Dnamarathi.com

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि शाहरुख खानच्या टायगर वर्सेस पठान या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना होती मात्र आतापर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सलमान खानने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे.

मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली.

सलमानची बिग बजेट फिल्म ठप्प
एका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. “एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत,” असे सलमान म्हणाला.

“टायगर वर्सेस पठान” वर काम नाही!
सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. “आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही,” असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला.

तर दुसरीकडे “अंदाज अपना अपना 2” साठी आमिरसोबत काम करण्यास आपण एक्साइटेड आहोत असं सलमान म्हणाला. सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, “हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार.”

“बजरंगी भाईजान 2” शक्य, पण कधी?
बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, “हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे.” मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *