DNA मराठी

Ahilyanagar news

IMG 20250130 WA0007

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

Bike

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

Ahilyanagar News : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी)बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसविणे करीता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. सेवापुरवठादार यांचे अधिकृत संकेतस्थळ htttp://maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांकाची ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले या तालुक्यांकरीता सेवापुरवठादार यांच्याकडून श्रीरामपूर येथील मुळे मोटर्स, बेलापुर रोड श्रीरामपूर, राहुल ट्रॅक्टर्स श्रीरामपूर, शिरोडे ऑटोमोबाईल्स प्रा.लि. श्रीरामपूर हे अधिकृत फिटमेंटर सेंटर नियुक्त करण्यात आलेले आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे.

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन Read More »

Bikes

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार

Maharashtra News: तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर जवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार Read More »

Ahmednagar Collector Office

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »