DNA मराठी

ताज्या बातम्या

shevgaon municipal council

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेत भाजपचा मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगर परिषदेतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात  बुधवारी (ता.21) सकाळी 11 वाजता पार पडलेल्या नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडीत भाजपने राजकीय डावपेचांचा कुशल वापर करत नगर परिषदेत आपले वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरदचंद्रजी पवार गटातील अंतर्गत फूट आणि सतत बदलणाऱ्या आघाड्यांचा फायदा घेत भाजपने निर्णय भूमिका घेतल्याने सभापतीच्या निवडीच्या वेळेस राजकीय गणित तयार झाले. शेवगाव शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माया अरुण मुंडे (शिवसेना) होत्या, तर मुख्याधिकारी विजय घाडगे उपस्थित होते. सभापतीपदाच्या निवडीत भाजपचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 2 नगरसेवक भाजपसोबत आल्याने नवीन राजकीय आघाडी उदयास आली. अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र पूर्णतः वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने भाजपला डावलत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) यांच्याशी आघाडी करत सिराजुद्दीन पटेल यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले होते. या घडामोडीमुळे भाजपला राजकीय धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने समित्यांच्या निवडीत आक्रमक आणि नियोजनबद्ध पवित्रा घेतला. आमदार मोनिका राजळे यांनी या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादीतील फुटीचा राजकीय लाभ घेत दोन्ही गटांना सोबत आणले. परिणामी समित्यांच्या निवडीत भाजपचे वजन अधिक ठळकपणे जाणवले. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत एकत्र असलेली आघाडी आणि समित्यांच्या निवडीत झालेली वेगळी युती यामुळे नगरपरिषदेत नेमकी सत्ता कोणाच्या हाती, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सत्तेतील या उलथापालथीचा आगामी विकासकामांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेत भाजपचा मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला ‘त्या’ प्रकरणात दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश

Nilesh Lanke : महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि दीपक ज्ञानदेव लंके यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामिनाचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपींना दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण पारनेर तालुक्यात आहे. परंतु ते अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले होते. फिर्यादी महिला ही अनुसूचित जातीतील आहे. फिर्यादीनुसार, 6 जून 2024 रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खा. लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह 24 जण चारचाकी वाहनांमधून फिर्यादीच्या घरासमोर आले. यावेळी आरोपी राहुल बबन झावरे याने फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी महिलेचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. आरोपी तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या महिलेच्या पोटात लाथ मारून तिला बेदम मारहाण केली होती. दीपक ज्ञानदेव लांके आणि संदीप लक्ष्मण चौधरी हेही यात सामील होते. सत्र न्यायालयाने 14 जूनला या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर केला होता. परंतु त्यानंतर फिर्यादीने याबाबत ओरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने फिर्यादीतील आरोप हे प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे असून, घटना ही फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी घडल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r) आणि 3(1)(s) अंतर्गत गुन्हा होत असल्याने, अशा प्रकरणात अटकपूर्व जामिनावर कायदेशीर बंदी असल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले. या प्रकरणात अ‍ॅड. आर. डी. राऊत यांनी तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. ए. डी. ओस्तवाल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. आर. करपे यांनी बाजू मांडली. अखेर, उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला तात्पुरता अटकपूर्व जामीन रद्द करत, राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक ज्ञानदेव लंके यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला ‘त्या’ प्रकरणात दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश Read More »

ek naata asahi

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Ek Naata Asahi : सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे “एक नातं असंही” आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या 31 जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. “एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे. आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले . आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग Read More »

kalyan dombivli municipal corporation

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार

Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा यावर सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील दोघांमध्ये झाली आहे. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असल्याची देखील माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

img 20260122 wa0002

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड

Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजेत्या सर्व 27 नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली. यावेळी गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कर करून अभिनंदन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले,  प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांच्या आशीर्वादाने व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात व बरोबर घेऊन काम करू. महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करू. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे, दिपाली बारस्कर, संपत बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, ज्योती गाडे, गौरी बोरकर, काजल भोसले, हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी, सुनिता भिंगारदिवे, कुमार वाकळे, अशा डागवाले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, गणेश भोसले., अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, पोर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे, सुनीता कांबळे, वर्षा काकडे, मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड Read More »

stock market

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही

Stock Market Crash : पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या टॅरिफ हल्ल्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घबराट पसरली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी दिवशी सुरुवात होताच आशियाई बाजार कोसळले, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले. बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी मंदावले असले तरी, ही मंदी एका तासातच लक्षणीय घसरणीत रूपांतरित झाली. एका घसरणीत बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 1100 अंकांनी घसरला. एनएसई निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. या पातळीवर घसरल्यानंतर, निर्देशांक सावरला आहे. सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा कोसळला शेअर बाजार सलग तीन व्यापारी दिवसांपासून घसरणीत आहे. मंगळवार शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी अशुभ ठरला आणि बुधवारीची परिस्थिती तशीच राहिली. सुरुवातीच्या किरकोळ चढउतारांचे रूपांतर लवकरच लक्षणीय घसरणीत झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 81,794 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 82,180 अंकांपेक्षा कमी होता आणि नंतर सुरुवातीला 82,282 अंकांवर पोहोचला, परंतु नंतर या पातळीपासून ते 81,124 अंकांवर झपाट्याने घसरला. तर निफ्टी दिवसाच्या उच्चांकापासून 358 अंकांनी घसरला. निफ्टी 50 25,232 अंकांपेक्षा कमी होऊन 25,141 अंकांवर उघडला आणि नंतर 25,277 अंकांना स्पर्श करून 24,919 पर्यंत घसरला. बाजारातील सततच्या घसरणीमुळे, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एकामागून एक धक्का बसत आहे. तीन व्यापार दिवसांत झालेल्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, बीएसई बाजार भांडवल ₹465. 68 लाख कोटींवर घसरले, ते मंगळवारी आणखी घसरून ₹455.72 लाख कोटींवर पोहोचले, एकाच दिवसात ₹10 लाख कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. बुधवारी, त्यात आणखी एक लक्षणीय घट झाली, ही घट ₹4.53 लाख कोटींवर पोहोचली.

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही Read More »

virat and rohit

BCCI Central Contract:  रोहित, विराटला धक्का, BCCI आता देणार नाही 7 कोटी मानधन; कारण काय?

BCCI Central Contract:  जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय मोठा निर्णय घेत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून ए+ ग्रेड काढून टाकण्याचा विचार करत आहे. सध्या ए+ ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. जर ए+ ग्रेड काढून टाकण्यात आले तर या चौघांनाही मोठ्या प्रमाणावर पगार कपात होणार आहे. बीसीसीआयच्या ग्रेड ए+ कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत, खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी मिळतात, परंतु ही ग्रेड आता अस्तित्वात राहणार नाही. बीसीसीआय आता फक्त तीन कॅटेगरी राखेल: ए, बी आणि सी. रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट होईल. त्यांना बी ग्रेडमध्ये हलवले जाईल. सध्या बी ग्रेड खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी मिळतात. याचा अर्थ विराट आणि रोहितला आता 7 कोटींऐवजी 3 कोटी मिळतील. जडेजा देखील बी ग्रेडमध्ये हलवला जाऊ शकतो, तर जसप्रीत बुमराहला ए ग्रेडमध्ये हलवले जाऊ शकते. कोणत्या खेळाडू कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ?   भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकूण 34 खेळाडूंना केंद्रीय करार दिले आहेत, त्यापैकी 19 खेळाडूंना सी-ग्रेड करार आहेत. सध्या, पाच खेळाडू बी-ग्रेडमध्ये आहेत. सहा खेळाडू ए-ग्रेडमध्ये आहेत. ए-प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडू आहेत. ए-प्लस श्रेणी: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा. ए-ग्रेड: मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत. बी-ग्रेड: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर. सी ग्रेड: रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक वर्मा.

BCCI Central Contract:  रोहित, विराटला धक्का, BCCI आता देणार नाही 7 कोटी मानधन; कारण काय? Read More »

seema anand

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय?

Who is Seema Anand  : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे सीमा आनंद. सीमा आनंद काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर ती आता गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय महिलांपैकी एक बनली आहे. काही दिवसांपुर्वी तिचे काही एआय-जनरेटेड, आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर तिने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि डिजिटल छळाच्या सामान्यीकरणाविरुद्ध बोलले. जर तुम्हाला तिच्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद एक लेखिका, व्यावसायिक कथाकार आणि पौराणिक कथा तज्ञ आहे. ती मानसशास्त्र आणि कामसूत्र सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर चर्चा करते. सीमा आनंद अलिकडच्या काळात, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर नातेसंबंध, जवळीक आणि स्वतःवर प्रेम यासारख्या विषयांवर उघडपणे सल्ला देते. तिच्याविरुद्ध डिजिटल छळाचा एक खटला उघडकीस आल्यानंतर तिला आणखी लक्ष वेधले गेले. तिने या छळाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि पोलिस तक्रार दाखल केली. या वयात तिच्या धाडसी कृतीने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकली. ती अनेकदा तिच्या व्हिडिओंमध्ये म्हणते की वय हे फक्त एक संख्या आहे आणि ती स्वतःच्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडून आधुनिक समस्यांवर उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते.  सीमा आनंद पुस्तके सीमा आनंद यांनी “द आर्ट्स ऑफ सेडक्शन” आणि अलिकडेच “स्पीक इझी” सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, ती प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर करून नातेसंबंधांमध्ये संवाद आणि आदराचे महत्त्व स्पष्ट करते. “द आर्ट ऑफ सेडक्शन” वरील तिचा टेड टॉक लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय? Read More »

img 20260121 wa0007

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद

Ahilyanagar Municipal Corporation :  अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदाची संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भाजप पक्षाने पहिल्यांदाच धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्याचा दिला आहे. ही निवड केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. शारदा दिगंबर ढवण या दिवंगत दिगंबर ढवण यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्या माजी खासदार डॉ  सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिगंबर ढवण यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उतरून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवण यांना मिळालेला जनसमर्थनाचा पाया आज गटनेतेपदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते. अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णयक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद Read More »