Dnamarathi.com

Mahadev Jankar : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत आहे.  सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तर राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी एमव्हीए आणि एनडीएमध्ये ‘काटे कि टक्कर’ पाहायला मिळत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एमव्हीए कि एनडीए यापैकी कोणाला सर्वात जास्त जागा मिळणार याकडे केवळ राज्याचे नाहीतर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. 

यातच राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकार राज्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

तर यापूर्वी ते परभणी किंवा उत्तर प्रदेशममधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता ते माढा मतरदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 

 याबाबत आमच्याशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते अजित पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकार यांनी आपल्या काळात राज्यसाठी खूप कामे केली आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जानकार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवायचं संकल्प केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये सध्या विद्यमान खासदारबद्दल निराशा आहे. या मदतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोणतेही विकास कामे पूर्ण झालेली नाही. 

तर या मतदारसंघाचा आणि महादेव जानकार यांच्या एक वेगळा नातं आहे. महादेव जानकार यांनी 2009 मध्ये देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी एक लाखांपेक्षा जास्त मत घेतले होते. मात्र आता परिस्थिती बदली आहे आणि यावेळी महादेव जानकार यांच्या जिंकण्याची शक्यता जास्त असल्याची प्रतिकिया त्यांनी यावेळी दिली. 

महादेव जानकार आगामी लोकसभा निवडणूक एमव्हीएकडून लढवणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *