DNA मराठी

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके यांनी पाळला शब्द; अहिल्यानगरमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू

nilesh lanke

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) सुरू व्हावे, हे येथील नागरिकांचे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांनी केलेली ही प्रमुख मागणी लक्षात घेऊन, खासदार निलेश लंके यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर याचा सातत्याने पाठपुरावा केला. खासदार लंके यांनी दिलेला शब्द पाळत अखेर अहिल्यानगरमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज प्रत्यक्षात सुरू झाले असून, पहिल्याच वर्षी १०० विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अविस्मरणीय क्षण आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

कॉलेजच्या पहिल्याच बॅचच्या प्रवेश प्रक्रियेनंतर खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापक वर्गाला भेटून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एक रंजक व अभिमानास्पद बाब सांगितली की, जिथे आपले ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी कोटा (Kota) येथे जातात, तिथे आज राजस्थानमधील कोटाहून आलेल्या विद्यार्थ्याने अहिल्यानगरच्या या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. हा क्षण आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले .

वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावणार

या शासकीय मेडिकल कॉलेजमुळे केवळ शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असे नाही, तर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची (Civil Hospital) आरोग्य यंत्रणाही अधिक सक्षम होणार आहे. यापूर्वी उपचारासाठी गंभीर रुग्णांना पुणे (ससून) किंवा मुंबई (जे. जे.) येथे रेफर करावे लागत होते, परंतु आता या नवीन आणि तज्ज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांच्या टीममुळे रुग्णांना अहिल्यानगरमध्येच उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

राजकारणापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य

या मेडिकल कॉलेजच्या मंजुरीदरम्यान आलेल्या अडचणी किंवा विरोध करणाऱ्यांवर कोणतीही टीका-टिप्पणी न करता, खासदार लंके यांनी सर्वांचे आभार मानले. खासजगी संस्था उभारण्यापेक्षा शासकीय संस्था मोठी झाली पाहिजे, कारण शासकीय संस्थेतच माझ्या सर्वसामान्य व गरिबाचे लेकरू शिकू शकते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *