DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.  महानगरपालिकेमध्ये गेले 35 वर्ष नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेऊन यामध्ये विधानसभेची आता तुम्ही तयारी करा व निवडणूक लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये जाहीरपणे मांडला. बाळासाहेब बोराटे हे गेले 35 वर्ष नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, नियोजन समितीचे सभापती यांसह विविध पदांवर आपल्या कार्याची छाप पाडली आहे.   नुकत्याच त्यांच्या समर्थकांनी तीन दिवसापूर्वी एक बैठक नगर येथे घेतली. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. बाळासाहेब बोराटे यांनी नगर शहरांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून एक नावलौकीक मिळविलेला आहे.  त्यामुळे त्यांनी आता मागे न हटता आगामी काळामध्ये नगर शहरांमध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी भूमिका या बैठकीमध्ये अनेक जणांनी मांडली व त्याला सर्वांनी पाठिंबा सुद्धा दिला.  या बैठकीमध्ये बोराटे यांचा गेल्या 35 वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मांडला. श्री. बोराटे यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य तो समतोल राखलेला असल्याने आज सर्वच क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे.  महानगरपालिकेच्या माध्यमातून असो अथवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो नागरिकांना जिथे जिथे अडचण होत आहे. तिथे सोडवण्यासाठी ते अग्रेसर राहिलेले आहेत अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील नगर शहराच्या प्रत्येक भागांमध्ये त्यांच्या दांडगा संपर्क आहे.  त्यामुळे त्यांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आयोजित विधानसभेची निवडणूक लढवावी असे अनेकांचे मत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये झाली पदाधिकाऱ्यांनी आम्ही बोराटे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत व राहणार आहोत पण यंदा मागचा सर्व अनुभव पाहता त्यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी द्यावी अशी सुद्धा अनेकांनी भूमिका मांडलेली आहे.  पण दुसरीकडे यांनी निवडणूक लढवताना विधानसभा हेच ध्येय समोर ठेवावे अशावर सर्वांचे एकमत झालेले आहे.

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर Read More »

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके

Tattoo Disadvantage : आज अनेकजण स्टायलिश दिसण्यासाठी किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींनीमुळे शरीरावर  टॅटू काढतात. जर तुम्ही देखील टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.   परमनंट टॅटू काढणं तुमच्या ह्रदयासाठी महागात पडू शकतं. कारण याबाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, टॅटू काढलेल्या लोकांना ह्रदय समस्या होण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण असं क टॅटू काढलेल्या त्वचेखालील ग्रंथींचे नुकसान झाल्यामुळे अशा त्वचेवर घाम येत नाही. ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही आणि ह्रदयाचे नुकसान होऊ शकते.  कारण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहणे फार गरजेचं आहे. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार टॅटू काढलेल्या त्वचेवर घाम येण्याची क्षमता कमी होते. टॅटू काढलेल्या त्वचेवर का येत नाही घाम? घाम येणं ही शरीराची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. कारण घामामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीच आपल्या शरीरावर रोमछिद्रे असतात. ज्यातून सतत घाम पाझरत असतो आणि घामामुळे तुमचे शरीर थंड होते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.  टॅटू काढल्यामुळे त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींचे नुकसान होते. कारण टॅटू काढताना तुमच्या त्वचेवर एका मिनीटामध्ये जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्तवेळा सुई टोचली जाते. त्वचेवर असे वेदन झाल्यामुळे त्वचेखालील ग्रंथीचे नुकसान होते आणि त्यांचे कार्य मंदावते. याचाच परिणाम असा होतो की अशा त्वचेवर घाम कमी प्रमाणात येतो.  घामाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढत जाते. काही संशोधनात असंही आढळलं आहे की टॅटू काढलेल्या त्वचेवर येणाऱ्या घामात सोडिअमचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ अशा त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू नाही असा होतो.  टॅटूमुळे ह्रदय विकार होण्याची शक्यता वाढते टॅटू काढल्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप कमी घाम येतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या तापमानावर आणि पर्यायाने ह्रदयावर होतो. टॅटू काढलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान जास्त प्रमाणात वाढते.  हार्ट अॅटकमुळे जीवाला धोका असल्यामुळे लवकर उपचार मिळणं गरजेचं असतं. शिवाय जरी अशा परिस्थितीतून रूग्ण वाचला तरी आयुष्यभर त्याचे ह्रदय कमजोरच राहते. म्हणूनच परमनंट अथवा संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणं तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू काढा पण त्यामुळे तुमच्या शरीर आणि आरोग्यावर काही परिणाम होणार नाही याची अवश्य काळजी घ्या.  कारण फक्त फॅशन म्हणून एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्यामुळे जर तुमच्या आरोग्याचं नुकसान होणार असेल तर याबाबत वेळीच सावध राहणं गरजेचं आहे.

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके Read More »

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक मत झालं आहे. MVA ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून याचा औपचारिक घोषणा दोन दिवसांत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किमान 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर काँग्रेस लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील. उद्धव गट व्हीबीएला दोन जागा देणार आहे. व्हीबीएने पाच जागांची मागणी केली होती.  तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा लढवणार आहे. त्यापैकी मुंबई नॉर्थ ईस्टची एक जागा व्हीबीएला देता येईल. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले असून त्यांचा प्रत्येक गट हा बहुतांश आमदारांसह सत्ताधारी महायुतीच्या युतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून 23 जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले.  शिवसेनेने मुंबईच्या दक्षिण मध्य आणि उत्तर-पश्चिमच्या जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ चंद्रपूर जिंकले, तर राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चारवर विजय मिळवला.  अविभाजित शिवसेनेने 2019 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती आणि लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र तत्कालीन शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. त्यापैकी केवळ 5 खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत, तर उर्वरित 13 खासदार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरे तर, उत्तर प्रदेश (80 जागा) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी विशेष रणनीतीही आखण्यात आली आहे. 2019 मध्ये निकाल कसे लागले? गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने 25 ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चार जागा जिंकल्या. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष व्हीबीएने लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. पण व्हीबीएला सुमारे सात टक्के मते मिळाली. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे 28 टक्के, शिवसेनेला 23 टक्के, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 16 टक्के मते मिळाली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला एक टक्क्यांहून कमी मते मिळाली, परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमला यश मिळाले.

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक Read More »

Mahadev Jankar : ठरलं! महादेव जानकार ‘या’ मतदारसंघातून लाढवणार लोकसभा निवडणूक, कोणाला बसणार फटका ?

Mahadev Jankar : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत आहे.  सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तर राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी एमव्हीए आणि एनडीएमध्ये ‘काटे कि टक्कर’ पाहायला मिळत आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एमव्हीए कि एनडीए यापैकी कोणाला सर्वात जास्त जागा मिळणार याकडे केवळ राज्याचे नाहीतर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.  यातच राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकार राज्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर यापूर्वी ते परभणी किंवा उत्तर प्रदेशममधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता ते माढा मतरदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.   याबाबत आमच्याशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते अजित पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकार यांनी आपल्या काळात राज्यसाठी खूप कामे केली आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जानकार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवायचं संकल्प केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये सध्या विद्यमान खासदारबद्दल निराशा आहे. या मदतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोणतेही विकास कामे पूर्ण झालेली नाही.  तर या मतदारसंघाचा आणि महादेव जानकार यांच्या एक वेगळा नातं आहे. महादेव जानकार यांनी 2009 मध्ये देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी एक लाखांपेक्षा जास्त मत घेतले होते. मात्र आता परिस्थिती बदली आहे आणि यावेळी महादेव जानकार यांच्या जिंकण्याची शक्यता जास्त असल्याची प्रतिकिया त्यांनी यावेळी दिली.  महादेव जानकार आगामी लोकसभा निवडणूक एमव्हीएकडून लढवणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

Mahadev Jankar : ठरलं! महादेव जानकार ‘या’ मतदारसंघातून लाढवणार लोकसभा निवडणूक, कोणाला बसणार फटका ? Read More »

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद

Ahmednagar News:-  इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर येथील भिस्तबाग महलाशेजारील मैदानावर दोन दिवसीय विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या मेळाव्यास विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. एकाच छताखाली त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीच्या संधी प्राप्त झाल्याने जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावना तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. नोकरीमुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गोविंदा मोरे या तरुणाने राहाता येथुन बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. गेल्या दोन वर्षापासुन नोकरीच्या शोधात होता. परंतु नोकरीची संधी मिळाली नाही. महाविद्यालयातील प्राचार्यांनी महारोजगार मेळाव्याबाबत माहिती दिली. महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीसाठी मुलाखत दिली. पहिल्याच प्रयत्नात यश येऊन रिंकल्स ॲकवा या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. नोकरीमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे. शासनाने आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्यामुळे गोरगरीब व होतकरु तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची भावनाही गोविंदाने व्यक्त केली. महारोजगार मेळाव्यामुळे नामांकित कंपनीमध्ये नोकरी संधी  नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या किरण रावताळे व विकास गावित या तरुणांना महारोजगार मेळाव्यातुन पहिल्याच प्रयत्नात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयटीआय मधुन मोटार मेकॅनिकचा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. शासनाने आयोजित केलेल्या या मेळाव्याची माहिती भेटली आणि लगोलग अहमदनगर गाठले. महिंद्रा अँड महिंद्रासारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने या संधीच सोन करत अर्थाजनाबरोबरच नवीन टेक्नॉलॉजीची माहिती यातुन होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे एक नवी उभारी मिळाल्याचेही तरुणांनी सांगितले. महारोजगार मेळाव्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची उपलब्धता  शासनाने आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे एकाच छताखाली वेगवेगळे कौशल्य असलेले मनुष्यबळ कंपनीस उपलब्ध झाले.  यातुन अनेक तरुण-तरुणींना रोजगारही देता आला.  प्रशासनाने या महारोजगार मेळाव्याचे उत्कृष्टपणे व्यवस्थापन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजित केलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तरुण-तरुणींच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली. दरवर्षी अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्यात येऊन कंपन्यांना मनुष्यबळ व उद्योगांना मनुष्यबळ मिळणे सोईचे होणार असल्याची भावना इंडोस्कल्प ऑटोकॉम्प प्राइवेट लिमिटेडचे रघुनाथ कलकर, श्‍नायडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लिमिटेडचे विरेंद्र दहिफळे यांच्यासह विविध उद्योजकांनी बोलुन दाखवली.

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद Read More »

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न

Maratha Reservation: राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे.  मात्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होत आणि आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज 50 % च्या आत ओबीसी मधुन आरक्षणाची  मागणी करत आहे.  मागील चार – पाच महिन्यापासून मराठवाडा परिसरातील अंतरवली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी याच मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यापूर्वी अंतरवली येथे आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीहल्ला केला ज्यामध्ये अनेक महिला आणि मुलांना सुद्धा जखमा झालेल्या आहेत सदर हल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी करूनही जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आरक्षणाची जी मागणी मराठा समाजाने केलेली आहे त्याबद्दल सरकारने मागणी मान्य केल्याचे सांगितले आहे मात्र तिची पूर्तता आणि कार्यवाही करण्यासाठी अजूनही पुरेसे आदेश काढलेले नाहीत आणि सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मात्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करून कायद्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे, आंदोलकांची बदनामी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.   यामुळे आपण आंदोलन मोडित काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी आणि आंदोलकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न Read More »

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा

Health Tips: राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल.  परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात.  आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे. राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स  राग येण्याचे संकेत  जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी. रागाची लक्षणे  धैर्याचा बांध तुटणे. चिडचिडेपणा. अस्वस्थता वाढणे. शंका व संशयी भाव वाढणे. प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे. अपमान करणे. संबधीत व्यक्तीस कमी लेखणे. वर्तमानात सभोवतालचे भान नसणे. पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात. हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते.  रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे. राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय  1) 10 पर्यंत अंकांची गणना जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल. 2) एक ब्रेक घ्यावा  जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा. 3) प्राणायाम करून राग घालवा  प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो.  तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो. 4) निवांत झोप  कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल.  प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल. तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला.

