IMD Alert Today : हळूहळू आता संपूर्ण देशात मान्सूनचा आगमन होताना दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
यातच आता भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कर्नाटक, केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय लक्षद्वीप, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि अंदमान निकोबार बेटांवर मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच विदर्भ, सिक्कीम, ईशान्य भारत, दक्षिण गुजरात, जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या भागात मुसळधार पाऊस पडेल
IMD नुसार, ओडिशा आणि दक्षिण गुजरातच्या सर्व भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व राजस्थान आणि बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक ठिकाणी धुळीच्या वादळासह पाऊस पडू शकतो. दिल्ली आणि परिसरात धुळीचे वादळ आणि हलका पाऊस झाला. ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.