DNA मराठी

ताज्या बातम्या

Sangram Jagtap

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Sangram Jagtap: गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने आणि एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. तर दुसरीकडे आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा इशारा देण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

Ajit Pawar

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना…, अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये सरकारचे दुमत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेल असेही स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळवाट काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे असेही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना…, अजित पवारांचा हल्लाबोल Read More »

Vijay Wadettiwar

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची

Vijay Wadettiwar: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन मध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची Read More »

WhatsApp Image 2025 06 30 At 10.59.33 AM 3 1024x566

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा?

land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सावेडीतील जमीन घोटाळा नोंदणीच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली असतानाच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाय धरून “आम्हाला वाचवा” अशी गाऱ्हाणी केली आहे. लाज न शरम! जे अधिकारी स्वतःच्या भ्रष्ट कारभाराने जनतेचा विश्वासघात करत आहेत, तेच आता प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायांवर लोटांगण घालत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. वरिष्ठांचे छत्र — भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बिनधास्त कारनामेया प्रकरणातच नाही, तर यापूर्वीही ह्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी वरिष्ठांकडून आश्वासन मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही सुरूच आहे आणि आता नव्याने उघडकीस आलेल्या या घोटाळ्यासाठीही त्यांना वाचवण्याचा शब्द मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासन हेच भूमाफियांना आणि त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 35 वर्षांनंतर नोंदणीचा खेळ — भूमाफियांना मोकळे रान सावेडीच्या सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंदणी 35 वर्षांनी उगम पावली, आणि तिच्यामागील काळजीपूर्वक आखलेला भ्रष्ट कारभार उघड झाला. गटाचे विभाजन 1992 मध्ये झाले, पण 1991 मध्येच गट 245/ब 2 च्या नावाने खरेदीखत दाखवले गेले! अशक्य गोष्ट सहज शक्य करण्यात आली — आणि याचे मूळ मुळात नोंदणी कार्यालयातील सडलेल्या व्यवस्थेत आहे. प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातप्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचा संताप उफाळून आला नसता. परंतु, हेच अधिकारी आणि भूमाफिया यांच्या साटेलोट्याला छुपे पाठबळ दिल्याचा आरोप सध्या जोर धरत आहे. जनतेचा एकच नारा — दोषींवर कारवाई करा!सावेडीतील सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आता एका सुरात म्हणत आहेत – “दोषींवर कठोर कारवाई करा, भूमाफियांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई झाली पाहिजे!”जर प्रशासनाने आता पावले उचलली नाहीत, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित! आणि त्या वेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढालही त्यांना वाचवू शकणार नाही.

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा? Read More »

IMG 20250702 WA0003 1024x682

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल

Kunal Patil : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम भदाणे, आ. अनुप अग्रवाल, आ. मंगेश चव्हाण, आ. राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजपा संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. तर रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. कुणाल पाटील यांनी सांगितले की, गेली सुमारे 75 वर्षे माझे कुटुंब काँग्रेस बरोबर आहे. खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून खानदेशचे विकासाचे मनमाड – इंदूर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, असा अनुभव आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टीची ताकद धुळे जिल्ह्यात वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू, असेही कुणाल पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उबाठा उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिष माळी, डॉ. भरत राजपूत आदींनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल Read More »

IMG 20250702 WA0002 1024x624

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात

Ajit Pawar: पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे मात्र त्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरदचंद्र पवार गटाचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर, परभणी, नागपूर, हिंगोली, या जिल्हयातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेतील विविध पक्षातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सपाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना सोबत घेऊन महिला, युवक, युवती यांना संधी द्यायची आहे असे सांगतानाच अजित पवार यांनी यापुढे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस पक्षाला देणार असल्याचे जाहीर केले. पक्षात येणाऱ्या लोकांचा नक्कीच मानसन्मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक, आमदार राजेश विटेकर,आमदार राजू नवघरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आमदार डॉ. किरण लहामटे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात Read More »

ST Bus

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट

Pratap Sarnaik: एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 1 जुनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो. इ-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट Read More »

Sawedi Land 1024x566

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच?

land Scam Sawedi: अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची 35 वर्षांनंतर झालेली संशयास्पद नोंदणी सध्या शहरात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या नोंदणीसाठी वापरले गेलेले खरेदीखत 1991 मधील असले तरी, त्या वेळी मूळ मालकाच्या नावाने सातबारा उतारा अस्तित्वात नव्हता, असा धक्कादायक दावा पुढे आला आहे. त्यामुळे भूमाफिया आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साटेलोटाचा नवा प्रकार समोर आल्याची चर्चा रंगली आहे. मूळ मालकाला नोटीस न देता नोंदणी, गंभीर प्रश्नचिन्ह सदर जमीन मूळतः अब्दुल अजीज डायाभाई (पत्ता: झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य: मुंबई) यांच्या मालकीची आहे. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांनी ती खरेदी केली असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, गेली 35 वर्षे ही नोंदणी प्रलंबित असताना अचानकच त्याची नोंद घेतली गेली. विशेष म्हणजे, मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता आणि कोणतीही प्रत्यक्ष माहिती न देता नोंदणी केल्याचा आरोप होत आहे. कागदपत्रांची पडताळणी न करता नोंदणीचा आरोप या नोंदणीसाठी मूळ खरेदीखताच्या मूळ प्रतीची पडताळणी न करता नोंद घेण्यात आली, असा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे मृत अथवा परगावी गेलेल्या मालकांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांनी प्रशासनाशी संगनमत करून हा प्रकार घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी, आणि काही राजकीय मंडळींच्या वरदहस्तामुळेच हे शक्य झाल्याची चर्चा नागरिकांत आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकाराने नागरिक संतप्त या प्रकरणामुळे सावेडी परिसरातील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भूमाफिया आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जनआंदोलन उभारू,” असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. कायद्याचे उल्लंघन आणि सुधारणा गरजेच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नोंदणी प्रक्रियेतील अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. नोंदणी कायद्यानुसार खरेदीखताची आणि सातबाराच्या नोंदींची सखोल तपासणी बंधनकारक आहे. यामध्ये अपूर्णता किंवा फसवणूक आढळल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून करण्याचा अथवा चौकशीसाठी प्रक्रिया राबविण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे. पण या प्रकरणात हे नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे दिसते. न्यायालयीन चौकशीची मागणी या प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई होऊन न्यायालयीन चौकशी व्हावी आणि भूमाफिया व प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच? Read More »

Ahmednagar Zp Bilding Ahilyanagar Dna Marathi

जिल्हा परिषदेत अंशतः बदल की व्यवस्थेचा खेळ?

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेत झालेल्या अंशतः बदल आणि स्थानांतरण प्रकरणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडत आहे. काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे बदल आदेश निघाले खरे, पण त्यामागचे राजकारण आणि व्यवहार आता उघड होऊ लागले आहेत. खरेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या म्हणजे प्रशासनिक गरज, कारभाराचा कार्यक्षम भाग असतो. पण येथे चित्र वेगळे आहे. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी पाठवण्यात आले जिथे जाणे त्यांना गैरसोयीचे वाटले. त्यानंतर सुरू झाला दुसरा टप्पा — पुन्हा इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची मनधरणी, फिल्डिंग लावणे आणि ‘लक्ष्मी दर्शन’! यामुळे बदल्यांचा हा खेळ एक नवा पायंडा पडतो आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर आणि नीतिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आणि “प्रमो रावसाहेब” सारख्या काही निवडक अधिकाऱ्यांसाठी अपवाद कसे? असा सवाल कर्मचारी वर्गात आणि सामान्य प्रशासनात उपस्थित होतो आहे. सगळ्यांच्या बदल्या झाल्या, मग प्रमो राव साहेबांचे नाव बदल सूचीपासून दूर कसे राहिले? ही बाब केवळ आश्चर्यकारक नाही, तर शंका निर्माण करणारी आहे. आज जिल्हा परिषदेच्या कारभारात असे दिसते की, बदल्यांचा निर्णय गरजेनुसार नव्हे तर देवाण-घेवाणीच्या गणितानुसार होत आहे. अशा प्रकारांमुळे खालच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. प्रश्न इतकाच आहे की, ही व्यवस्था कधी सुधारणार? बदल्यांचे पारदर्शक आणि ठोस धोरण तयार होईल का? की अशाच “व्यवस्था सैल आणि मनमानी पद्धतीने कारभार चालत राहणार का ? जिल्हा परिषद प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व तटस्थ करण्याचे ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

जिल्हा परिषदेत अंशतः बदल की व्यवस्थेचा खेळ? Read More »

Bajrang Sonawane

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा

Bajrang Sonawane : बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे. ते सिद्ध होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांची संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून काही दिवसांसाठी गायब झाले होते.

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा Read More »