DNA मराठी

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी

AIMIM : काही दिवसापूर्वी नगर महानगरपालिका हद्दीतील गंगा उद्यान येथे काही बुरखाधारी व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना आणि नगरचे लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून हनुमान चालीसा व हवन आणि वराह पूजा करून शुद्धीकरण केले.

सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित होत असल्याचे निदर्शनास आले. परंतु तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिलं तर त्यात काही टेक्निकल बाबी आढळून आले आहे.

सदर बुरखाधारी नमाज पठण ज्या दिशेने करत आहे त्या दिशेने भारतीय मुस्लीम नमाज पठण करत नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाज हा काबा च्या दिशेने म्हणजेच सूर्य अस्त च्या दिशेने नमाज पठण करतो. परंतु सदर बुरखाधारी हे नमाज पठण काबा च्या दिशेने न करता उत्तरेचे दिशेने करत असल्याचे दिसते याच्याच अर्थ सदर बुरखाधारी हे मुस्लिम समाजाचे किंवा इस्लाम धर्माला मानणारे नसावेत.

तसेच नमाज पठण करण्याच्या अगोदर वजू करणे म्हणजे योग्यरित हातपाय धुणे अनिवार्य आहे. परंतु गंगा उद्यान मध्ये अशी कोणती सोय नसल्याने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे महिला नमाज पठण करणे टाळतील.

गंगा उद्यानात वेगवेगळ्या ४ पायाचे जनावर त्या ठिकाणी आढळून येतात आणि घाण करून जातात अशा ठिकाणी मुस्लिम समाजाचे व्यक्तीने नमाज पठण करणे हे शक्य नसल्याने शंका निर्माण होणे साहजिक आहे.

भारतामध्ये असे अनेक प्रकार रोज घडत आहे की काही पुरुष बुरखा घालून मंदिराच्या समोर अनावश्यक वातावरण खराब करणाऱ्या गोष्टी करतात आणि पळून जातात यातले काही पकडले गेल्याने लोकांचे लक्षात आले की बुर्खायाचे आत मध्ये महिला नसून पुरुष आहे आणि तेही मुस्लिम समाजाचा नसून इतर समाजाचे आहेत.

व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना इतके तातडीने उद्यानात आले जसेकाय ते या व्हिडिओची प्रतीक्षा करत होते. येतांना त्यांनी सर्व समग्री सोबत आणली आणि हवन, भजन कीर्तन हनुमान चालीसा आणि वराह पूजा हे सर्व केले.

नगरचा लोकप्रतिनिधी आणि जातीवादी संघटना या उद्यानात हजर झाले यावरून असे दिसते की व्हिडिओ काढणे आणि ते त्यांच्या ग्रुप वर टाकणे आणि लगेच संबंधित टोळी हे उद्यानात येऊन धिंगाणा घालणे हे सर्व पूर्ण नियोजित आणि योग्य रीतीने षडयंत्र भाग असल्याचे दिसते.

डॉ परवेज अशरफी यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले की

जर नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा, हवन वराह पूजा होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ?

निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की संबंधित बुरखाधारी महिला व पुरुष प्रशासनाने शोधावे व तातडीने अटक करावी. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने व्हिडिओ काढून व्हायरल केला त्यालाही अटक करून त्याच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून हा सर्व षडयंत्र जनतेसमोर येईल.

ईदच्या दिवशी माळीवाडा भागात जे घडले त्यात एक बुरखाधारी आढळले परंतु ती महिला की पुरुष हे अद्याप समजले नाही परंतु त्यातही काही त्रुटी असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे. प्रशासनाने त्याचा योग्य छडा लावल्यास त्या ठिकाणी तो प्रकार एक षड्यंत्र असल्याचे जनते समोर येईल.

गंगा उद्यान या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही तर या षडयंत्र करणाऱ्या टोळीची हिम्मत वाढेल आणि भविष्यात असे प्रकार सर्रास घडताना आपल्याला दिसेल. याचा नुकसान भारतीय मुस्लिमांना भोगावे लागेल.

पोलिस प्रशासनाने या दोन्ही घटनेची योग्य रीतीने तपास केल्यास नक्की अहमदनगर मध्ये चालले षडयंत्र जनतेसमोर येईल अशी खात्री एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेझ अशरफी यांनी नगरच्या पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *