Dnamarathi.com

Maruti Ertiga: आज भारतीय बाजारपेठेमध्ये 7 सीटर कारला मोठी मागणी आली आहे. यामुळे बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त 7 सीटर कार्स लॉन्च होताना दिसत आहे. 

आज बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 7 सिटर कार्समध्ये Maruti Ertiga पहिल्या नंबरवर आहे. या कारमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स आणि जास्त स्पेस उपलब्ध असल्याने या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

यातच जर तुम्ही मारुती अर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Maruti Ertiga किंमत 

भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीने ही कार 10 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे आणि सध्या सुमारे 11 लाख रुपयांना ही कार विकली जात आहे.

इतके पैसे देऊन कार घेणे ही सामान्य माणसासाठी साधी गोष्ट नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही ऑफर्स घेऊन आलो आहोत ज्या अंतर्गत तुम्ही मारुती अर्टिगा फक्त ₹ 200000 मध्ये खरेदी करू शकता.

Maruti Ertiga ऑफर 

देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Car Dekho च्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 2015 मॉडेल मारुती एर्टिगा मिळेल. त्याची किंमत 4.85 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला व्हाईट कलरची एर्टिगा हवी असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता.

येथे तुम्हाला 2013 मॉडेल Ertiga देखील मिळेल ज्याची किंमत ₹200000 आहे. जर तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर तुम्ही ही कार खरेदी करू शकता.  

याशिवाय मारुतीच्या स्वतःच्या वेबसाइट ट्रू व्हॅल्यूवर 2015 मॉडेल एर्टिगा देखील विकली जात आहे. त्याची किंमत 40000 रुपये ठेवण्यात आली आहे. येथून कार खरेदी केल्यास तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *