Ahmednagar News: दुधाला 40 रुपये हमीभाव, दूध मुल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी, दुधाची एफ.आर.पी निश्चिती यांसह विविध मागण्यांसह सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील दुध उत्पादन संघटना समितीच्या सदस्यांनी शेतकरी दिंडी सातारा ते राज्याचे दुग्धविकास मंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावी काढली होती.
याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे या दिंडीतील शेतकरी व अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली.
दरम्यान 1 जुलै रोजी शिखर शिंगणापूर येथून निघून ही शेतकरी दिंडी आज नगर शहरात पोहचताच प्रशासन आपल्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विभागाचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी यांची बैठक घेतली. परंतु या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याचे शेतकर्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दुध उत्पादन संघटना समितीच्या, महाराष्ट्र राज्य वतीने समितीच्या वतीने दिनांक 01/07/2024 पासून शिखर शिंगणापूर तालुका मान जि. सातारा ये येथून श्री शंभू महादेवांना दुधाचा अभिषेक करून तेथील भाविकांना फुकट दूध वाटप करून, महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला.
त्यानंतर तेथून शेतकरी दिंडी लोणी अहमदनगरच्या दिशेने निघून दरम्यान गोरक्षनाथ गड येथे रात्री मुक्काम केला. दरम्यान आपल्याकडून संघर्ष समितीच्या मागण्या बाबत. आपण सकारात्मक असून.
सदर मागण्याच्या चर्चेसाठी दिनांक 02/07/2024 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर मध्ये बैठकीसाठी आपण बोलवले आहे.
तरी आपण आमच्या खालील मागण्या बाबत सकारात्मक भूमिका घेऊन लिखित स्वरूपात आमच्या मागण्या मान्य करावेत.
काय आहे मागण्या
दूध उत्पादन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा
दूध मुल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी
दुधाची एफ.आर.पी निश्चित करण्यात यावी
11 मार्च ते 30 जुलै अनुदान एक रक्कमी त्वरित वितरण करावे.
भाकड जनावरांना 2000/- रुपये चार खर्च मिळावा.
अन्न भेसळ खात्याकडून दूध भेसळीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी.
दुधखरेदी दराची 2017 भारतीय नियमाप्रमाणे इतर राज्यात 3.2 फॅट 8.3 च्या गुणवत्ते खरेदी करावे.