Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामवर केलेल्या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.
त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे.
यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडावर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.
तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे देखील म्हटले आहे.
याच बरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असं म्हंटले होते. मात्र हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी माफी मागितली.