Dnamarathi.com

Maratha Reservation: राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे.  मात्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होत आणि आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आला आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज 50 % च्या आत ओबीसी मधुन आरक्षणाची  मागणी करत आहे. 

मागील चार – पाच महिन्यापासून मराठवाडा परिसरातील अंतरवली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी याच मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

यापूर्वी अंतरवली येथे आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीहल्ला केला ज्यामध्ये अनेक महिला आणि मुलांना सुद्धा जखमा झालेल्या आहेत सदर हल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी करूनही जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

आरक्षणाची जी मागणी मराठा समाजाने केलेली आहे त्याबद्दल सरकारने मागणी मान्य केल्याचे सांगितले आहे मात्र तिची पूर्तता आणि कार्यवाही करण्यासाठी अजूनही पुरेसे आदेश काढलेले नाहीत आणि सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मात्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करून कायद्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे, आंदोलकांची बदनामी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.  

यामुळे आपण आंदोलन मोडित काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी आणि आंदोलकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *