Dnamarathi.com

Mobile Blast : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य ( वय वर्षे ४७ ) यांच्या पॅंटीच्या खालच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅन्ट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे बालमटाकळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य ( वय ४७ वर्षे ) हे सोमवार दि. १८ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या दरम्यान आपली दुकान उघडून आतमध्ये बसले होते अचानक दुकानात त्यांना सर्वत्र धूर दिसू लागला त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाहताच त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पँटच्या खिशातून धूर निघत आहे व खिसा देखील गरम होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी सर्तकता ठेऊन लगेच खिशात ठेवलेला मोबाईल पटकन बाहेर काढला. 

तोपर्यंत त्यांच्या पँटने पेट घेतला होता तसेच त्यांच्या हाताला व मांडीला देखील भाजले होते. खिशातील मोबाइल हातात घेतल्यानंतर हँडसेटने लगेच पेट घेतला त्यांनी तो मोबाईल खाली फेकून देताच तो जळून खाक झाला अशी माहिती दत्तात्रय दामोदर वैद्य यांनी दिली आहे. 

दत्तात्रय दामोदर वैद्य यांनी पाच वर्षापूर्वी एम.आय. कंपनीचा रेडमी सेवन हा मोबाईल खेरदी केला होता. मोबाईल जळत असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र कशामुळे मोबाईलचा स्फोट झाला हे अजून कळालेले नाही.

 या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वैद्य यांनी सतर्कता दाखवत मोबाइल दूर फेकला मात्र, तरी सुद्धा या घटनेत ते जखमी झाले आहे. यामुळे मोबाईल हाताळणे किती धोकादायक असू शकते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *