DNA मराठी

ताज्या बातम्या

Manoj Jarange Narco Test : ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, ‘त्या’ प्रकरणात भाजपने केली मोठी मागणी; अनेक चर्चांना उधाण 

Manoj Jarange Narco Test : ओबीसीमधून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.  पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर  विधिमंडळात सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद पाहायला मिळाले.  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेत एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.   तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना अटक करून त्यांचा  नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे.  याच बरोबर पाटील यांच्या विधानामागे कोण आहे? याची देखील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली. तर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, मी मराठा समाजाचे काम करत आहे आणि ते सत्तेचा वापर.  आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस गोळी चालवणार आहेत मात्र मी मी कुठेच अडकू शकत नाही. कारण मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत.

Manoj Jarange Narco Test : ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, ‘त्या’ प्रकरणात भाजपने केली मोठी मागणी; अनेक चर्चांना उधाण  Read More »

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे. अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.  टरबूज, संत्रा, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी  पावसासह काही भागात गारपीट झाली आहे. राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.  तरी यांकडे अकोला जिल्हाअधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ज्वारी,कादा संञा, या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा, कादा काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लोहारा ,कवठा,बहादूरा, निंबा, हाता,जानोरी,वझेगाव, अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी Read More »

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र …….

Dhruv Jurel : भारतीय संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.   रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता असा विक्रम केला आहे जो त्याला  लक्षात ठेवायला आवडणार नाही.  रांची कसोटीमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या. या डावात 171 धावांच्या स्कोअरवर भारताने 7 विकेट गमावल्या होत्या पण ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी करत  इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा संपुष्टात आणल्या. ध्रुव जुरेलमुळे इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी घेता आली.  महेंद्रसिंग धोनीच्या यादीत ध्रुवचा समावेश  2012 मध्ये नागपूर कसोटीत महेंद्रसिंग धोनी 99 धावा करून धावबाद झाला होता. तर 2007 मध्ये ओव्हल कसोटीमध्ये तो 92 धावावर बाद झाला होता. तर आता रांची कसोटीमध्ये ध्रुव जुरेल देखील 90 धावांवर बाद झाला आहे.  रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लडचा 5 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकामुळे संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत सापडला होता आणि संघाने 177 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या पण येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या भागीदारीने भारताला 307 धावांपर्यंत नेले.  दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. आर अश्विनने 5 तर कुलदीपने 4 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र ……. Read More »

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि आमदार संजय गायकवाड अचानक चर्चेत आले आहे. त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.  गायकवाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हा दावा केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचा दावा केला असून त्याच वाघाचे दात गळ्यात घातले आहेत. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे कथित दातही जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा दावा खरा ठरल्यास त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संजय गायकवाड यांनी दावा केला आहे की, आपण 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली होती आणि त्याचे तुकडे गळ्यात घातले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी शुक्रवारी दात असलेली जपमाळ जप्त केली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवली. वाघाचे दात खरेच काढले आहेत का, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की लॅबचे निकाल 20 ते 25 दिवसांत येण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्याचे दावे खरे ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे नेते असून त्यांनी अलीकडेच वाघाची शिकार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.  गायकवाड यांचे दावे खरे ठरले तर ते मोठे संकटात सापडू शकतात. कारण या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल Read More »

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने राज्यभरात मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. मनोज जरांगे बॅकफूटवर? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अपशब्द वापरले. यानंतर त्यांचे सहकारी मंचावर आले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अंतरवली सराईत पत्रकारांशी बोलत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्याला भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि लगेच निघाले.  नंतर रात्री जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करून सकाळी पुन्हा मुंबईला जाण्याचा बेत होता, मात्र प्रशासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे मनोज जरांगे यांनी आपला निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत परतले आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांना परत येण्याची विनंती केली आहे. अंबड तालुक्यात हिंसाचार जालना – घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सोमवारी सकाळी आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याचा आरोप आहे. बस अंबडहून रामसगावकडे जात होती. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस थांबवून तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात संचारबंदी लागू कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, प्रसारमाध्यमे आणि रुग्णालये यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. एसटी बससेवा बंद मनोज जरांगे यांच्या हालचाली पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. इंटरनेट डाऊन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढला.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू Read More »

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे  संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली. तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी आंदोलन सूरू झाले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार आज नगर शहरातील विविध भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.  या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शहरातील एमआयडीसी परिसरातील बायपास चौकात मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला.   यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गोरख दळवी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.  एकदिवशीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा केसानी गळा कापला आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केले नाही. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची फसवणूक करत आहे, अशी प्रतिक्रिया गोरख दळवी यांनी DNA मराठीशी बोलताना दिली.

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News: नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.  अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.  सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation: बारसकर हा गद्दारच, सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न! मराठा क्रांती मोर्चा

Maratha Reservation: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे. यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिला आहे.   मात्र हा आरक्षण मान्य नाही, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा पाटील यांनी केली आहे.  तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केल्याने सध्या मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पाडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आता सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर आता मराठा समाजाच्या संघटने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून त्यांच्यावर टिका केली आहे.  अहमदनगर शहरात झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये अजय बारस्कर हा सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.अजय बारस्कर यांनी एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेले होते असं देखील आरोप यावेळी करण्यात आले.  सुरवाती पासून आंदोलनात फूट पडावी म्हणून बारस्कर प्रयत्न करत होते म्हणून त्यांना दोन महिन्यापूर्वीच संघटनेमधून हाकलून देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली.  सरकारकडून या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारसकर हा गद्दारच, सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न! मराठा क्रांती मोर्चा Read More »

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे.   या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे. यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी Read More »