DNA मराठी

राजकीय

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश

Devendra Fadnavis: बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून आता या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 235 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने ठेवींवर 10 ते 18 टक्के व्याजदराचे आकर्षण ठेव योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पोलीस, विशेष तपास यंत्रणांना गतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रकाश सोळंके, अर्जुन खोतकर, सुरेश धस, संतोष दानवे, सुभाष देशमुख, विजयसिंह पंडित उपस्थित होते.

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश Read More »

sawedi land scam, the role of two 'heroes' of revenue

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका

Sawedi land Scam हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली.३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलचे दोन ‘महानायकांची’ भूमिका अहिल्यानगर – Sawedi land Scam सावेडी परिसरातील बहुचर्चित भूखंड घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणाला नवा धागा मिळाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे एक या संदर्भात तक्रार आली आहे, यावर प्रांताधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मंडळ अधिकारी यांच्याकडे मागवला आहे. या प्रक्रियेला चालना देणारे मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोन महसूल यंत्रणेतले ‘महानायक’ असल्याची सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण  १५ एप्रिल १९९१ रोजी १.९० लाख रुपयांना झालेल्या खरेदीखताच्या नोंदणीवरून उफाळून आला आहे. आश्चर्य म्हणजे, हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली. यामध्ये वादाला कारणीभूत ठरले तत्कालीन तलाठी प्रमोद गायकवाड यांनी संबंधित जमिनीची नोंद भरली. आणि सावेडी मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी नोंदीस मान्यता देण्यात आली, परंतु, महत्त्वाचा मुद्दा असा की, जर या दस्तऐवजावर ३५ वर्षांनंतर नोंद घेतली गेली, तर त्या कालावधीत प्रत्यक्ष खरेदीदारांना किंवा मूळ मालकांना नोटीस का पाठवली गेली नाही? कायदेशीर प्रक्रियेचा भंग करत, मागच्या तारखेचा पंचनामा कसा केला गेला, आणि तो करताना गंभीर त्रुटी का राहिल्या, हे अनेक प्रश्न उपस्थित करतो. या सगळ्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खरेदीखत बनावट असल्याचा संशय आहे तर मग . DNA मराठीला मिळालेल्या माहिती नुसार, हि जमीन विक्रीसाठी ७० लाखांचे फ्रँकिंग उपनिबंधक कार्यालयात झाले आहे. यावरून हे लक्षात येते की, खरेदीखताच्या नोंदी मागे एक मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे. या जमिनीत लागलेलं रक्कम वसूल करून यातूनच हा व्यवहार दुसऱ्याला हस्तांतरित करून, मोठ्या प्रमाणात रक्कम मिळवण्याचा डाव आखण्यात आला का, हा संशय अधिक गडद होतो. शहा पारसमल मश्रीलाल यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी नोंदणीसाठी अर्ज दिला होता, मात्र नोंदीसाठी नोटीसा कशा बजावल्या गेल्या नाहीत , याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. इतकंच नव्हे, तर त्या नोटीसा खरंच पाठवल्या होत्या का, की त्या नुसत्याच दाखल्यात वापरल्या गेल्या, याचंही उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. डायाभाई यांना किवा यांच्या वारसांना का कळविले, या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा चौकशी सुरू आहे, तेव्हा या जमिनीची विक्री करण्यात घाई का करण्यात येत आहे. ही विक्री झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कोणाला भोगावे लागतील? मूळ मालक, खरेदीदार की तिसरा पक्ष? यासारखे अनेक अनुत्तरित प्रश्न आजही उभे आहेत. यापूर्वी अशा अनेक प्रकरणांमध्ये बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची विक्री केल्याचे समोर आले असून, त्यातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली आहे. शासनाचे नियम डावलून झालेली ही नोंदणी आणि त्यामागे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग, ही गोष्ट गंभीरपणे तपासण्याची गरज आहे. कारण, सामान्य माणसासाठी त्याची जमीन ही आयुष्याची पुंजी असते. आणि जर शासन यंत्रणा त्याच्याविरोधात उभी राहिली, तर न्याय मिळण्याची आशाही मावळते. या सर्व प्रक्रियेमध्ये मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घेतलेल्या निर्णयांचे योग्य आहे का, हे पाहणे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तपास सुरू असतानाही गुपचूप व्यवहार झाले असल्यास, यामागे भूमाफिया आणि शासकीय यंत्रणेमधील साटेलोटे स्पष्ट होतात. त्यामुळे ‘सावेडी घोटाळा’ ही केवळ एक जमीन घोटाळ्याची कथा नसून, ती प्रशासनातील पारदर्शकतेवर उठलेला मोठा प्रश्न आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका Read More »

ujjwal nikam elected to rajya sabha dna news marathi

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड

उज्ज्वल निकम, हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. नवी दिल्ली – ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ८० अन्वये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा सार्वजनिक जीवनातील विशेष कर्तृत्वासाठी राष्ट्रपतींना राज्यसभेसाठी १२ सदस्य नामनिर्देश करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करत निकम यांच्यासह आणखी तीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवउज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, प्रभाकरन हत्याकांड, तेलगी बनावट शिक्के प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गुन्ह्यांत सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या दीर्घ अनुभवामुळे राज्यसभेतील कायदा, न्याय, आणि गुन्हेगारी न्यायव्यवस्था संबंधित चर्चांना एक नवा आयाम मिळणार आहे. निवडीचे व्यापक महत्त्वराज्यसभेवर अशा तज्ज्ञांची नियुक्ती केल्याने संसदेमध्ये अधिक व्यावसायिक व अभ्यासपूर्ण चर्चेला चालना मिळते. उज्ज्वल निकम यांची कारकीर्द, त्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन, आणि न्यायव्यवस्थेतील प्रगल्भ समज यामुळे विधीविषयक धोरणांमध्ये अधिक चांगले योगदान मिळण्याची शक्यता आहे. इतर नामनिर्देशित सदस्यनिकम यांच्यासह परराष्ट्र क्षेत्रातील जाणकार हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. या चौघांची नियुक्ती ही संसदेत विविध क्षेत्रांतील विचार व तज्ज्ञता समाविष्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र धोरणातील जाणकार — हरषवर्धन श्रृंगलासंयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व आणि माजी परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत राहिलेल्या श्रृंगला यांनी परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची नियुक्ती जागतिक घडामोडींच्या चर्चेत मोलाची भर घालेल. संस्कृती व इतिहास अभ्यासक — डॉ. मीनाक्षी जैनभारतीय संस्कृती, इतिहास व सामाजिक विषयांवर संशोधन करणाऱ्या डॉ. जैन यांचे लेखन व विचार समाजप्रबोधनासाठी प्रसिद्ध आहे. राज्यसभेत त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग धोरणांच्या सांस्कृतिक पैलूंमध्ये होईल. समाजसेवा व शिक्षण क्षेत्रातील कार्य — सी. सदानंदन मास्टरग्रामीण शिक्षण व सामाजिक न्यायासाठी झटणारे मास्टर यांनी शैक्षणिक सुधारणा व लोकसहभागाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणारे धोरण तयार करण्यात त्यांचा सहभाग उपयुक्त ठरे उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची पावती नसून, भारतीय संसदेच्या गुणवत्तापूर्ण आणि सखोल चर्चेसाठी एक नवा टप्पा ठरणार आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाच्या विधीविषयक धोरणनिर्मितीस निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड Read More »

img 20250712 wa0012

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली

Sawedi land Scam पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला Sawedi Land Scam : सावेडी येथील कोट्यवधींचा वादग्रस्त भूखंड घोटाळा प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर कार्यालयात खरेदी-विक्री थांबवण्याचे प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, आता काही मंडळींनी तालुकास्तरावरील कार्यालयांमार्फत व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधितांनी पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, सावेडीमधील सर्वे नं. २४५/ब १ (०.७२ हेक्टर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या भूखंडावर गेल्या ३५ वर्षांत कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. मात्र सध्या याच जमिनीवर मोठा व्यवहार करण्याचा अट्टहास सुरू असून, संबंधितांच्या वतीने महसूल विभागावर दबाव आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून, मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तु निष्ठा अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच वादी-प्रतिवादींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावेत, अशा असे पत्र दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ या सह दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणेकडेही या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून, या संदर्भात पुढील तपास सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुकास्तरावरील इतर नोंदणी कार्यालयांतून व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे, यापुढील काळात पोलीस आणि महसूल यंत्रणांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली Read More »

pawar's ncp has a new president, jitendra awhad's explanation

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

पवारांच्या राष्ट्रवादीत नवा अध्यक्ष ? या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. मात्र, या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे. “ही केवळ खोडसाळपणाची अफवा आहे,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. शनिवारी संध्याकाळनंतर विविध माध्यमांवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती झपाट्याने पसरू लागली. अनेकांनी या घडामोडींचा अर्थ पक्षातील अंतर्गत उलथापालथ म्हणून लावायला सुरुवात केली. मात्र, आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहणार. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा त्या-त्या मंडळींनी स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत. पक्षात अशा पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत.” दरम्यान, जयंत पाटील यांनी यापूर्वीच (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सूचक विधान केले होते – “नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे.” यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाली. मात्र, अधिकृतरीत्या त्यांनी कोणताही लेखी राजीनामा दिलेला नाही, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. ते नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, १५ जुलैला या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांचे मतया चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेत आपला पक्ष अधिक तरुण, लढाऊ आणि परिवर्तनशील आहे, हे दाखवण्यासाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांचा मार्ग वेगळा आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. राजीनामा झाला की नाही, याचा निर्णय अधिकृतपणे होईपर्यंत जयंत पाटील यांच्या पुढील वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व अखेर शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण Read More »

discussions gain strength after jayant patil's resignation; sangram jagtap

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप

“अजित पवार यांच्या गटात आले, तर मनापासून स्वागत” — संग्राम जगताप अहिल्यानगर | प्रतिनिधी – जयंत पाटील बातमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. यावर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप sangrm Jagtap यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील Jayant Patil, यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या भेटींमुळेही अनेक शक्यता पुढे आल्या. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, मात्र त्यांच्यातील अस्वस्थता कायम राहिली,” असं जगताप यांनी सांगितलं. “माजी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते, परंतु सरकार पडल्यानंतर त्यांच्या भोवतीच्या चर्चांना वेग आला. आज त्यांनी स्वतःहून राजीनामा सादर केला, यावरून या चर्चांमध्ये काही तथ्य होतं, हे स्पष्ट होतं,” असं मत जगताप यांनी व्यक्त केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “जर जयंतदादा अजित पवार aajit pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील, तर आम्ही सर्वजण त्यांचं मन:पूर्वक स्वागत करू. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि राज्याला निश्चितच फायदा होईल,” असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप Read More »

Devendra Fadnavis: जन सुरक्षा विधेयक विधान परिषदेत बहुमताने मंजूर

Devendra Fadnavis : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला जन सुरक्षा विधेयक विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडले होते. विधेयकावर सखोल चर्चा झाल्यानंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी ते बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले. गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, हे विधेयक कोणत्याही व्यक्ती अथवा सामान्य सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात नसून, लोकशाहीला आव्हान देणाऱ्या आणि शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आहे. राज्यात सध्या अशा प्रकारच्या एकूण 64 संघटना सक्रिय असून, त्यांचा पायापासून बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कदम यांनी युएएपी (UAPA) कायद्याच्या मर्यादा अधोरेखित करत सांगितले की, “UAPA फक्त हिंसक घटना घडल्यास लागू होतो, मात्र सध्या नक्षलवादी विचारसरणी हिंसाचाराशिवायच शहरांमध्ये शिरकावत आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीला थोपवण्यासाठी स्वतंत्र कायदा आवश्यक ठरतो.” त्यांनी साईबाबा प्रकरणाचे उदाहरण देत सांगितले की, फक्त विचारांच्या आधारे दोष सिद्ध करणे UAPA अंतर्गत शक्य नसते. विधेयकानुसार, बंदी घालण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सरकारी वकील यांचा समावेश असलेले सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळासमोर सर्व पुरावे सादर करण्यात येतील आणि त्यांची शिफारस मिळाल्यानंतरच संबंधित संघटनेवर बंदी घालण्यात येईल. याशिवाय, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा सदस्य असलेल्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होणार आहे. अखेर, गृहराज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, “हा कायदा सामान्य आंदोलकांवर किंवा सरकारविरोधी मतप्रदर्शन करणाऱ्यांवर नाही, तर केवळ माओवादी विचारसरणीच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: जन सुरक्षा विधेयक विधान परिषदेत बहुमताने मंजूर Read More »

