Vidya Gadekar: तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू होतो तसेच आपल्या संस्कृतीत गोमाता ही मातेसमान असून मात्र संगमनेर तालुक्यात मालपाणी उद्योग गाय मातेचा अपमान करून व्यवसाय करत असल्याने या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अन्यथा अमरण उपोषण करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव(संघटन) विद्या गाडेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे.
विद्या गाडेकर आपल्या निवेदनात म्हणाल्या की, 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मालपाणी उद्योग समूह हा व्यवसाय करत आहे मात्र गायछापच्या पाकिटावर तंबाखू हानिकारक असते असं लिहिले आहे तसेच तंबाखूची जी पुडी असते त्यावर गोमताचे चित्र असते गोमातेचे चित्र असलेल्याने ही एक प्रकारची विटंबना असून हा गोमतेचा घोर अपमान आहे.त्यामुळे या व्यवसायवर कायमस्वरूपी बंदी आणावी अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
विद्या गाडेकर निवेदनात पुढे म्हणाल्या की, या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता व हिंदू धर्माचे प्रतीक गोमाता असताना आमच्या धर्माचे प्रतीक असलेल्या गोमातेची विटंबना गेल्या अनेक वर्षे करणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाला धडा शिकवण्यासाठी त्वरित ” गाय छाप जर्दा” हे तंबाखू उत्पादन बंद करण्याचे संबंधिताना आदेश द्यावेत तसेच हे उत्पादन त्वरित बंद न केल्यास मी लवकरच आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा विद्या गाडेकर यांनी दिला.