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा Read More »

Maruti Ertiga खरेदी करता येणार फक्त 2 लाखात, ऑफर जाणुन व्हाल थक्क

Maruti Ertiga: आज भारतीय बाजारपेठेमध्ये 7 सीटर कारला मोठी मागणी आली आहे. यामुळे बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त 7 सीटर कार्स लॉन्च होताना दिसत आहे.  आज बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 7 सिटर कार्समध्ये Maruti Ertiga पहिल्या नंबरवर आहे. या कारमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स आणि जास्त स्पेस उपलब्ध असल्याने या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  यातच जर तुम्ही मारुती अर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Maruti Ertiga किंमत  भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीने ही कार 10 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे आणि सध्या सुमारे 11 लाख रुपयांना ही कार विकली जात आहे. इतके पैसे देऊन कार घेणे ही सामान्य माणसासाठी साधी गोष्ट नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही ऑफर्स घेऊन आलो आहोत ज्या अंतर्गत तुम्ही मारुती अर्टिगा फक्त ₹ 200000 मध्ये खरेदी करू शकता. Maruti Ertiga ऑफर  देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Car Dekho च्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 2015 मॉडेल मारुती एर्टिगा मिळेल. त्याची किंमत 4.85 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला व्हाईट कलरची एर्टिगा हवी असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता. येथे तुम्हाला 2013 मॉडेल Ertiga देखील मिळेल ज्याची किंमत ₹200000 आहे. जर तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर तुम्ही ही कार खरेदी करू शकता.   याशिवाय मारुतीच्या स्वतःच्या वेबसाइट ट्रू व्हॅल्यूवर 2015 मॉडेल एर्टिगा देखील विकली जात आहे. त्याची किंमत 40000 रुपये ठेवण्यात आली आहे. येथून कार खरेदी केल्यास तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

Maruti Ertiga खरेदी करता येणार फक्त 2 लाखात, ऑफर जाणुन व्हाल थक्क Read More »

New Rules: मोठी बातमी! उद्यापासून देशात बदलणार ‘हे’ नियम, बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला फटका?

New Rules: उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. याचबरोबर देशात देखील नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नियमात बदल होणार आहे. ज्याच्या फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. हे जाणुन घ्या, देशात 1 मार्चपासून केवायसी, जीएसटी, एलपीजी सिलिंडर आणि बँकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत.   एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. 1 मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सोशल मीडियाचे नवीन नियम 1 मार्च रोजी सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहे. सरकारने नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू केले आहेत. जे फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना फॉलो करावे लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. बँक सुट्टी आरबीआयने मार्चमध्ये होणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. आणि 14 दिवसांपैकी 8 सुट्या सणांसाठी आहेत. फास्टॅग केवायसी नियम तुम्ही अजून FasTag KYC अपडेट केले नसेल, तर ते 29 मार्च 2024 पर्यंत करा. NHAI ने Fastag KYC साठी KYC अपडेट अनिवार्य केले आहे. काम पूर्ण न झाल्यास तुमचे फास्टॅग खाते काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. जीएसटीशी संबंधित नवीन नियम लागू होणार   करचोरी रोखण्यासाठी जीएसटीशी संबंधित नवीन नियम 1 मार्चपासून लागू होऊ शकतो. ज्या अंतर्गत ई-चलानसाठी ई-वे बिल तयार करण्याची गरज भासणार नाही.

New Rules: मोठी बातमी! उद्यापासून देशात बदलणार ‘हे’ नियम, बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला फटका? Read More »