ना पिण्यासाठी पाणी, असे गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहे. 7 एप्रिल रोजी पोलिसांनी 49 भिक्षेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना श्रीमंत तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी यापूर्वीच्या घटनांमुळे या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वीही घडली होती गंभीर चूकप्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा पुनरावृत्तीस्मरणात ठेवावी अशी घटना म्हणजे, 2021 साली याच जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र शासनाने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी चार्जशीट दाखल करण्याची परवानगी नाकारली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बेधडकपणा वाढल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते गिरीश जाधव यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी 18 रुग्णांचे बळी गेले, तेव्हाही दोषींवर कारवाई झाली नाही. आता पुन्हा चार जणांचा मृत्यू. शासकीय रुग्णालयात प्रशासनाला कुणाची भीती राहिलीच नाही. सरकार दोषींना वाचवतं आहे. “पोस्टमार्टम अहवाल प्रतीक्षेत, चौकशी समितीकडून अपेक्षा अल्पसध्या मृत भिक्षेकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु याआधी अशा चौकशी समित्यांतून ठोस निष्कर्ष किंवा कार्यवाही झाली नसल्याने या प्रकरणातही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप Read More »

नगर शहरात पुन्हा वाद, ‘त्या’ प्रकरणात कारवाई करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News: नगर शहरात 6 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रामनवमी निमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती मात्र यावेळी काही समाजकंटकांकडून मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळाची विटंबना करणारे काही फ्लेक्स झळकवण्यात आल्याने आता पुन्हा एकदा शहरात नवीन वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात समस्त मुस्लीम समाज अहमदनगरच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आरोपींवर आणि यामागील मास्टरमाईंडवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये मिरवणुक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटक यांनी महाराष्ट्राचे वातावरण दुषित होवुन दंगल व्हावी या उददेशाने मुस्लीम समाजाचे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का-मदिना शरिफ याचे फलक झळकवुन जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का व मदिना यांची विटंबना केली. त्या फलकावर हिंदू देवतांचे फोटो सोबत मक्का-मदिना शरिफ येथील फोटो लावुन मुस्लीम समजाला हिनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं या निवेदनात म्हटले आहे. तसेच काही समाजकंटकानी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटोही झळकवले त्यावर लांडो का सिर कटेगा, कुत्तों में बटेगा आ जा किसमे है दम हिंदु है हम असा मजकुर होता त्याबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे फोटोसोबत संसदेत पारित झालेला वक्फ कायदा संबधी अरे मुल्लो बसा आता गप्प देशात वक्फचं प्रकरण झालं थप्प असा मजकुर लिहीण्यात आलेला होता. तसेच मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी मुस्लीम समाजाला उचकवण्यासाठी दंगल घडविण्याचे हेतुने घोषणा बाजी केली हे प्रकरण संपत नाही तर मॅक्स-प्रथम-491 इन्स्टा आयडी वरुन प्रथम भाऊ पवार याने त्याचे ईन्स्टा अंकाऊट स्टोरी लावुन समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असं या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

नगर शहरात पुन्हा वाद, ‘त्या’ प्रकरणात कारवाई करण्याची मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा

Evangeline Booth Hospital: इव्हॅनजलीन बूथ हॉस्पीटल, येथे नर्सिंग स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा थाटात संपन्न झाला. फेब्रुवारी 1943 साली बूथ हॉस्पीटल मध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. दर्जेदार प्रशिक्षणाची परंपरा असलेले या संस्थेतून जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले, आणि महाराष्ट्रात, भारतात, आणि जगातील विविध भागात सेवा देत आहेत. आजही येथिल विद्यार्थ्यांची देशात आणि परदेशात अधिक मागणी आहे. काहीं कार्यरत आहेत तर काही निवृत्त झाले आहेत. रूग्ण सेवेचा वारसा असलेल्या बूथ हॉस्पीटल चे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या स्नेहसंमेलना साठी देशाच्या विविध भागातील आणि परदेशात वास्तव्यास असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास 40 वर्षानंतर ते सर्व अशाप्रकारे एकत्र आले होते. एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, भेटल्यानंतर ओळखता येईल का? असा प्रश्न घेउन आलेले सर्व एकमेकांना पाहून भावूक झाले. त्यांची ती गळाभेट, डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा ओल्या झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात जरी भावनिक वातावरनात झाली तरी पुढे जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं. गाणं , नृत्य जुन्या आठवणींना बूथ हॉस्पीटल ची शाळा 40 वर्षानंतर पुन्हा भरली. प्रीती भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी माजी परिचारिका विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग दिला, त्यात काही स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच नर्सिंग स्कूल च्या प्राध्यापक मल्लिका साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि मेजर ज्योती कळकुंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेवा निवृत्त कमिशनर लहासे आणि त्यांच्या पत्नी कमिशनर कुसुम लहासे, कॅप्टन डेनिसन परमार, कॅप्टन निलम परमार, कॅप्टन सुहास वाघमारे आणि कॅप्टन प्रिया वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा Read More »

निवडणूक कार्यक्रम जाहीर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात कोण मारणार बाजी?

Cooperative Maharshi Bhausaheb Thorat Cooperative Sugar Factory : नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणेकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. तर नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी करण्यात येईल. या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात कोण मारणार बाजी? Read More »