Dnamarathi.com

Creadit Card Rules: आज अनेक जण आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसत आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने ग्राहक शॉपिंग तसेच इतर आर्थिक कामे मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र आता अनेक बँका क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहेत. या यादीत बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.

Yes Bank 

ही खाजगी क्षेत्रातील बँक क्रेडिट कार्ड युटिलिटी व्यवहारांवरील अतिरिक्त शुल्काशी संबंधित नियम बदलणार आहे. खाजगी क्रेडिट व्यतिरिक्त, सर्व क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

IDFC First Bank 

या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंटवर 1% फी + GST भरावा लागेल. एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड, फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड आणि एलआयसी क्लासिक क्रेडिटवर कोणताही अधिभार लागणार नाही.

Bank Of Baroda 

सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने आपल्या BOB CARD ONE शी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता ग्राहकांना को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याजदरासह विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 26 जूनपासून नवीन नियम लागू होणार आहेत. इतकेच नाही तर, जर एखाद्या वापरकर्त्याने पेमेंट केले किंवा मर्यादेपेक्षा जास्त कार्ड वापरले तर त्याला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

HDFC Bank 

स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत, जे 21 जूनपासून लागू होऊ शकतात. ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगला कॅशबॅक मिळू शकतो, जो स्विगी ॲपवर “Swiggy Money” म्हणून दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *