Sanjay Gaikwad : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि आमदार संजय गायकवाड अचानक चर्चेत आले आहे. त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गायकवाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हा दावा केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचा दावा केला असून त्याच वाघाचे दात गळ्यात घातले आहेत. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे कथित दातही जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा दावा खरा ठरल्यास त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संजय गायकवाड यांनी दावा केला आहे की, आपण 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली होती आणि त्याचे तुकडे गळ्यात घातले होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी शुक्रवारी दात असलेली जपमाळ जप्त केली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवली. वाघाचे दात खरेच काढले आहेत का, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.
आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की लॅबचे निकाल 20 ते 25 दिवसांत येण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्याचे दावे खरे ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे नेते असून त्यांनी अलीकडेच वाघाची शिकार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
गायकवाड यांचे दावे खरे ठरले तर ते मोठे संकटात सापडू शकतात. कारण या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.