DNA मराठी

ताज्या बातम्या

GPay मध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सर्वकाही नाहीतर होणार नुकसान

GPay Update: देशात ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ॲप पैकी एक असणारा GPay मध्ये या वर्षाच्या अखेरीस मोठे बदल पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, आता GPay मध्ये UPI सर्कल, UPI व्हाउचर आणि क्लिक पे QR सारखी नवीन फीचर्स जोडले जाणार आहे. कंपनीने भारतात नुकत्याच झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये प्रथमच ही नवीन फीचर्स सादर केली. UPI सर्कल ही एक सिस्टम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे UPI खाते इतर वापरकर्त्यांना (दुय्यम वापरकर्ते) वापरण्याची परवानगी देऊ शकता. ही सिस्टम एखाद्या स्ट्रीमिंग ॲपची सदस्यता घेण्यासारखी आहे आणि एकाधिक वापरकर्त्यांना त्यात एक्सेस देण्यासारखी आहे. तथापि, पैसे हस्तांतरित करण्याचे संपूर्ण नियंत्रण खातेदाराकडे राहील.  रिपोर्ट्सनुसार, दुय्यम वापरकर्ता एका महिन्यात केवळ एका निश्चित रकमेपर्यंत व्यवहार करू शकेल. एका वेळी हस्तांतरित करता येणाऱ्या रकमेवरही मर्यादा असेल. यामुळे पैसे गमावण्याची भीती राहणार नाही. दुय्यम वापरकर्त्याला खाते प्रवेश दोन प्रकारे मंजूर केला जाऊ शकतो: आंशिक प्रतिनिधी आणि पूर्ण प्रतिनिधी. खातेदार जास्तीत जास्त पाच विश्वासू लोकांना दुय्यम वापरकर्ते बनवू शकतो. आंशिक डेलिगेशनमध्ये, दुय्यम वापरकर्ता प्रत्येक व्यवहार तेव्हाच करू शकेल जेव्हा खातेदार त्याला तसे करण्याची परवानगी देईल. यामध्ये खातेदाराचे प्रत्येक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण असेल. संपूर्ण डेलिगेशनमध्ये, खातेदार एका महिन्यात वापरल्या जाणाऱ्या रकमेवर मर्यादा सेट करू शकतो. खातेदार ही मर्यादा ₹ 15000 पर्यंत सेट करू शकतात. दुय्यम वापरकर्ता या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाही. अशा प्रकारे, दुय्यम वापरकर्त्याला प्रत्येक वेळी विहित रकमेत व्यवहार करायचा असेल तेव्हा खातेधारकाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. दुय्यम वापरकर्ता एका वेळी जास्तीत जास्त फक्त ₹ 5000 चे व्यवहार करू शकेल.

GPay मध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सर्वकाही नाहीतर होणार नुकसान Read More »

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ

Nitesh Rane :  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी  नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  काय म्हणाले होते नितेश राणे  रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते,  या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरण काय महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती. तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ Read More »

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरूण संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.  यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे.  यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही कारण ते स्वतः मूर्तिकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितन्नी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर या मध्ये दोषी आहे अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले Read More »

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र

AIMIM News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकारण चांगलंच तापला आहे.  सध्या या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली. यातच अहमदनगर एआयएमआयएम जिल्हाप्रमुख  डॉ. परवेज अशरफी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हस्ते डिसेंबर २०२३   राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष ही टिकला नाही.  महाराष्ट्रातील रयतेचे राजे ज्यांनी १८ पगड जाती आणि १२  बलुतेदार यांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यातच पाडला. यावरून स्पष्ट दिसते की महायुती सरकार आणि त्यांनी दिलेला ठेकेदार हे सर्वांनी भ्रष्टाचार करण्यात महाराजांनाही सोडलं नाही. पुतळा उभारण्यात ज्या ज्या बाबींची दक्षता घेणे आवशक होते त्या बाबींचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. अवघ्या दोन महिन्यात सरकारने महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देऊन इतका मोठा पुतळा उभारण्याचा ज्याला काहीही अनुभव नाही अश्या व्यक्तीची शिफारस करून काम दिले.   मागील १० वर्षात मोदी सरकार यांनी बांधलेले पूल पैकी बहुतांश कोसळले, भव्य प्रभू रामाचे मंदिर सुधा गळायला लागले, नवीन संसद गळायला लागले, प्रभू राम मंदिर जवळील नवीन झालेले रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले,  ज्यावेळेस पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हा काही शिवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती की सदर महाराजांचा पुतळा याचा दर्जा टिकण्या सारखे नसून चहेऱ्यावरचे  हावभाव महाराजांचे नाही परंतु त्या विषयाला महायुती सरकारने दुर्लक्ष केले.  महाराजांचे नावाने  राजकारण करतात त्याच महाराजांचे पुतळ्यात महायुती सरकारात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. पुतळा कोसळल्यावर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की वारे जोराने वाहत होते त्यामुळे पुतळा कोसडला. यावरून असे दिसते की मुख्यमंत्री यांना घटनेचा कोणताही गांभीर्य नव्हता किंवा त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेची माफी मागितली. परंतु सदर माफी ही फक्त ढोंग  किंवा राजकीय नुकसान वाचवण्याचे हेतूने मागितली आहे. म्हणजेच  मागितलेली माफी ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा टोला डॉ परवेज अशरफी यांनी लावला. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागावी आणि कोणताही विलंब न करता आपले पदाचे राजीनामे द्यावे असा सल्ला डॉ परवेज अशरफी यांनी दिला. महाराजांचा पुतळा उभारण्यात जी सरकार भ्रष्टाचार करत असेल तर महाराजांच्या जनतेला न्याय कुठून देणार? असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल

Ahmednagar News:  शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर तालुक्यातील मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून 6 वर्षे झाली असून, अद्याप शेतकऱ्यांना त्याचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही. सदर दावे शेतकऱ्यांनी एएमएस कन्सलटन्स यांच्याकडे दिले असून, शेतकऱ्यांची त्यांच्या बाबत कुठलीही शंका नाही. कन्सलटन्स कडून कशाचीही मागणी करण्यात आलेली नसून, शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिलेले नाही. सदर प्रकरणी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या एएमएस कन्सलटन्स यांची बदनामी करण्याचे षडयंत्र बनवले असून, ते त्यांना टारगेट करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोष पसरला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जे व्यक्ती शेतकऱ्यांचा कळवळा करण्याचा आव आणत आहे. सर्व शेतकरी गेली 5 ते 6 वर्षा पासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत, मग हे मंडळी काय करत होती? असा प्रश्‍न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल Read More »

Nanded News : धक्कादायक! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात अळ्या

Nanded News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. कावेरी गणेश काळबांडे अस या विद्यार्थिनींचे नाव आहे.ती या आश्रम शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहेत.तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात.सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या. याच जखमेमध्ये चक्क अळ्या झाल्या.डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या विध्यार्थीनी वर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Nanded News : धक्कादायक! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात अळ्या Read More »

सावधान, Covid -19 मुळे मानसिक संतुलन बिघडू शकते, संशोधनात धक्कादायक माहिती

Covid -19 : संपूर्ण देशात हाहाकार माजविणारा कोविड-19 बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे.   सध्या कोविडचा धोका संपला आहे पण त्याचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. कोविड 19 च्या धोकादायक विषाणूमुळे मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. SARS-CoV-2 विषाणू जो कोविड-19 साथीच्या रोगासाठी जबाबदार आहे तो एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला संक्रमित करू शकतो.  उंदरांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधकांनी सांगितले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळे ते मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये पसरू शकते आणि संसर्ग होऊ शकतो. स्पाइक प्रोटीन उत्परिवर्तन किती महत्वाचे आहे? नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अभ्यास स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागावर केंद्रित आहे. याला फ्युरिन क्लीवेज साइट म्हणतात. हे सहसा व्हायरसला मज्जातंतूंच्या पृष्ठभागावरील ACE2 रिसेप्टरला बांधून मेंदूमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. तथापि, जेव्हा ही साइट काढून टाकली जाते, तेव्हा व्हायरसला इतर मार्ग शोधावे लागतात.  हे मागील मार्गाने पेशींमध्ये पोहोचते ज्यामुळे मेंदूमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरतो. काही कोविड रूग्णांमध्ये, चक्कर येणे आणि विसरणे यासह अशा प्रकारचे न्यूरोलॉजिकल लक्षणे कधीकधी दिसतात. उंदरांवरील संशोधनात उघड झाले आहे संशोधकांनी उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर ही समस्या समोर आली आहे. संशोधनात, या उंदरांना SARS-CoV-2 ने संक्रमित केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी फुफ्फुस आणि मेंदूच्या दोन्ही ऊतकांमधील विषाणूजन्य जीनोमचे विश्लेषण केले. हे स्पष्ट झाले की फ्युरिन क्लीव्हेज साइट उत्परिवर्तनासह विषाणू मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम करतात. लोकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत संशोधन केले लोकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत हे संशोधन करण्यात आले. मात्र, हे संशोधन उंदरांवर करण्यात आले असून ते मानवांसाठीही सत्य आहे हे सिद्ध करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ सध्या हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की उत्परिवर्तनानंतर कोरोनाव्हायरस मेंदूमध्ये प्रवेश करण्याची अधिक शक्यता का होते.

सावधान, Covid -19 मुळे मानसिक संतुलन बिघडू शकते, संशोधनात धक्कादायक माहिती Read More »

Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हवाई दलाचे MI-17 हेलिकॉप्टर क्रॅश

Kedarnath Helicopter Crash: एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, केदारनाथमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी एमआय-17 विमानाने गौचर हवाई पट्टीवर नेत असलेले हेलिकॉप्टर अचानक गौचरच्या मध्यभागी भिंबळीजवळ दरीत कोसळले. 24 मे 2024 रोजी तांत्रिक बिघाडामुळे एअरलिफ्ट केलेल्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. अपघात कसा झाला? माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर दुरुस्तीच्या कामासाठी नेले जात होते. हे हेलिकॉप्टर एमआय-17 विमानाने उड्डाण केले. मात्र वाऱ्याचा प्रभाव आणि हेलिकॉप्टरचे वजन यामुळे अचानक संतुलन बिघडू लागले, त्यामुळे पायलटने ते दरीत टाकले. 24 मे रोजी Kestrel Aviation चे हेलिकॉप्टर तुटले होते, ज्यामध्ये 6 प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी हेलिकॉप्टर हवेत 8 वेळा फिरले. तेव्हापासून हेलिपॅडवर उभे होते. त्यानंतर आज ते गौचर एअरबेसवर दुरुस्तीसाठी नेण्यात येत होते. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही प्रवासी किंवा कोणतेही सामान नव्हते, त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. अधिकाऱ्याने माहिती दिली जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे सांगतात, ‘शनिवारी दुरुस्तीसाठी MI-17 विमानाच्या मदतीने हेलिकॉप्टर गौचर हवाईपट्टीत नेण्याची योजना होती. थोडे अंतर कापल्यानंतर MI-17 ने तोल गमावण्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरचे वजन आणि वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर थारू कॅम्पजवळ उतरावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी किंवा सामान नव्हते. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी करत आहेत.

Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हवाई दलाचे MI-17 हेलिकॉप्टर क्रॅश Read More »

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

Rain Alert: गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.  हवामान खात्याने म्हटले आहे की नवीन तीव्र दाबामुळे उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सल्लागारात म्हटले आहे की पाऊस पश्चिम आणि नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम दक्षिण राजस्थान आणि गुजरातवर होईल आणि नंतर 29 ऑगस्टपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छपर्यंत पोहोचेल, त्यानुसार येथे हवामान खराब होण्याची शक्यता आहे. हवामान अद्यतनांनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडसह इतर भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा व्यतिरिक्त, IMD ने जोरदार वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे. मध्य प्रदेशात ताशी 50 किमी आणि दक्षिण राजस्थानमध्ये 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मच्छिमारांसाठी IMD चा सल्ला भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना 30 ऑगस्टपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात, विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपास जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट कोलकात्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गुजरातमधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमध्ये पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी Read More »