Sagar Triple Murder: मध्य प्रदेशातील सागर येथे 30 जुलैच्या रात्री एका महिलेची आणि तिच्या दोन मुलींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, तिन्ही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. महिलेचा पती रात्री घरी पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मृताच्या पतीची चौकशी करत आहेत. मृताच्या भावाने कुटुंबीयांवर खुनाचा संशय व्यक्त केला असून, घरातील सदस्यांमध्ये वाद होत असल्याचे सांगितले. मात्र, पोलीस सर्व मुद्यांचा बारकाईने तपास करत आहेत.
200 मीटर अंतरावर पोलीस नियंत्रण कक्ष
सागरच्या पोलीस नियंत्रण कक्षासमोर 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. मृत महिलेचा पती विशेष पटेल जिल्हा रुग्णालयात संगणक परिचालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री तो घरी पोहोचला तेव्हा त्याला घराचे दरवाजे उघडे दिसले. विशेष यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना पत्नी वंदना (32 वर्षे), मोठी मुलगी अवंती (8 वर्षे) आणि लहान मुलगी अन्विका (3 वर्षे) यांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले.
किचनमध्ये पत्नी आणि मोठ्या मुलीचे मृतदेह आढळून आले तर लहान मुलीचा मृतदेह खाली बेडरूममध्ये पडलेला होता. त्यानंतर रात्री उशिरा सासरच्या मंडळींना फोन करून या घटनेची माहिती दिली.
स्वयंपाकघरात रक्त
घटनास्थळ पाहता त्यांचे डोके भिंतीवर आदळले असून डोक्यावर व शरीराच्या इतर भागावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे. तिघांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव होत असून रूम व स्वयंपाकघरात सर्वत्र रक्त पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच आयजी प्रमोद वर्मा, डीआयजी सुनील कुमार, एसपी प्रभारी डॉ संजीव उईके रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. पोलीस जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत. आज तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.