pankaja munde

ऐतिहासिक निर्णय, राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा

Pankaja Munde : राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी सांगितले, पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ७६.४१ लक्ष पशुपालक कुटुंबांना होईल. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे ७७०० कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत आहे. या निर्णयानुसार राज्यातील वीज दर आकारणी, कृषी इतर या वर्गवारीनुसार न करता कृषि वर्गवारीप्रमाणे करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्याकरिता कृषि व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते त्याच दराने कर आकारणी करण्यात येईल. पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरात ४ टक्के पर्यंत सवलत देण्यात येईल व त्यासाठी स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दती विहित करण्यात येईल आणि कृषी प्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यात येईल. पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी सांगितले राज्याच्या सकल उत्पन्नात कृषि क्षेत्राचा वाटा १२ टक्के आहे. कृषि क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा २४ टक्के आहे. राज्यातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारात शिफारस केलेल्या प्रमाणाइतके अंडी व मांस उपलब्ध नाही. तसेच दुग्ध उत्पादनात राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय निती आयोगाच्या सन २०२१ च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पध्दतीचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करुन शेतकरी /पशुपालकांच्या आर्थिक जोखिम कमी करण्याची शिफारस केली असल्याची माहितीही पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी विधानसभेत दिली.

ऐतिहासिक निर्णय, राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा Read More »

img 20250711 wa0002

नगरच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका? MIM जिल्हाध्यक्ष परवेज अशरफींनी दिले संकेत

AIMIM Ahmednagar: अहमदनगरमध्ये पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक एमआयएम किंग मेकर ठरणार की कोणाला धक्का देणार याबाबत जिल्ह्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात एमआयएम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमेटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्राची सुरवात अहमदनगर येथून करण्यात आली. नगर येथे ही जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, अतिक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी, सह सचिव शाफीउल्ला काझी, सह सचिव सैफ पठाण यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी नगरची माहिती देत असतांना सांगितले की अहमदनगरमध्ये जेव्हा आम्ही एमआयएमचे काम सुरु केले तेव्हा लोक कोणताही प्रतिसाद देत नव्हते. परंतु आज चांगल्या चांगल्या नेते आणि आजी माजी लोक प्रतिनिधी एमआयएम सोबत येण्यास तयार आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी देणार असल्याचेही पक्ष श्रेष्ठींना सांगितले. येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक असो की जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो एमआयएम आपल्या हिस्स्याचे लोक प्रतिनिधी निवडून आणतील. प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले की आम्ही नगर पासून जवळ आहे. आम्हाला माहित आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाबद्दल काही अपशब्द वापरले आहे.त्यांना मुस्लीम समाजाचे दर्गा मस्जिद आणि जमीन यांच्यावर कब्जा करायचा आहे. काळजी करू नका विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता फक्त एमआयएममध्ये असून लवकरच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल. महानगर पालिकेत एमआयएमचे उमेदवार निवडून द्या. विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जनतेला दाखून देऊ. असं देखील ते म्हणाले. प्रदेश महासचिव अतिक अहमद म्हणाले की पक्ष बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व समाजाला ज्यांच्यावर अत्यचार करण्यात आले आहे त्यांना एकत्र घेऊन सत्तेत भागीदारी घ्यावी लागेल. येणारा काळ एमआयएम साठी सुवर्णकाळ असणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी ते एम आय एम सोबत कसे जुडले आणि कसे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावर भाष्य केले. तर सैफ पठाण यांनी सांगितले की मी एम आय एम सोबत एक कार्यकर्ता या नात्याने जुडलो आणि समाजाचे काम करत गेलो. माझ्या कामाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतली की मला खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात टाकले.परंतु आज खासदार ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन प्रदेश सहसचिव पदाची जबाबदारी दिली. आणि मला पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी सांगितल्याने मी आज तुमच्या सोबत असल्याचे नमूद केले. सहसचिव शफीउल्ला काझी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की जो पक्षासाठी निष्ठावंत आहे पक्ष त्याच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार. कोणीही पक्ष विरोधी कारवाई केली तर त्याला पक्षात कोणतेही स्थान नसणार. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ शेख, युवा अध्यक्ष अमीर खान, शेवगाव अध्यक्ष युसुफ शेख, कर्जत अध्यक्ष डॉ अन्सार, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, सरफराज सय्यद, इम्रान देशमुख, इस्माईल शेख, शम्स शेख, नासीर शेख, आवेज शेख, नदीम तांबोळी, शोएब पठाण, सज्जाद शेख आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात एम आय एम ची सत्ता स्थापनेसाठी महत्वाची भूमिका असणार असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने एम आय एम मुळे किधर खुशी किधर गम असण्याची शक्याता आहे.

नगरच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका? MIM जिल्हाध्यक्ष परवेज अशरफींनी दिले संकेत Read More »

dada bhuse

खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळा रडारवर,- दादा भुसे

Maharashtra Government: पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार प्रशांत बंब राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’ दर्जा प्राप्त केल्या असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल आणि त्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा देखील दादा भुसे यांनी केली. शिक्षण विभागाच्या नियमानुसार, एखाद्या शाळेला ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवण्यासाठी त्या शाळेतील किमान 50 टक्के विद्यार्थी अल्पसंख्यांक समुदायातील (जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा पारशी) असणे आवश्यक आहे. या दर्जामुळे शाळांना शासकीय अनुदान, सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक आणि कर्मचारी भरती, तसेच इतर प्रशासकीय सवलती मिळतात. तथापि, आमदार प्रशांत बंब यांनी सभागृहात मांडले की, राज्यातील काही शाळांनी, विशेषतः अमरावती आणि मुंबई येथील शाळांनी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या 10 ते 20 टक्क्यांपेक्षा कमी असतानाही खोटी कागदपत्रे सादर करून हा दर्जा मिळवला आहे. अल्पसंख्यांक दर्जामुळे या शाळांना आरक्षण धोरणातून सूट मिळते, ज्यामुळे इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक आणि कर्मचारी पदांवर नियुक्तीच्या संधी मर्यादित होतात. याशिवाय, खोट्या माहितीच्या आधारे मिळवलेला हा दर्जा सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा निर्माण करत आहे, कारण या शालांना अनुदान आणि इतर सवलती मिळतात. “काही शाळांनी बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या विद्यार्थी संख्येच्या आकडेवारीद्वारे हा दर्जा मिळवला आहे, ज्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे,” असे बंब यांनी नमूद केले. विशेष समिती स्थापन करणार – शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि लवकरात लवकर चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल, जी राज्यातील सर्व अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळांची कागदपत्रे आणि विद्यार्थी संख्येची पडताळणी करेल. “ज्या शाळांनी नियमांचे उल्लंघन करून खोट्या पद्धतीने अल्पसंख्यांक दर्जा मिळवला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे भुसे यांनी स्पष्ट केले. ही समिती अल्पसंख्यांक दर्जाच्या अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीही उपाययोजना सुचवेल, असे त्यांनी नमूद केले.

खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळा रडारवर,- दादा भुसे Read More »