Dnamarathi.com

Maharashtra News:  संपूर्ण राज्‍यात राष्‍ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केवळ १० उमेदवार उभे केले असून, निवडून किती येतील हे त्यांनाच माहीत आहे.  अहिल्‍यानगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्‍यांच्‍या पक्षाच्‍या अध्‍यक्षांसमोर पण संसद बंद पाडण्याची करत असलेली भाषा म्‍हणजे एक प्रकारचा विनोदच असल्‍याची टिका भाजपा नेते विनायक देशमुख यांनी केली. 

अहिल्‍यानगर लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी नगर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे यांच्‍यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विनायक देशमुख म्हणाले, १९९२ च्या लोकसभा निवडणुकी पासून निवडणू प्रक्रियेत सहभागी असून, परंतू मागील ३२ वर्षात झाला नाही इतका प्रचाराचा स्तर खालावलेला असून, थापा मारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे की काय?, असा प्रश्‍न  पडतो. नगर दक्षिण लोकसभेचे राष्‍ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे उमेदवारांना तर “संसद म्हणजे ग्रामपंचायत वाटायला लागली असून, गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर थापा मारणे एक वेळ समजू शकते. परंतु लोकसभेच्या २५ लाख मतदारांना थापा मारणे हे अत्यंत दुर्दैवी असल्‍याचे ते म्‍हणाले. 

लोकसभेची निवडणूक सुरू होताच शरद पवार गटाच्‍या उमेदवाराने जाहीर केले की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते. परंतू मला काँग्रेसचा ३५ वर्षांचा अनुभव असल्यामुळे या बातमीचे मला जरा आश्चर्यच वाटले. पण असेही वाटले की कदाचित सदर उमेदवाराची राहुल गांधी यांच्‍या बरोबर  मैत्रीचे नाते असू शकते. या कारणाने राहुल गांधी कदाचित येतील. त्यानंतर काही दिवसांनी याच उमेदवाराचे वक्तव्य आले की, वाहतुकीला त्रास होईल म्हणून मीच राहुल गांधींना येऊ नका असे म्‍हणालो असून, मागील ३० ते ३५ वर्षांच्या राजकारणात नगरच्या जनतेला एवढा बालिशपणा प्रथमच अनुभवायला मिळाला आहे. 

पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचा) उमेदवार अजूनही मोठमोठ्या थापा मारण्याची शक्यता असून, जनतेने त्यांना स्पष्टपणे विचारायला हवे कि आपण संपुर्ण देशात  केवळ दहाच जागा लढवित असून, मग तुमच्या या थापा कशा खऱ्या होतील?. शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि एम.आय.एम. हे पक्ष जास्त जागा लढवीत असून, मग तुम्ही दिलेली आश्वासने कशी पूर्ण करणार असा प्रश्‍न श्री.देशमुख यांनी उपस्थित केला. 

मतदारांनी अशा भुलथापांना बळी न पडता आपल्‍या ग्रामपंचायतीचा सरपंच निवडायचं नसून देशाचा पंतप्रधान निवडायचा असल्‍याचे भान ठेवावे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी  कमळा समोरील बटन दाबुन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करावे करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *