Dnamarathi.com

Maharashtra News:- अकोला  जिल्ह्य़ातील व बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या  उरळ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई पोलीस स्टेशन उरळ हवदीतील ग्राम डोंगरगाव शिवार मन नदी पात्रात मोहा हातभटटी गावठी दारू वरती रेड करून एकूण ९६००० रू.चा मुददेमाल नाश करण्यात आला.

०७ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम डोंगरगाव येथील मन नदी पात्रामध्ये काही इसम मोह हातभटटी गावठी दारू काढत असल्याची माहीती मिळाल्यावरून आम्ही पोलीस. स्टॉप व पंच सह गावठी हातभटटीची दारू काढणारे इसमांवर रेड केली असता आरोपी नामे १) दादाराव सुलताने, २) गजानन पाखरे दोन्ही (रा. ग्राम डोंगरगाव) यांना पोलीसांची चाहुल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.

 घटनास्थळाची पाहणी केली असता ४५ डब्बे (डब्यात) एकूण ६७५ लिटर सड़वा मोहामाद किं. अं. ६७५००/-रू.व १५ लिटर गावठी मोहा दारू किं.अं. १५००/-रु. अशा एकूण ६९,०००/-रु. चा मिळुन आला. त्यानंतर ३) आरोपी नामें नारायण पांडे रा. डोंगरगाव याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर ०६, डब्बे डब्यात एकूण ९० लिटर सडवा मोहामाच किं. अं. ९०००/-रु.व २० लिटर मोहा गावठी दारू कि.अं. २०००/-रू.असा एकूण ११,०००/-रू.वा मुददेमाल मिळून आला. ४) आरोपी नामे संतोष मेहेंगे रा. घुई ता. शेगांव जि. बुलढाणा याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर १० डबे डब्यात एकुण १५० लिटर सहवा मोहा माच किं. अं.१५,०००/-रू.य १० लिटर मोहा गावठी दारू किं. अं. १००० रू.. असा एकूण १६,०००/-रू. वा मुददेमाल मिळून आला. सदरचा मुददेमाल नाशवंत असल्याने घटनास्थळीच नाश करण्यात आला.

आज रोजी ग्राम डोंगरगाव शिवारातील मन नदीचे पात्रात गावठी हातभटटी दारूवर केलेल्या ०३ कारवाईमध्ये एकुण ९६,०००/-रु.चा मुददेमाल घटनास्थळावर नाश करून नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेले आहेत.

सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे साहेब, सहायक पोलीस अधिक्षक  गोकुल राज जी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले. ए. एस. आय. राजभाउ बचे, पो. हया. विकास वैधकार, पो. शि. निखिल माळी सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *