DNA मराठी

ताज्या बातम्या

IMG 20250228 WA0002

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक

Ahilyanagar News: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. तसेच 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गणेश नवनाथ घोरतळे, (22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यात लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात गणेश नवनाथ घोरतळे याने त्याच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा सन 1985 ते कलम 8(b), 18 प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी दिली आहे.

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक Read More »

Vijay Wadettiwar

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकारावरून आता विरोधकांनी सरकारवर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून शक्ती कायदा आणत नसल्याची टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने आणलेले शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केले नाही त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येणार नाही. आम्ही गेले अडीच वर्ष मागणी करतोय या कायद्याची अंमलबजावणी करावी पण या कायद्याबाबत महायुती सरकारने काहीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अस असताना महायुती सरकारची ही भूमिका खेदजनक आहे. महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून विधेयक अजून मंजूर करण्यात आलेला नाही का ? महिलांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करण्याची संधी महायुती सरकारने सोडली नाहीं. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल Read More »

IMG 20250228 WA0001

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल  करण्यात यावा या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड, अखंड मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रशांत कोरटकर, नागपुर या विक्षिप्त इसमांने इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत साहेब यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ मा साहेब, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचेबाबत अतिशय हिनदर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे शिद्रोही प्रशांत कोरटकर वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयमध्ये चालवावा अशी विनंती अखंड मराठा समाज व सर्व शिवप्रेमी यांच्यावतीने करत आहोत. अशा विकृत प्रवृत्ती असणा-या इसमावर कडक कारवाई न झाल्यास जी काही गंभीर परिस्थिती उध्दभवेल त्या सर्व परिस्थितीस महाराष्ट्र राज्य सरकार व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील या निवेदनाच्या मार्फत देण्यात आला आहे.

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा Read More »

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण

Ladki Bahin Yojana : आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळणार आहे. माहितीनुसार, अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. लाडकी बहिण योजनेचे हफ्त्यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे. मात्र आता सरकारकडूनलाडकी बहीण योजनेचे निर्षकाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींच्या संख्येत घट होत आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात हफ्ता जमा करण्यात आला होता तर जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात 2 कोटी 37 लाख महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदाराकडे पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. त्यामुळे या योजनेत भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण Read More »

ENG VsAFG

ENG vs AFG: अफगाणिस्तानचा इंग्लंडला धक्का, रोमांचक सामन्यात मिळवला विजय

ENG vs AFG: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला धक्का देत या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या रोमांचक सामन्यात इब्राहिम झद्रानने 177 धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 325 धावा केल्या. जो रूटचे शतक व्यर्थलक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र त्यानंतर जो रूटने जबाबदारी घेतली आणि 101 चेंडूत शतक झळकावले. दुसरीकडून इंग्लंडच्या विकेट सतत पडत राहिल्या आणि संपूर्ण संघ 317 धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगिरीअफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. अझमतुल्लाह उमरझाई आणि रशीद खान यांनी महत्त्वाचे विकेट घेतले आणि इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. या विजयासह, अफगाणिस्तानने स्पर्धेत आपला मजबूत दावा सादर केला, तर इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील प्रवास संपुष्टात आला. अफगाणिस्तानचा हा विजय त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानला जात आहे.

ENG vs AFG: अफगाणिस्तानचा इंग्लंडला धक्का, रोमांचक सामन्यात मिळवला विजय Read More »

FB IMG 1740629937639

Narhari Zirwal: मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal: सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले येथील अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतीच्या कामांचे भूमिपूजन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे, नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, विश्वस्त परबत नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब भोर, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, देवस्थानचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदी उपस्थित होते. अगस्ति महाराजांचे दर्शन व महापूजेचा लाभ घेण्याने आनंद झाल्याचे नमूद करून मंत्री झिरवाळ म्हणाले, अगस्ति ऋषींची महती संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. असे पवित्र स्थान देशभरात अन्यत्र कुठेही नाही, असे त्यांनी सांगितले. दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले आहेत. एकूण 98 टँकर तपासण्यात आले, त्यापैकी काही परत पाठवण्यात आले. पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार लहामटे म्हणाले, शासनाकडून दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. उपसचिव विजय चौधरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागात नुकतीच 280 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये अकोले तालुक्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. के. डी. धुमाळ यांनी केले. तत्पूर्वी, महाशिवरात्री निमित्त पहाटे तीन वाजता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महापूजा केली.

Narhari Zirwal: मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »

AIMIM

मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करा, एमआयएम आक्रमक

AIMIM On Madhi Gram Panchayat : सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या ज्या राज्यात भाजप किंवा त्यांच्या घटक पक्षाची सरकार आहे. तिथे काही जातीवादी संघटन सक्रीय झाले असून या जातीवादी संघटना एकच काम करत आहे ते म्हणजे मुस्लीम अल्पसंख्यांक समाजा विरोधात भाष्य करणे, त्यांचे दर्ग्याची विटंबना करणे, मशिदीची विटंबना करणे, मुस्लीमांच्या जागांवर कब्जे मारणे, आपल्या भाषणात मुस्लीम अल्पसंख्याक समाजाला उद्देशून खालच्या पातळीची टीका करणे, मशीदीवर जाणूनबुजून गुलाल फेकणे, बुरखाधारी महिलांची छेड काढणे, दर्ग्यावर कब्जा करून सामान्य जनतेला आपले धार्मिक स्थळ असल्याचे चुकीची माहिती देऊन जातीय तेढ निर्माण करणे, मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाचा युवा एकटे दिसले तर काही जातीवादी संघटनेचे गुंडांनी त्यांच्यावर नाकळत हल्ला करणे, गऊ रक्षकच्या नावाखाली शेतकऱ्यांचे गाड्या धरणे, नंतर तडजोड करून सोडून देणे, तडजोड झाली नाहीत तर पोलिसांच्या ताब्यात देणे, मुस्लीम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकणे असे अनेक प्रकारे मुस्लीम अल्प्संख्यांक समाजाला लक्ष्य करत आहे.असे प्रकार सर्रास चालू असल्याचे एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी सांगितले. हे सर्व घडत असतांना सरकार आणि प्रशासन यांची बघ्याची भूमिका पाहायला मिळाली. जणू काही त्यांना वरिष्ठांचे आदेश आहे, की कोणतीच कारवाई करू नाही. याचाच फायदा घेऊन मढी गाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी लवकरच होणाऱ्या मढी यात्रेत मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाला दुकाने लावण्यास बंदी घातल्याचा ठराव पारित केला. आणि बातमी पूर्ण देशात आगी सारखी पसरली. ठराव पारित करून संबंधित ग्रामपंचायतने भारतीय संविधानाचा अपमान केले असल्याचे आरोप एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केली.व एमआयएम,अल्पसंख्याक विकास मंडळ, समस्त मुस्लिम समाज ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदनाचे पत्र दिले. पत्रात पुढे असे नमूद केले की, मढी देवस्थान हे खूब जुने देवस्थान असून तिथे व यात्रेत भाविक दर्शनासाठी येतात तसेच यात्रेत सर्व धर्माचे नागरिक दुकाने लाऊन आपले जीवन जगतात. परंतु मढी ग्रामपंचायत सदस्याने मुस्लीम समाजा विरोधात जो ठराव मंजूर केले आहे ते भारतीय राज्य घटनेचा अपमान असून या ग्रामपंचायत सदस्यांवर लोकप्रतिनिधी कायदा अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी आपला पदाचा दुरुपयोग केले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. सदर ग्रामपंचायत सदस्य हे त्या गाव चे लोकप्रतिनिधी असून त्यांची जबाबदारी आहे की सर्व धर्माच्या नागरिकांना एक सारखा न्याय द्यावा. परंतु या उलट या ग्रामपंचायत सदस्यांनी मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाला बंदी घालून मुस्लीम अल्पसंख्यांक समाजावर अन्याय तर केलाच पण त्यांनी भारतीय राज्य घटनेचा पण अपमान केले असल्याचे आरोप एमआयएम,अल्पसंख्याक विकास मंडळ, समस्त मुस्लिम समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. निवेदनात मागणी केली आहे की, या ग्रामपंचायत सदस्यांना जर याची शिक्षा मिळाली नाही तर असे कोणीही आपल्या परीने ठराव मंजूर करून गोरगरीब नागरिकांवर अत्याचार करेल यात भविष्यात फक्त मुस्लीम समाज नव्हे तर इतर अल्पसंख्यांक समाज मागासलेले समाज व गरीब कुटुंब यांच्यावर अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ग्रामपंचायत सदस्यांवर सरपंचा सहित ज्या ज्या लोकांनी ठरावाला मंजुरी दिली सर्वांचे सदस्यपद रद्द करणे हाच परयाय आहे. ज्यामुळे भविष्यात कोणतेही समाजाला उद्देशून चुकीचे ठराव करणे तसेच भाष्य करणे यावर प्रतिबंध येईल. निवेदनाचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालक मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करा, एमआयएम आक्रमक Read More »

Eknath Shinde 1

Mission Tiger: पुण्यात शिंदेंना धक्का, मिशन टायगर अडकलं अटी शर्तींच्या गर्तेत?

Mission Tiger : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार, खासदार , पदाधिकारी फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून मिशन टायगर राबवण्यात येत आहे मात्र या मिशनला पुण्यात मोठा धक्का लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माहितीनुसार पुण्यातील एका माजी आमदाराने 15 ते 20 नगरसेवक आणि शहराध्यक्ष पद द्या अशी अट शिंदेंसमोर ठेवली आहे. याच बरोबर म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद यापैकी एकावर संधी द्या अशी अट देखील माजी आमदाराने ठेवली आहे. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवा मग पक्ष कसा वाढतो ते दाखवतो असं माजी आमदारचं म्हणणं आहे. माहितीनुसार मिशन टायगरला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं ओळखून या माजी आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेकडे शहराध्यक्ष पदाची अट ठेवली आहे. शहरात पक्ष वाढवायचा असेल तर भाजपसोबत छुपी लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो, अस हा माजी आमदार शिंदे सेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठ नेत्यांना बोलल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबईत काही नेत्यांसोबत तीन ते चार बैठका या माजी आमदाराच्या झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती गेली असून लवकरच ते यावर निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. या माजी आमदाराच्या अटी मान्य करताना शहर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहितीही सध्या समोर आली आहे.

Mission Tiger: पुण्यात शिंदेंना धक्का, मिशन टायगर अडकलं अटी शर्तींच्या गर्तेत? Read More »

Screenshot 2025 02 26 11 51 41 54 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

Maharashtra News: मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, विरोधी नेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसद सदय तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित असणार आहे. मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर झाला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहे. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही. त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नाही. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नाही. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा Read More »

Mahakumbh

आज शेवटचा दिवस, महाशिवरात्री उत्सवानिमित्त लाखो भाविक जमले

2025 Prayagraj Kumbh Mela: आज महाकुंभाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या पवित्र स्नानात सहभागी होण्यासाठी भाविक त्रिवेणी संगमावर पोहोचले आहे. येथे भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरातील नियंत्रण कक्षातून पवित्र स्नानाचे निरीक्षण करत आहेत आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर भाविकांना शुभेच्छा देताना लिहिले की, “प्रयागराज येथील महाकुंभ-2025 मध्ये भगवान भोलेनाथांच्या पूजेला समर्पित महाशिवरात्रीच्या पवित्र स्नान महोत्सवानिमित्त आज त्रिवेणी संगमात श्रद्धेचे स्नान करण्यासाठी आलेल्या सर्व पूजनीय संत, कल्पवासी आणि भाविकांचे हार्दिक अभिनंदन!” तिन्ही लोकांचे स्वामी भगवान शिव आणि पवित्र नदी गंगा माता सर्वांना आशीर्वाद देवो, हीच माझी प्रार्थना आहे. सर्वत्र शिव!” महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महाकुंभाला भारताच्या शाश्वत संस्कृती आणि सामाजिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून वर्णन करताना, जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी जी महाराज म्हणाले की, हा कार्यक्रम जगात अद्वितीय आहे. या अद्भुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले. जूना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी महाकुंभ-2025 च्या समारोपप्रसंगी सांगितले की, महाकुंभ हे आपल्या दिव्यतेचे प्रतीक आहे. आकाश, अग्नी, पाणी, वायू आणि मानव अस्तित्वात आल्यापासून आपली संस्कृती चालू आहे. ते म्हणाले की, महाशिवरात्रीच्या ‘पूजेने’ महाकुंभाच्या परंपरा औपचारिकपणे पूर्ण होतील. देशभरातील शिव मंदिरांमध्ये लोक जमत आहेत.महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक रांगा लावत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्येही महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येतो. महाशिवरात्रीनिमित्त, रणबीरेश्वर मंदिर, शंभू मंदिर आणि जम्मूतील इतर मंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

आज शेवटचा दिवस, महाशिवरात्री उत्सवानिमित्त लाखो भाविक जमले Read More »