Dnamarathi.com

Ahmednagar News: नगर शहर वासियांचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न खा. डॉ‌. सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे. केंद्र सरकारची अमृत पाणी योजना रखडली होती मात्र पाठपुरावा करून योजना पूर्ण केली आणि नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी दिले. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे. 

आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये सुशिक्षित खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठवायचे आहे. नगर जिल्ह्यामध्ये तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती होईल.वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत लाभ मिळाला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाची जाहिरात केली नाही असे प्रतिपादन धनश्री विखे पाटील यांनी केले. 

  नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना नालेगाव येथील श्री देवांग पंच कोष्टी समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी ॲड.धनंजय जाधव,अजय चितळे,सोनाली चितळे, उदय अनभुले, गणेश शिंदे, प्रफुल्ल लाटणे, अशोक फलके, रुपेश मोकोटे, सागर दळवे, सुभाष पाखले, संजय भंडारी, संतोष टेके, नितेश वराडे,उमेश टेके, गणेश लाटणे, रविंद्र टकले, सुरेंद्र असलकर, गणेश कांबळे, विजय खटावकर,पूजा दळवे, सुप्रिया पाखले, रुपाली मुकोटे, जयश्री लाटणे, सुनीता टेके, उज्वला टकले, सीमा लोटके,अंबिका टेके आदी उपस्थित होते. 

 लोकसभा निवडणूक ही देशाच्या विकासासाठी असून या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी निवडून जाणे गरजेचे आहे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांमध्ये विकासाच्या योजनांबरोबरच सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक या विषयावर चांगले काम केले आहेत. त्यांची अभ्यासू खा. म्हणून लोकसभेमध्ये ओळख आहे. त्यामुळेच शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. नागरिकांचे उड्डाणपुलाचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले यासाठी श्री.  देवांगपंच कोष्टी समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे अशी माहिती कोष्टी समाजाच्या वतीने दिली. 

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहर सुरक्षित राहावे यासाठी विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहिरात केली नाही मात्र ते आज आपल्याला कामाच्या माध्यमातून सर्वत्र दिसत आहेत असे मत अजय चितळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *