Sujay Vikhe latest Speech : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारीत झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.
माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले आ.संग्राम जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उतर नगरचे विठ्ठलराव लंघे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सचिन पारखी विश्वनाथ कोरडे विनायक देशमुख,बाबुशेठ टायरवाले विक्रमसिंह पाचपुते शिवसेनेचे अनिल शिंदे, यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.