DNA मराठी

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत

IMG 20240817 WA0000

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यात काही गावांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

हे ड्रोन कोण उडवत आहे? कशासाठी उडवत आहे? त्या मागचा हेतू काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

 ग्रामीण भागात काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागात घिरट्या घालणारे ड्रोन चार पाच दिवसांपासून बालमटाकळी परिसरात  देखील घिरट्या घालताना दिसू लागले.

 काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली. चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *